Wednesday, September 22, 2010

ती आपली खास मैत्रीण असते

कॉलेज मध्ये आपल्या खूप मैत्रिणी असतात,


पण जी आपल्याला पाहुन सुंदर smile देते ना,

ती आपली खास मैत्रीण असते.



जी आपल्याला रोज SMS करते,

आणि जिच्या SMS la आपल्याला पण छान Reply द्यावसा वाटतो ना,

ती आपली खास मैत्रीण असते.



जिच्याशी बोलताना आपल्याला खूप मजा येते,

पण तिच्या नजरेला नजर देऊन आपण कधी बोलू शकत नाही,

आणि तिची पण अवस्था काही निराळी नसते,

कारण, ती पण आपल्याशी बोलणे टाळत असते ना,

ती आपली खास अशी मैत्रीण असते.



ती कधी कॉलेजला नाही आली तर,

जीची आपल्याला विचारपूस करावीशी वाटते ना,

ती आपली खास मैत्रीण असते.



कधी मित्रमैत्रिणींशी बोलताना जी आपली

बाजू घेऊन बोलते ना,

ती आपली खास मैत्रीण असते,



जीच्या प्ररनेमुळेच आपल्याला अशी कविता करावीशी वाटते,

आणि जी आपल्या अशा कवितांना नाही आवडल्या तरी,

छान होती... अशी एक दाद देते ना,

ती आपली खास अशी मैत्रीण असते.

’ती’ आणि ’तो’

’ती’ आणि ’तो’






ती सांगते शेजारणींच्या गप्पा त्याला, मोठ्या उत्साहात

तेंव्हा तिला भरभरून आनंद मिळतो.

कारण महत्वाच्या नसतात त्या गप्पा,

महत्वाचा असतो त्याच्याशी होणारा संवाद.



ती विचारते त्याला ऑफीसच्या कामाबद्दल

तेंव्हा तिला मनापासून उत्सुकता वाटते.

कारण महत्वाचे नसतात ते फाईलींचे ढीग,

महत्वाची असते त्याच्याबद्दलची काळजी.



ती घेऊन जाते त्याला सहलीला

तेंव्हा तिथली हिरवळ तिला सुखावते.

कारण महत्वाची नसते ती सहल,

महत्वाचा असतो त्याचा सहवास.



ती बनवते त्याच्या आवडत्या रेसिपीज

तेंव्हा तिला खूप धन्यता वाटते.

कारण महत्वाच्या नसतात त्या रेसिपीज,

महत्वाचं असतं त्याच्याविषयीचं प्रेम.



’ती’ ही अशी असते.

’ती’ ही अशी असते.



पण तो.......



तो ऐकतो शेजारणींच्या गप्पा

तेंव्हा त्याला ती कटकट वाटते.

कारण त्याला दिसत नाही त्यातला संवाद,

त्याला दिसते फक्त त्यातली व्यर्थता.



तो सांगतो ऑफीसच्या कामाबद्दल

तेंव्हा त्याला ती अज्ञानी वाटते.

कारण त्याला स्पर्शत नाही त्यातली काळजी,

त्याला दिसतो फक्त तिचा अडाणीपणा.



तो जातो तिच्याबरोबर सहलीला

तेंव्हा त्याला रजा फुकट गेल्यासारखी वाटते.

कारण त्याला जाणवत नाही तिचा सहवास,

त्याला दिसते फक्त एनकॅश न केलेली लीव्ह.



तो खातो तिने बनवलेल्या रेसिपीज

तेंव्हा काहीच दाद देत नाही तिला.

कारण त्याला कळत नाही तिच प्रेम,

त्याला दिसतो फक्त तिचा नोकरी न करणारा गृहिणीपणा.



’तो’ हा असा असतो.

’तो’ हा असा असतो.

आता पुन्हा असतो काही दिवस अबोला .....!!!!

आता पुन्हा असतो काही दिवस अबोला .....!!!!


तिला वाटतं दरवेळी मीच चुकतो

कारण बोलताना कदाचित मीच तिला hurt करून जातो

एवढ्याश्या नाकावर येतो केवढाला राग

नि तिचा चेहरा पडतो !

आणि माझ्या मनात मोठ्ठा ढग गडगडतो !!

पुढचं काय ठरलेलेच असतं

चार दिवस अबोला, नंतर आपणच जाऊन गोड बोला!!!

चूक तिची असो व माझी sorry मात्र मीच म्हणायचं !!!!

मग तीन पण जरा हसत हसत असं नै तसं, तसं नै असं

असं सांगायचं .

मग मी पण 'असं असं' करायचं

मैत्रीत कधीतरी आसवं आणि नंतर हसं असं चालायचंच !!





चुकून कधीतरी चुकीचे शब्द बाहेर पडतात.

मनं दुखावतात.

आणि टचकन डोळ्यात पाणी येतं.

पापण्या पाणावतात.

त्या रात्री दोन्हीकडच्या उषा भिजतात.

उर उसासतात.

घड्याळातले काटे सरकता सरकत नसतात.

वहीची पानं पलटता पलटत नसतात.

पिंपळाची सुकलेली पानं मात्र ,अजूनही

आठवणी ताज्या ठेवून वहीत तशीच बंदिस्त असतात !!



त्या काळ्या शांततेत डोक्यात मात्र घुमत असतात

असंख्य विचारांचे आवाज.

जगजीत सिंगच्या गजल आणि आर .डी .ची sad songs

ऐकत रात्र कशीतरी सारून जाते.



दुसऱ्या दिवशी मीच तिच्याकडं बघतो.

मी मत्र तिच्यासाठी एक अनोळखी असतो.

तिचे निःशब्द ओठ आणि शांत डोळे बरंच

काही सांगून जातात !



आता पुन्हा असतो काही दिवस अबोला .....!!!!

त्या चिंब पावसात...तु सोडून जाताना..!!

फुले उमलतात नि कोमेजुन जातात.,


आपले अस्तित्व मात्र सोडून जातात.,

प्रेम-भंगाने का स्पंदने थांबतात.,

आपलेच गरजेला हात सोडुन जातात..!!



कोमेजलेल्या फुलासराखिच दिसत होतीस.,

रदत-रडताच हसत होतीस.,

आयुष्य भरासाठी प्रेम भरून गेलीस.,

जिवंतपणिच कफ़न देऊन गेलीस.,



इशार्याने तुझ्या स्वप्ने रंगवू लागलो.,

एक-एक पल तुझा होऊ लागलो.,

तुझ्यासोबत कुठेकुठे फिरायला जायच.,

तुझ्या खोल डोळ्यात फ़क्त आनंदच भरायच.,

देवा अगोदर सकाळी तुला पहायच.,

ऑफिसला जाताना तुझ चुंबन घ्यायाच.,

पण सारी स्वप्ने तू तुडवत गेलीस.,

हृदयाचे माझ्या तुकडे-तुकडे करून गेलीस..!!



वाटले होते तुही माझ्यावर प्रेम करतेस.,

माझ्या इतकच तुही झुरतेस.,

फुलपाखरा सारखे मन तुझ निघाल.,

इवलासा आनंद देऊन लगेच निघुन गेल.,

केसंवरही तुझ्या होतो ग मी फ़िदा.,

कसने गला कापन्याची तुझी चांगलीच अदा..!!



एकट जगण आता नकोस झालय.,

तुच माझे ह्रिदय कुरताडून टाकलय.,

मरणाला मिठी मारण्या अगोदर तुला पहावस वाटते.,

एकदाच तुला कवटालावेसे वाटते.,

शेवटी आठवनीच अत सोबती.,

चटका सारखी वाट पाहीन.,

माझ समंद आयुष्य तुझ्या चरणी वाहीन.,

नाही जरी निरोप जगाचा घेताना.,

पण प्राणच निघून जातो वेडया मनाला समजावताना..!!

त्या चिंब पावसात...

तु सोडून जाताना..!!

मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....!

कधी कुणाला पाहून माझं मन एवढं दाटलं नव्हतं,


मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....!



अनमोल होते ते क्षण तुझ्या सवे घालविलेले,

नजरे नजरेतून बोलतांना मनातल्या भावना सांगितलेले,

त्याच क्षणांचा मी कधी गुलाम होईल वाटलं नव्हतं,

मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....!



रम्य होती ती पहाट तुझ्या नजरेतून पाहिलेली,

आणि ती ढळती सांज तुझ्या सवे घलाविलेली,

तुझ्या विना जीवन एवढं नीरस होईल वाटलं नव्हतं,

मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....!



आज नाहीस तू माझ्याकडे आहेत फक्त तुझ्या आठवणी,

हसावीणार्या रडावीणार्या हळव्या अश्या त्या आठवणी,

आठवणीनच्या पुरात मी वाहून जाईल वाटलं नव्हतं,

मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....!



अस्तित्वासाठीही आज तुझी उणीव भासेल वाटलं नव्हतं,

मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....

आज खुप एकट-एकट वाटतय,

आज खुप एकट-एकट वाटतय,


जणु तुला शोधावस वाटतय,

नज़रेतुन तुला बघावस वाटतय,

मनातून थोडस रडावसही वाटतय…..



चिंब पावसात भिजावस वाटतय,

तुझ्या हाताला धरून नाचावस वाटतय,

ओल्या डोळ्यांनी तुला पहावस वाटतय,

पहाता-पहाता तुला सर्व काही सांगावस वाटतय…..



पण....

सर्व काही नुसत वाटतच रहातय,

नसून सुद्धा ह्या इथे, तू असल्यासारखी वाटतेस ,

तुझ्याशिवाय मन जणु वेड होऊन रहातय,

हळव्या मनाला कुठेतरी समजवावस वाटतय…..

परत तिच्या गालावरती खळी उमटली नाही

आठवणींचे अश्रू आजही गालावरती ओथंबती


परत तिच्या गालावरती खळी उमटली नाही



श्वास श्वास तो गंध गंध तो आधार सावलीचा

दिला हात बाबांनी तिच्या चिमुकल्या बोटांना



होता शाळेचा दिवस पहिला

बावरी सावळी घाबरली

बिलगली घट्ट तिच्या बाबांना

म्हणे मी नै जाणार शाळेला



म्हणती बाबा तिजला

बेटा जा तू शाळेला

झेप तुझी साऱ्या जगाला

एके दिनी तू घेशील उंच भरारी

तुझी स्वतःची असेल black ferrari



मी नै तुझा कायमचा सोबती

उद्या तू जाशील गं सासरी

आठवणींची लहरच भारी

विसर तू या बंधनांना

जाग तू आत्मविश्वासाला



भाबडी चिमुकली! तिला सासर म्हणजे,आत्मविश्वास म्हणजे काय काही माहित नव्हतं.

बिचारी रडत रडत शाळेला गेली आणि एक दिवस खूप मोठी झाली.आता तिच्याकडं स्वतःची black ferrari होती.



झाला भाबडीला आनंद मोठा

दाखवायला बाबांना आली घेवून black ferrari



पण घटनाच काही अशी घडली होती.....



झाला होता अपघात मोठा

मनावरती तिच्या आघात केवढाला

पार्थिव पाहुनी बाबांचे अश्रू आवरेना चिमुकलीला



म्हणे ती बाबांना ,

नको मला ती black ferrari

हवी तुमच्या खांद्यावरची सवारी

तुम्ही राजा मी राजकुमारी

घ्याना मला कडेवरती

नन्तर मी निवडते गवारी आवडते तुम्हाला भारी

आपण करू भाजी -पोळी



पण स्मरले तिला ते पहिले शब्द

आठवणींची लहरच भारी

विसर तू बंधनांना

शक्य नव्हते तिजला

पण,घातले श्राद्ध आठवणींना



पण, त्याच

आठवणींचे अश्रू आजही गालावरती ओथंबती

परत तिच्या गालावरती खळी उमटली नाही

कदाचित सारखा सारखा तुझ्या आयुष्यात मी येणार नाही

कोरड्या शुभेच्छा मी कधी तुला देणार नाही


उगाच मी तुझ्याशी गोड मी कधी बोलणार नाही

आनंदावर तुझ्या मी विरजण घालणार नाही

आणि सारखा तुझ्या आयुष्यात मी येणार नाही



जगाच्या गर्दीतला एकांत कुणालाच चुकला नाही.

कदाचित तुही त्याला मुकणार नाहीस

आपलीच माणस स्वार्थी कधी होतात, कदाचित तूला कळणार नाही.

वादळी सागरासारख्या तुझ्या मनाला तेव्हा, कदाचित किनारा दिसणार नाही.



मग,

तू जवळचं म्हणून कोणालातरी कॉल करावा म्हणशील.

मोबाइलमध्ये तुझ्या नावं वाचशील.

कदाचित अपेक्षित उत्तर तुला मिळणार नाही.



कदाचित होईल माझी आठवण .

पुन्हा मोबाईल चेक करशील.

पण, कदाचित माझं नंबर त्यात असणार नाही.



हतबद्ध होशील, तशीच बसशील.

डोळे घट्ट मिटशील,

अश्रू कधी वाहू लागतील तुला कदाचित कळणार सुद्धा नाही.



विचित्र स्वभावान्मागही चांगले भाव लपलेले असतात .

तूला कदाचित ते दिसणार नाहीत .



मग,

येईल कोणीतरी,

तुझ्या मिटल्या पापण्यानमागचं पाणी टिपायला .

तुला सावरायला,धीर द्यायला.



तेव्हा दचकू नकोस.

डोळे उघडून बघ.

आता मात्र तिथं 'नक्की' ."..................." असेन.



कदाचित सारखा सारखा तुझ्या आयुष्यात मी येणार नाही.

पण............................



.........................!!!!!

ती माझ्या बरोबर..

दरवाजा उघडताच


ती अगदी माझ्या डोळ्यांसमोर दिसते

तिलाच पाहून हल्ली मी विचारात पडतो...

-

ती माझ्या बरोबर

अगदी कॉलेजला सुद्धा सोबत जायची

येताना सुद्धा माझ्या सोबतच यायची...

-

तिच्या सहवासात

वेळ अगदी हसत हसत निघून जायची

घरी पोहचलो कधी हे समजत नसायचे...

-

दिवसभर आम्ही

वेड्या सारखे बाहेरच भटकत रहायचो

फिरता फिरता अचानक संद्याकाळ व्हायची...

-

तिच्या प्रेमात

मी मला स्वतःला विसरत चाललो होतो

तिच्यामुळेच मी सर्वांशी जिंकत आलो होतो...

-

काय सांगू तुम्हाला

हल्ली मी घराचा दरवाजा सारखा उघडतो

दरवाजा उघडला की, ती अगदी समोर दिसते...

.

.

.

माझी सायकल हो, अगदी समोर दिसते...

शाळकरी प्रेम..

शाळकरी प्रेम..


धांदरट मुलांच्या रांगेत बसायचॊ मी

अन तु बसायची हुशार मुलींच्या रांगेत

मठ्ठ होतो मी ..

पण तु किती हुशार होती...

प्रार्थनेच्या वेळी

तु पसायदान किती सुंदर म्हणायचीस

माझ्या मरगळलेल्या चेहरयावर

तु अनोखे तेज आनायचीस..

माझ नाव नेहमी ब्लकलिस्ट मधे दिसायच..

तुझ नाव मात्र शिक्षकांच्या तोंडून फेमस व्हायच...

तुझं हे सत्र असचं कायम राहील..

माझं स्वप्न असच यशापासून दुर जात राहीलं..

तु संगीतात एक नंबर असायची

खेळामधे मात्र माझीच अव्वल बाजी असायची..

मास्तरांनी माझी फजिती केली की

तु किती गालातल्या गालात हसायची...

एकदा मात्र खरोखर झाली कमाल,

एका नाटकात तु झाली प्रवासी अन मी झालो हमाल..

त्यावेळेस तुझ्या अभिनयाशी स्पर्धा करताना

खरोखर मी झालो होतो बेहाल...

भोंडला असायचा तुम्हा मुलींचा

आम्हाला मात्र सुट्टी असायाची..

पण तुला साडीत पहायचं म्हणून

माझी त्या भिंतीवरून नेहमीच डोकावणी असायची..

एकदा हिम्मत केली मी अन

सांगितल माझ्या ह्रिदयातलं,

तु म्हणालीस अरे वेड्या कसं शक्य आहे ते?

माझ घर सावलीतलं अन तुझ मात्र रखरखीत उन्हातल...

तुझ ते वाक्य मला

खुप उशीराच कळले..

स्वप्न ते माझे प्रेमजिवनाचे

खरोखरी कापरापरी विरघळले..

आता मी कलेक्टर झालोय

हे तुला सांगू तरी कसं

तुझ्या सावलीतल्या घरकूलाशेजारी..

माझं झोपडं बांधू तरी कस?

तुच समजून घे सारं काही..

अन समजून घे थोडसं मलाही..

अजुनही तुझीच वाट पाहतोय..

शाळेतल्या त्या प्रेमाला जपत तुझा होऊ पाहतोय...

एक अपुर्ण प्रेम......

नुसताच बसलो होतो मी,


बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...

सुचतच नव्हते काही मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...

शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन आणि सरळ आठवायला घेतले तुला,

तुझ हसणं आठवलं तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर तुझ चिडणं आठवलं तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी

मलाही मग आला उत्साह आठवत गेलो तुला खूप खूप...

तसे तरंगत आले चिकार शब्द आणि बसले शहाण्यासारखे एकेका ओळीत गुपचूप...

मग मी आठवल्या त्या कातरवेळा ती संकेतस्थळं आणि रात्रभर ते फोनवरचं बोलणं...

तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी

लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...

कागद भरुन गेला पार...

छान कविता होत होती तयार...

आता शेवटच राहिला होता फक्त बाकी सगळं जमलं होतं मस्त,

अन मला कुठुनसं आठवलं आपलं वेगळं होणं...

तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द

परत थोडा मागे गेलो जुनं-जुनं आठवू लागलो हाताला लागले काही निसटणारे क्षण लिहिलंही मी कागदावर काहीबाही पण ते माझं मलाच पटलं नाही...

जसं माझं प्रेम तुला कधी कध्धीच कळलं नाही...

माझं मीच मग समजावलं मला

कधी कधी असं होत राहते

एखादी कविता 'अपूर्ण'च, जसं राहून गेलंय आपलं नातं जसं...

राहून गेलंय आपलं नातं!

मुली खुप समजदार असतात

मुली खुप समजदार असतात


खुप शांत आणि बुद्धिमान असतात

असे माझी gf.आणि तिच्या मैत्रिणी म्हणतात

त्या स्वताचिच स्तुति स्वता करत असतात



त्याना नाराज करू नये

म्हणून त्यांचे ऐकून घेतो

पण मलाहेच समजत नाही

या एवढ्या हवेत का उडतात



मुली म्हणजे

एक असा व्हायरस असतात की

त्या कोणत्याही सिस्टमला

हँग करू शकतात

हां व्हायरस पहिल

खुप गोंड वाटतो

काही काल उलटल्या नंतर

हा आपला खरा चेहरा दाखवत असतो

@@@सावधान मित्रानो @@@

कारन आनखिन या व्हायारसचे औशध निघालेले नाही

पण खरच मुली खुप समजदार असतात

कारन स्वताची स्तुति त्या स्वताच करुण घेत असतात

प्रेमात पडलं की सारेच जण कविता...

प्रेमात पडलं की सारेच जण


कविता करायला लागतात

खरं सांगायचं तर थोडसं

वेड्यासारखंच वागतात.



यात काही चुकीचं नाही

सहाजिकच असतं सारं

एकदा प्रेमात पडलं की

उघडू लागतात मनाची दारं



मनातल्या भावना अलगद मग

कागदावरती उतरतात

डोळ्यांमधील आसवंसुद्धा

शब्द होऊन पसरतात



रात्रंदिवस तिचेच विचार

आपल्याला मग छ्ळू लागतात

न उमजलेल्या बरयाच गोष्टी

तेव्हा मात्र कळू लागतात.



डोळ्याशी डोळा लागत नाही

एकाकी रात्री खायला उठतात

ओठांपाशी थांबलेले शब्द

कवितेमधून बाहेर फुटतात



गोड गोड स्वप्नं बघत मग

रात्र रात्र जागतात

प्रेमात पडलं की सारेच जण

कविता करायला लागतात......

मुले .........असतातच असे ....

मुले .........असतातच असे ....


एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,

ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे...

-

मुले .........असतातच असे ....

तिचे सर्व हट्ट पुरवणारे,

फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत निस्वार्थी प्रयत्नात असणारे...

-

मुले .........असतातच असे ....

स्वतः खोडी काढणारे,

पण ती रागावली आहे हे पाहून तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे...

-

खरच काही मुले .........असतातच असे ....

माझ्या सारखे...

हरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून त्यात आपले प्रेम शोधणारे...

तुझ्यापासून दूर जावं म्हणतो,

तुझ्यापासून दूर जावं म्हणतो,


मनातलं सगळं मनातच जिरवावं म्हणतो ,

तुझ्याविषयी बरंच काही वाटतं पण,

आता विचार करणच बंद करावं म्हणतो

आता तुझ्यापासून दूर जावं म्हणतो !!



चंद्र,चांदण्या ,गुलाब, प्राजक्त

माझ्याच कवितांतले शब्द !

तुला पूर्ण ओळखल्यावर कळलं

ते सारे शब्द कवितांतच छान दिसतात .

आता तुझ्यापासून दूर जावं म्हणतो!!



किती रात्री जागवल्या तुझ्या आठवणीत आणि

किती अश्रू ढाळले दुःख पचवण्यासाठी

पण तुला त्याचं काहीच नाही ....

हे माहित असूनही वेड्यासारख्या अपेक्षा ठेवल्या

पण,आता तुझ्यापासून दूर जावं म्हणतो !!



आधी बऱ्याचदा असं ठरवलं होतं,

पण तुला विसरणं जमलंच नाही

अवघड आहे पण अशक्य नाही.

प्रयत्न सुरु आहेत म्हणूनच तर

आता तुझ्यापासून दूर जावं म्हणतो !!



पुढं कदाचित तुझ्यावर कविता सुचणार नाहीत

पुढची कविता 'विरक्त' या विषयावर करायचं म्हणतोय

तसं बघायला गेलं तर,

या वहीतल्या शेवटच्या आठ- दहा कविता तुझ्यावरच्याच!!

आता नवीन वहीत जरा वेगळा प्रवास

आता तुझ्यापासून दूर जावं म्हणतो !!



तरी पण मन आवरतच नाहीये.

आताच म्हणालं

करून टाक तिच्यावर एक कविता !

बघू सुचली तर ठीक नाही सुचली तर त्याहूनही ठीक !

तुझ्यापासून दूर जायचा मार्ग सोपाच होईल माझा

आता तुझ्यापासून दूर जावं म्हणतो !!



छे !कविता खूपच मोठी होत चाललीये.

तुझ्यापासून दूर जातोय,

का तुझ्या जवळ येतोय,मलाच कळत नाहीये.



पण तशी आठवण येणारच ना की,

'xxx' नावाची व्यक्ती होती कोणीतरी

जिसे मै प्यार करता था...

तरीपण आता तुझ्यापासून दूर जावं म्हणतो !!



आता कवितेचा शेवट केलाच पाहिजे.

पानावर जरा खालती केमिकल्सचे

आणि मातीचे वगैरे डाग पडलेत.

काय करणार ? तुझी आठवण सगळीकडे

असो! तुझ्यावरची कविता मळण्यापूर्वीच

तुझ्यापासून दूर जातो .........

तुला आणि मला..

तुला आणि मला..




एकत्र प्रवास करून परत वेगळ व्हायचं

एका डोळ्यांनी रडायचं तर एका डोळ्यांनी हसायचंय

तरीही जीवनाचे सर्व रंग रस अनुभवायचाय

उद्या आठवण येईल तुला माझी..

पण ते क्षण मात्र येणार नाहीत

तुझ्या ह्रदयातील माझी ती आठवण

कधीच निघून जाणार नाही..

आठवण तुझी मला जेव्हा येईल,

डोले पाण्यानी भरून जातील,

म्हणायला तर पूर्ण आयुष्य संपून जाईल..

पण तुझी कमतरता आयुष्यात माझ्या राहील..

आठवण करून माझी तू डोळ्यातून पाणी काढू नकोस..

थोडासा विश्वास ठेव,एकदा न एकदा भेटण्याचा..

भेट आपली होईल न होईल..

तरीही जीवनाचा हा प्रवास चालूच राहील...

सय एक नाजुकशी

सय एक नाजुकशी


रेशमी ओल्या क्षणांची

सुटतांना हात तुझा

तेव्हा भिजल्या मनांची



सय एक नाजुकशी...



पापणीच्या कडा ओल्या

स्पंदनेही भिजलेली

ओथंबल्या हृदयात

कैक क्षणे रुजलेली



सय एक नाजुकशी.....



तुझ्या हाती चाफे कळी

थरारे तिची पाकळी

चिंब-चिंब श्वास होई

दरवळ भासे ओली



सय एक नाजुकशी....



दु:ख दुराव्याचे मनी

ओठांवर हसू फुले

निरोपाच्या त्या क्षणात

अडकले मन खुळे



सय एक नाजुकशी

रेशमी ओल्या क्षणांची

सुटतांना हात तुझा

तेव्हा भिजल्या मनांची

आणि...पुन्हा तुझी आठवण !!

आणि...पुन्हा तुझी आठवण !!


सहज कामासाठी म्हणून कॅलेंडर बघायला घेतले ....

पाहिले तर आज वटपौर्णिमा ..........



कॅलेंडर वर असलेले वड आणि सुवासिनींचे चित्र......

आणि..... आणि......पुन्हा तुझी आठवण !!!



तुझी पहिलीच वटपौर्णिमा होती आणि....

आदल्यादिवशी संध्याकाळी तुझा ऑफिसमध्ये फोन...

"अरे बघ ना माझी काहीच तयारी नाहीय...आता मी काय करू ?".. भलीमोठी यादीच सांगितलीस फोनवर ....

तुझी धडपड पाहून खरतर मला जाम हसायला आले.....



मी स्वतः मार्केट मध्ये जाऊन तुझ्यासाठी पूजेचे समान घेऊन आलो ....

त्या दिवशी किती सुंदर दिसत होतीस तू .......

लग्नाचा शालू नेसलेली सुंदर परीच !!!



पूजेला जाताना मी आणलेला मोठा धागा जास्त होईल

म्हणून तू दुसरा छोटा धागा सोबत नेलास......

पण...पण... तुला तो वडाला सात वेळा गुंडाळायला पुरलाच नाही...

म्हणून तू दुसरा धागा जोडून वडाचे सात फेरे पूर्ण केलेस....



घरी आलीस तेव्हा तुझे डोळे भरून आलेले....

काय झाल राणी.. का रडतेयस ....?

तू मला धाग्याचा प्रकार सांगितलास...



रडतच माझ्या कुशीत शिरलीस....

ए वेडाबाई....अग काही होत नाही त्याने...तो वड नसेल आला तुझ्या धाग्याच्या टप्प्यात...



पण हा तुझा वड आहे ना ....

त्याला तुझ्या दोन हातांची मिठीच पुरते....

सात जन्मासाठी...

आणि नाही पुरला तो धागा तर तर....

माझ्या काळजाचा धागा करून देईल तुला....

आणि तुझ्या ओठांवर ओघळलेले अश्रू मी ओठांनीच टिपले ...

शहारलेली तू ..अन तुझी ती गच्च मिठी.... किती आठवणी.....





राणी पण.....पण तू .......न सांगताच एक दिवस निघून गेलीस...

धागा आणि वडालाही ईथेचं सोडून.......

मी आणला होता तुला सात जन्म पुरेल एवढा धागा....

पण तू तो सोबत नेलाच नाहीस ...



आता रस्त्याने जाताना घराजवळचा वड ...

आणि माझी तू गुंडाळलेला धागा नजरेनेच शोधण्याची धडपड....!!

Friday, September 17, 2010

आभाळाला कंठ फुटेल ..

आभाळाला कंठ फुटेल ..
आणि, ढगांना सूर

ति येईल ...

आणि मागोमाग, वीजांचा नादमय ताल ..

एक नवीन गाणंच जणू ...

तिच्या पाऊलवाटेवर, तिच्या प्रत्येक पावलांपुढे ..

सरींचे असंख्य पडदे पडत जातील ..

ति येईल ...

बहरती रातराणी,

लाजरा मोगरा,

दवधुक्यात भिजलेला गुलाब,

सारेच वाट बघत आहेत ..

ति नक्की येईल

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील


तुला माझी आठवण होईल

तुझ्याही डोळयांत तेव्हा

माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल



आठवणी जेव्हा माझ्या

तुला एकांतात कवटाळतील

तुझ्याही नजरा तेव्हा

माझ्या शोधात सैरावैरा पळतील



जेव्हा त्याला प्रेमाने बघशील

तेव्हा तुला मी दिसेन...

त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत

तेव्हा फक्त मी असेन...



तेव्हा तुला माझे शब्द पटतील

तुझ्याही नजरेत तेव्हा...

माझ्यासाठी अश्रू दाटतील....



माझ्यासाठी रडणारे ते अश्रू

तेव्हा तुझ्यावरच हसतील

कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना

ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

सध्याच हसतं - खेळत वातावरण सोडून

सध्याच हसतं - खेळत वातावरण सोडून


पूर्वीसारखाच एकटाच शांतपणे रस्त्याने चाललो होतो....

चालताना अचानक रस्त्याच्या कडेवरच्या दुकानावरील पाटीकडे लक्ष गेल,

त्यावर '' तिच '' नाव झगमगत होत......!!

डोळे भरून तिच नाव पाहिलं.....वाचल.....पुन्हा पुन्हा ते वाचल.......

हेच नाव हातावर कितीतरी वेळा लिहल होत अन खोडल होत.....

किती गोड वाटत होत ते....!

क्षणभर आताच्या '' रिकाम्या '' हाताकडे पाहिलं.....

अन त्या क्षणभरातच............

तिच माझ्या आयुष्यातून तडकाफडकी निघून जाण आठवलं....

' माझा जास्त विचार करू नको ' हे तिच मन तेव्हा होत बोललं.....

पुन्हा त्या दुकानाच्या पाटीकडे नजर टाकायची हिम्मत झालीच नाही..........



रात्री जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे

तार्यांबरोबर आकडेमोडीचा खेळ खेळत बसलो....

तारे मोजता - मोजता शुक्राच्या चांदणी जवळ आलो....

'' शुक्राची चांदणी............. ''

ती चांदणी सुद्धा फिक्की पडेल अस तिच सौन्दर्य होत...!

या चांदणीमूळच तिच्यावर कितीतरी कविता केल्या होत्या......

क्षणभर नजर उगीचच शून्यात गेली...

अन त्या क्षणभरातच.............

तिच माझ्या आयुष्यातून अचानक निघून जाण आठवलं...

' मला विसर ' हे तिचे शेवटचे शब्द अजूनही मनात घर करून आहेत

पुन्हा त्या शुक्राच्या चांदणीकडे पाहण्याची हिंमत झालीच नाही....



नेहमीचाच फावला वेळ...........

समोर डेस्क वर कोरा कागद अन शाईच पेन..

यांनी तर दिल होत मला कवितेच देण...

या कोर्या कागदावर शाईच्या पेनन तिच कितीतरी सौंदर्य उतरवल होत....

कितीतरी आठवणी जाग्या झाल्या होत्या..

क्षणभर नजर त्या ' कोर्या ' कागदाकडे गेली...

अन त्या क्षणभरातच..........

तिच डोळ्यासमोरून निघून जाण तरळल..

डोळ्यातून नकळतपणे निघालेले दोन थेंब त्या कोर्या कागदावर ओघळले...

आता तो कोरा कागद अन ते शाईच पेन पुन्हा हातात घ्यायची हिंमत झालीच नाही...

ती चाललीय माझ्या पासून दूर........

ती चाललीय माझ्या पासून दूर........


खूप दूर...... कदाचित परत न येण्यासाठी..



थांब ना जरा..... जाऊ नको......

अस म्हणायचा माझा आता अधिकार आहे कि नाही

माहिती नाही...

पण जाता जाता एक मागण मागू का.....?

जरा ऐकशील का......?

माझ्या काही गोष्टी तुझ्याकडे राहिल्यात

परत मला देशील का..?



हि माझी आताची नजर

नेहमीच कल्पनेत हरवते......

भिरभिरत्या नजरेने तुलाच शोधत राहते...

कधी काळी ती शून्यात हरवली होती

ती शून्यात हरवलेली नजर मला परत देशील का...?



हे आताच मन नेहमी आनंदान बागडत असत,

तुझ्याच आठवणीत पाझरत असत.....

कधी काळी ते एकटच उदास कुठेतरी भरकट होत...!

ते उदास, तुझ्या आठवणीने भिजलेले मन परत मला देशील का..?



आता नेहमी हसमुख राहणारे ओठ

कधी काळी अबोल होते.....

आता प्रत्येक शब्दात त्याची बडबड चालू आहे

कधी काळी ते निशब्द होते....

ते अबोल , निशब्द ओठ परत मला देशील का....?



हा आता बहरलेला गुलमोहोर

कधी काळी पानझडीच्या विळख्यात

कित्येक वर्ष खंगत पडला होता.....

तो पानझडीचा वृक्ष परत मला देशील का...?



सांग ना सखे.......

जाता जाता एक मागण मागू का.....?

जरा ऐकशील का......?

माझ्या काही गोष्टी तुझ्याकडे राहिल्यात

परत मला देशील का..?

तू का समजू शकली नाहीस भावना माझ्या प्रेमाची

तू का समजू शकली नाहीस


भावना माझ्या प्रेमाची

मी आजही तुझी अशी वाट पाहतोय

जशी चातक पक्षी वाट पाहत असतो पावसाची ,,,,,,,

ही पहिलीच वेळ होती माझी

कुणाच्या प्रेमात पडण्याची

उघड्या डोळ्यानी

नविन स्वप्न रंगवन्याची,,,,,,,,,,,

कुणाला काय सांगू व्यथा

माझ्या प्रेमाची

धोका तर त्याच्याकडूनच झाला

ज्याचाकडून आशा ठेवली होती विश्वासाची ,,,,,,,,

चार चौघात सांगुन

मला खिल्ली उड़वायाची नाही माझ्या प्रेमाची

तू जेथे असशील तेथे सुखी रहा

हीच शुभेच्छा तुला या नाकाम प्रेमविराची,,,,,,,,,,,,,,

रिंगटोन....जी फ़क्त तुझ्यासाठी ’सेट’ केली होती मी...

आज पुन्हा डेक्कनवर तोचं दरवळ....


मोग-याची गजरेवालीही अगदी तीचं....

तेवढ्यातं कुठुनतरी चिरपरिचित रिंगटोन....

जी फ़क्त तुझ्यासाठी ’सेट’ केली होती मी...

.

.

.

खरचं ! कीत्ती नि काय...काय...बोलायचो रे

तासन-तास आपण फ़ोनवर....

ईतके दूरचे अंतर नाहिसे करणारे ते क्शण.....

किती अमूल्य वेळ खर्ची घातलास नं माझ्यावर...

.

.

.

ए !माहितयं मला तूही खराचं होतास रे....

नि मी तर अजूनही उभीय...त्याच वळणावर...

का कोण जाणे...मनापसून वाटतय़ आजकाल...

निश्चित जन्म सरेल हा... अश्या तुझ्या आठवणींवर...

येते तुझी आठवण जेव्हा मला..............

जाता जाता पटकन निघून गेलीस,


माघे फिरकुन सुधा पाहिले नाहीस,

येते परत असे म्हणायचे राहून गेले

माझे डोले तुलाच पाहत राहिले

पण परत तू कही आलीच नाहीस

येते तुझी आठवण जेव्हा मला..............



आठवले ते आपले जूने दिवस की

मन माझे बेधुंद होउन बसते

ह्यातून बाहेर पडताना एवढी धडपड होते की

जग माझ्या कड़े पाहून हसत असते

येते तुझी आठवण जेव्हा मला..............



आठवतात मला ते जूने प्रेमाचे क्षण,

तुला विसरता मात्र येत नाही ,

सगल काही करुण बघितले

साली ही सवय काही सुटत नाही

येते तुझी आठवण जेव्हा मला..............



का येते तुजी आठवण सारखी सारखी मला

पार वेडा वेडा होतो मी आठवानित तुज्या

अजुनही उलघडले नाही हे कोड़े मला

सांग परत मला कधी घेशील जवळ तुज्या

येते तुझी आठवण जेव्हा मला..............

आता करायचच आहे कुणाशी तरी

ती :




आता करायचच आहे कुणाशी तरी

तशी दोन-चार मुलही सांगून आली

कोणी बघितलाच असशील तर सांग त्याला

काल शेवटी आई पण बोलली



म्हटलं विचाराव तुला

तू आहेस का तयार

अजूनही आवडते तुला

का सोडलास विचार



मी :



धाड धाड धाड

ती फक्त बोलतच होती

सुटली तेव्हा अशी काही

थांबायचं नावच घेत नव्हती



शांतपणे मी सारे ऐकून घेतले तिचे

नंतर उगीच माझे मलाच हसू आले

खेळणे झाले कि राव, तुमचे हे असे

सगळेच आले आणि कसे खेळून गेले



तेव्हा नाकारले होतेस, जोरात हसून

मी पहिलेच नाही तुला, त्या नजरेतून

दुसरी चांगली मिळेल, मला जा विसरून

मग थट्टा केलीस माझी, चार चौघींना सांगून



मी मात्र वेडा तुझ्यावर प्रेम करणारा

झिडकारलेस तरी तुला दुरूनच पाहणारा

त्याग म्हणजे खर प्रेम सगळ्यांकडून ऐकणारा

सुखी रहा म्हणत तुझे स्वप्न रोज जगणारा



का वागलीस तेव्हा अशी ... माहित नाही

काय आता मनात तुझ्या ... काही कळत नाही

काय हवय मलाही ... काही उमजत नाही

बायको म्हणून भेटशील पण प्रेम .... माहित नाही



करायचच आहे कुणाशी तरी

मग कोणीही भेटेल कि तुला

मी जिच्यावर प्रेम केल

ती तशीच राहू दे ना मला

फक्त तुझ्यासाठी .

फक्त तुझ्यासाठी .




माझ वागन देखिल बदलल

रागित स्वभाव सोडून ,

शांत स्वभाव केल,



कारण तुझ्या रागावर माझा राग म्हणजे

तापलेल्या तव्यावर शिम्पडलेले पानी.



मी प्युर वेजेटेरियन ची नॉन -वेजिटेरियन झाले ,

त्रास झाला थोडा ,पण केल

फक्त तुझ्यासाठी.



पाउस म्हणजे माझा जिव होता पण

तुला चिखल- पाउस आवडत नाही म्हणून,

मी पावसात ओल-चिम्ब होणे सोडून दिल आहे ,

फक्त तुझ्यासाठी.



मी दिलेली वस्तु जपून ठेवायची,अशी

माझी तकिद्द असायची देनार्याला,

माझी वास्तु हरवल्यास मी कधी तय व्यक्तीला

पुन्हा काही दिले नाही .



पण मी तुला देत राहिले आणि तू हरवत राहिला ,

आणि तरी मी तुला देतच राहिले.

फक्त तुझ्यासाठी .



माझ्या जीवनाच्या शब्दकोशात ,

कधी नसलेला शब्द ''प्रेम ''

माझ्या हृदयाने कोरुन लिहिला आहे,

फक्त तुझ्यासाठी .



मी तुझ्यासाठी मला पूर्ण बदलल ,

पण तू माझ्यासाठी कण भर सुद्दा

बदल ला नाही??

आणि हां प्रश्न मी तुला कधीच केला नाही ,

कारण मी तुझ्यावर ''प्रेम'' केल

फक्त ''तुझ्यावर प्रेम केल''

तुझ्या मृत्यूवर वीस वर्षांनी रडलो .........

तुझ्या मृत्यूवर वीस वर्षांनी रडलो .........




आज आपल्या मनुनी मला खरी पावती दिली

जेव्हा सासरी जाताना माझ्या गळ्यात आई आई म्हणून रडली



प्रथम मला वाटल कि तुझीच तिला आठवण येते आहे

मग मला कळाल ती मला बाप असून आईच स्थान देते आहे



जाताना तू म्हणाली होतीस दुसर लग्न नक्की कर....

......"पण माझ्या मुलीला वाटू दे हे तीच स्वतःच घर"



बघ मी सर्व पुर्षांसारखा नाही निघालो

"आई" आणण्या ऐवजी "आई" बनून राहिलो



तुझ्या जाण्या नंतर मी स्वतःला खूप सावरल

आई-बाप बनून मन्या भौती आयुष्य गुंफल



आज तिच्या सासरी जाण्याने मी पोरका झालो

तुझ्या मृत्यूवर वीस वर्षांनी ढसा ढसा रडलो.

कारण आता तू खूप बदललाय!!!

न बोलताही मनातल ओळखणारा तू ,


आज किती वेळा बोलूनही..

न समजल्यासारखा वागू लागलाय..

कारण आता तू खूप बदललाय!!!



मला भेटल्याविणा तुझा दिवस जात नव्हता ,

आज तुझ्या एका भेटीसाठी मी

एक-एक क्षण मोजलाय..

दुरावा मात्र आता रोजचा सोबती झालाय!!!



न चुकता गुलाबाच फूल आणणारा तू ,

हल्ली विसरू लागलाय..

असु देत रे,मी जुन्या गुलाबी आठवनीतच..

नवा सुगंध शोधलाय,जीव माझा रमव्लाय!!!



माझा हात हातात घेण्यासाठी किती बहाने तू करायचास..

आता कुणी बघेल हा बहाणा सांगून ,

तू दूर राहू लागलाय..

का रे इतका परक्यासारखा वागू लागलाय???



पण शेवटी व्हायच ते झालच ,

स्वप्न पुन्हा सार अधुर राहून गेला!!!



माझे अश्रू तर तुला कधी सहन झाले नव्हते ,

आज अश्रू मधे माझया ओल्लिचिम्ब मी..

तू कोरडा ठणथनीत निघून गेलाय..

अगदी कायमचा...मला सोडून..

एकदाही वळून न पाहता!!!



फक्त माझा होतास तू,आज दुसरीचा झालाय ,

पण तक्रार नाही रे राजा काही,तू फक्त खुश राहा..

कारण तुझया खुशितच मी माझा आनंद शोधलाय

फक्त तुझया खुषिकरता बघ नवस मी केलाय

राजा नवस मी केलाय....!!!!

मुले .........असतातच असे

मुले .........असतातच असे ....


एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,

ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे...

-

मुले .........असतातच असे ....

तिचे सर्व हट्ट पुरवणारे,

फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत निस्वार्थी प्रयत्नात असणारे...

-

मुले .........असतातच असे ....

स्वतः खोडी काढणारे,

पण ती रागावली आहे हे पाहून तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे...

-

खरच काही मुले .........असतातच असे ....

माझ्या सारखे...

हरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून त्यात आपले प्रेम शोधणारे...

आज माझे पाकीट हरवले...

होते थोडे फार पैसे


काही माझे कार्डस होते..

त्यात फर्स्टक्लास चा पास ही होता

आणि काही चिटोरे होते...



आज माझे पाकीट हरवले...

.

.

.

सोबत हरवला तो फोटो

आपण एकत्र काढला होता

हरवला तो एक कागद ज्यावर

तुझ्या प्रेमाचा कबुलीजबाब होता...



आज माझे पाकीट हरवले...

.

.

.

हरवली ती सारी तिकिटे

एकत्रित आपण जेथे प्रवास केला होता...

अन त्या तिकीटावरही तू

हसत हिशोब मांडला होता...



आज माझे पाकीट हरवले...

.

.

.

हरवली ती गुलाबाची पाकळी

जे फुल तुला मी दिले होते..

माझ्याशी अखेरचा निरोप घेताना

फुल ते हसत परत केले होते...



आज माझे पाकीट हरवले...

.

.

.

हरवला तो कागद सोबत

ज्यावर तुझ्यासाठी काही कविता केल्या होत्या

होत्या वाचून दाखवायच्या तुला एकदा

पण कवितांना त्या अर्थ राहिला नव्हता...



आज माझे पाकीट हरवले...

.

.

.

हरवले ते पत्र सोबत

कधी काळी तुला लिहिले होते..

प्रेमाचे शब्द ऐकण्या अगोदर..

शब्दांनाही तू नाकारले होते...



आज माझे पाकीट हरवले...

.

.

.

होता तुझा एक फोटो

ज्याच्याशी माझा संवाद असायचा

तुजवरील प्रेम ऐकताना

फोटोही कधीतरी लपून रडायचा...



आज माझे पाकीट हरवले...

.

.

.

हरवल्या त्या आठवणी सार्या

ज्यांच्या आधारे मी जगत होतो..

मिळाले पाकीट तर द्या हो पुन्हा मला

आठवणींविना त्या मी अधुरा होतो....मी अधुरा होतो..

आई, तुला एकदाच हाक दिली तरी अब्जांनी धावून येशील

आई, तुला एकदाच हाक दिली तरी अब्जांनी धावून येशील


आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या

अस्तित्वाचं इथे नांदणं आहे

संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी

हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे



आई, तुझ्या रागवण्यातही

अनूभवलाय वेगळाच गोडवा

तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात

फिका पडतो दसरा नि पाडवा



आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां

तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस

सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी

तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची



एकदा जरासं कुठे खरचटलो

आई, किती तू कळवळली होतीस

एक धपाटा घालून पाठीत

जख्मेवर फुंकर घातली होतीस



जख्मं ती पुर्ण बुजली आता

हरवून गेली त्यावरची खपली

तो धपाटा, ती फुंकर, ती माया

ती हरेक आठवण मनात जपली



आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम

हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी

कितींदा नव्या हृदयाचा संदेश

देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी



आई, हजार जन्म घेतले तरी

एका जन्माचे ऋण फीटणार नाही

आई, लाख चुका होतील मज कडून

तुझं समजावनं मिटणार नाही



आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो

तरी तू मला शोधून काढशील

आई, तुला एकदाच हाक दिली

तरी अब्जांनी धावून येशील

ब्रेकअप च्या दिवसापासून

हसत खेळत तो असायचा


सुखानं जगात वावरायचा

ब्रेकअप च्या दिवसापासून तो

नैराश्याच्या घरात राहायचा...



कामासाठी तो धडपडायचा

ऑफिसात सदा वेळेत असायचा

ब्रेकअप च्या दिवसापासून तो

वेळेशी त्याचा ताळ-मेळ नसायचा...



मित्रांमध्ये वेळ घालवायचा

स्वताची सर्वांत छाप पाडायचा

ब्रेकअप च्या दिवसापासून तो

स्वताच्या अस्तित्वाच्या शोधात असायचा...



घोळक्यात सर्वात उठून दिसायचा

इतरांना ही हवाहवासा वाटायचा

ब्रेकअप च्या दिवसापासून तो

गर्दीत हरवलेला असायचा...



मैत्री त्याची सर्वांपेक्षा न्यारी

मदतीसाठी सदा पुढे असायचा

ब्रेकअप च्या दिवसापासून तो

स्वताच्या मदतीसाठी धावा करायचा...



आजही तो असा हरवलेला

सुखापासून सध्या दुरावलेला

आहे सारा समुद्र जवळी त्याच्या

तरीही एका पाण्याच्या थेंबासाठी तहानलेला....पाण्याच्या थेंबासाठी तहानलेला...

ती अगदी अशी होती,

ती अगदी अशी होती,


थोडीशी हळवी,

स्वताः मधेच रमलेली,

नेहमी रागात बोलणारी..

-

तिच्या प्रेमात कधी पडलो

हे समजलेच नाही मला

ती जवळ असताना कधी

हे जाणवलेच नाही मला..

-

माझ्या मनातील अडीच अक्षरे

तिच्या मनापर्यंत पोहचली होती

पण तिच्या मनातले मात्र तिने

कधी कळूच दिले नाही मला..

-

रोज सकाळी कॉलेज मध्ये

मैत्रीनींशी बोलताना दिसायची

संध्याकाळी क्लास मध्ये मात्र

माझ्या समोरच येऊन बसायची..

-

नजरा नजर होण्याची ती सवय

माझी अजून सुटली नव्हती

रस्त्यात दुरूनच दिसली तरी

तिला पाहायला विसरत नाही..

-

आजही तिचा विचार माझ्या मनात

घर करून बसला आहे

विसरणे कठीण झाले आहे तिला

कारण ती अगदी अशी होती..

सोबत

सोबत


आता असे वाटते

ज्योती सोबत हवी होती...

कारण ती सोबत असताना

आयुष्यात माझ्या फ़ुले होती..



तिने मैत्री तोडली..

ते माझ्या जिव्हारी लागले..

आणि वाट पाहता पाहता...

नजर माझी मरून गेली...



आता एकटाच आहे..

कधी कधी मागे वळून पाहत आहे...

झालेल्या चुकांचा विचार करत आहे...

आणि स्वत:लाच शिक्षा देत आहे...



झालेल्या चुकाने मन तडफडतेय...

कारण खूप वेदना होत असताना...

मला काही होत नाही असे दाखवतेय



एक वेडी आशा आहे...

परत येतील ते दिवस...

म्हणेल ती मला...

चल झालेल्या गोष्टी विसर....



पण ती वेडी आशा आहे..

स्वत:च्याच पायात पाय अडकून पडण्यासारखी..

घोर एक निराशा आहे...



येतेय का ती हे डोळे वाट पाहतील...

शेवट्च्या श्वासापर्यंत ऊघडे राहतील...

येणार नाही ती हे माहीती असून..

मरणानंतरही डोळे तिचे शोध घेत राहतील....

तू जवळ असताना तुझी किम्मत कलालीच नाही

तू जवळ असताना


तुझी किम्मत कलालीच नाही

तू दूर गेल्यापासून मला

करमतच नाही

तुझा फोन आला की

मी बिझी आहे अस सांगायचो

ह्या ना त्या कारना वरुण तुला

टालन्याचा प्रयत्न करायचो

म्हनाय्चिस मला

"मी गेल्यावर तुला खुप

आठवण येइल

त्या वेळेस

तुझ्या सोबत

कोणीच नसेल"

त्या शब्दांची मला सारखी आठवन येते

दूर दुखाच्या जगात घेउन मला जाते

आज मी तुझ्या फोनची

रोज वाट पाहतो

आणि तुझ्या त्या शब्दाना

आठउन माझा मीच रडतो

तू खुप प्रेम केलस

पण मला ते जमलच नाही

आणि आज तुझी आठवन होते

तर तू जवळ नाहीस

वाईट वाटत दूख होत

पण आता करणार काय

तुझ्या आठवणी शिवाय माझ्या कड़े

काहीच उरल नाय ........

आज एक वर्ष झालं… आपल्या वेगळ होण्याला

आज एक वर्ष झालं


आज एक वर्ष झालं… आपल्या वेगळ होण्याला

थांबवू शकत नाही मी… डोळ्यामधल्या पाण्याला

अजूनही आठवतात मला.. आपण भेटलेल्या जागा

फुललेल्या असूनही मला… उजाडच वाटतात बागा

तुझ्यासाठी आणलेलं एक…. फुल तसच सुकून गेलं

कळलंच नाही मला कधी…. एक वर्ष निघून गेलं

सांग तरी एकदा मला ...माझी काय चूक झाली

आंधळ असतं न प्रेम तरीही….का जात आडवी आली

तिने कित्ती सुंदर दिसावं..

तिने कित्ती सुंदर दिसावं..


जसं गुलाबाचं फूल उमलावं..

कोणाच्याही नजरेत भरावं..

तासन तास पाहत रहावं..!!!!



तिने कित्ती गोड बोलावं..

ऐकणाऱ्याने विरघळून जावं..

हरवूनच जावं ..

सोबत तिच्या..!!!!



तिने कित्ती साधं रहावं ..

त्यातही रूप तिचं खुलावं..

कोणीही फिदा व्हाव ..

अदांवर तिच्या..!!!!



तिचं उदास होणं..

कसं हृदयाला भिडावं..

कोणालाही वाईट वाटावं..

अश्रूंनी तिच्या..!!!!



तिचं हसणं ..

कोणालाही सुखवावं..

कोणीही घसरून पडावं..

गालावरल्या खळीत तिच्या..!!!!



तिच्या नजरेने मलाच शोधावं..

अचानक नजरेने नजरेला भिडावं ..

मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..

लाजेने चूर चूर व्हावं..!!!!



ती समोर असताना ...

मी सारं काही विसरावं..

तिने इश्य करत लाजावं..

मी 'आये हाये' करत घायाळ व्हावं ..!!!!



तिने फक्त माझंच रहावं..

मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..

साथ देऊ जन्मोजन्मी ..

विरहाचं दुख कधीही न यावं..

कधीही न अनुभवावं..!!!!

माझी आठवण कधीतरी येईल तुला

माझी आठवण कधीतरी येईल तुला


जुन्या आठवणीत मग तू शोधशील मला.....



कुणालातरी माझी आठवण सांगताना तू हसशील

पण त्या आठवणीत मला पाहताच तू रडशील.....



आठवेल तुला समुद्र किनारी आपल्या दोघांच फिरन

तुझ्या थरथरत्या स्पर्शात मी स्वता हरवून जान.....



तू माझा हातात हात घेउन अनेक स्वप्न सजवन

माझ्या डोळ्यात पाणी येताच मला हसवण.....



आठवेल तुला आपल्या प्रेमातला तो जुना पाउस

एकाच छत्रीत पाउसात भिजणारी ती आपली हाउस.....



ओल्या चिम्ब तुझ्या स्पर्शात अंगावर येणारे शहारे

काळ्या गर्द वातावरणात मोहरून गेलेले ते अंग सारे.....



माझी आठवण येताच मी जवळ असल्याच तुला भासेल

तुझ्या डोळ्यातून निघालेला अश्रुचा प्रतेक थेंब मी असेल.....



तू एकटी बसल्यावर आठवेल तुला प्रतेक क्षण

त्या क्षणांमधे दिसेल तुला माझ तडफडणार मन.....



माझी आठवण कधीतरी येईल तुला

व्याकुळ होउन तुझ मन शोधेल मला.....

अहो लय हुशार पोरी

अहो लय हुशार पोरी


सभ्य पणाचा आव आणतात

असल्यावर घरी

फोन आला बॉय फ्रेंड चा तर बोलतात

रोंग़ नंबर सॉरी

एस एम एस

पाठउन बोलतील

मूर्खा फोन नको करू

अरे

सगले आहेत घरी

मी मिस कॉल करेल

आइ झोपल्यावरी

आणि दादा बाहेर गेल्यावरी

अहो लय हुशार पोरी

दादा लय हुशार पोरी



कोंलनी मधे शांत असतात

जणू स्वर्गा मधली परी

खाली मान घालून येतात

येताना घरी

आइ बोलते माझ लेकरु

खरच हाय भारी

दुसर्या पोरींन सारखी नाय

माझी लेक ही न्यारी

अहो कॉलेज मधे मस्तीत हिचाच नंबरआहे भारी

लय हुशार पोरी अहो लय हुशार पोरी





आपन गाडी थांबविली तर

नाहित बसणार गाडीवरी

बोलतील काय रे खुप भीती वाटते खरच यार सॉरी

पण बॉय फ्रेंड च्या गाडीवर.ची कहानी

वर्णन न केलेली बरी अहो

लय हुशार पोरी दादा लय हुशार पोरी

मस्त पैकी देतात आपल्या हातावर तुरी

आपल इम्परेशन वाढाव म्हणून

दुसर्याच्या इज्जतिची करतात

खोबर आणि खारी

चार शिव्या देतात

बोलतात सांगू काय तुझ्या घरी

मग आपन कान पकडून

बोलाव लागत सॉरी





अहो लय हुशार पोरी दादा

लय हुशार पोरी

सभ्य पणाचा आव आणतात

असल्यावर घरी....अहो असल्यावर घरी

तु परत येऊ नकोस, जुन्या आठवणी जागवायला,

तु परत येऊ नकोस,


जुन्या आठवणी जागवायला,

आधीच खुप दिवस लागलेत,

मनावरील जखमा भरायला.....



दुःख अंतरी दाबुन,

एकांतामध्ये रडत असतो,

म्हणुनच का कोणास ठावुक,

सर्वांसोबत हसत असतो.....



तु आयुष्यात परत येऊ नकोस,

तुझे स्थान मिळवायला,

आधीच फार वेळ लागलाय,

त्या सर्व आठवणी विसरायला.....



पण...

काहीही असले तरी........



तुला शोधायला तरी,

नजर माझी फिरत असते,

आकाशीचा चंद्र पाहील्यावर,

तुझीच आठवण दाटुन येते......



तुला विसरण्याचा,

आत्ता कुठे मी प्रयत्न करतोय,

पण ही कवीता लिहीता लिहीता,

पुन्हा तुलाच गं मी आठवतोय...

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,


सावलीशिवाय,"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,

सावली नकोस शोधु, ती आपल्या जवळच असते

नजर फक्त मागे वळव, डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,



सवयींचे काय, त्या कशाही जडतात,

हळु हळु अंगवळणीही पडतात,

म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?

एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते

" जगायचे होते रे ... खूप जगायचे होते

डोळ्यांत साऱ्यांच्या दिसे आता घृणा


ओठांत आपला शब्द ना उरला

चूक नाही यात काहीच त्यांची

दैवान घातला कसा नशिबावर घाला "



" जगायचे होते रे ... खूप जगायचे होते

बरच काही अजून करायचे होते

माझ्यासाठी नव्हे फक्त तिच्याचसाठी

थोडे अजून मरण लांबवायचे होते "



" पण तिलाच आताशा नकोसा झालोय

चेहरा तिचा मला सार ... सांगतोय

इतरांना उगीच कशास सांगू नाती

तिच्यातच सारा परकेपणा दिसतोय "



कितीतरी वेळ मग तो शांतच होता

काहीतरी करायच ... मनात पक्क करत होता

फोनवर दुसरीकडे मीही तसाच

काय वाढलय पुढे काही अंदाज नव्हता



" नकोसा झालोय रे ... आता "

पुन्हा त्याचा श्वास कोंडला

" एक काम करशील माझ ? "

जणू काही निर्वाणीच बोलला



" संपवावे वाटते हे असहाय जीवन

आण कुठून तरी एकच प्याला

रिचवू देत नरडीत क्षणात

पुढे प्रवास हा महाग झाला "



मी नाही म्हणालो तेव्हा त्याने

एक दीर्घ उसासा सोडला

" तूही परकाच ... " म्हणत अचानक

फोन त्याने ठेवला



मी घाईत निघता घराकडे त्याच्या

फोन माझा पुन्हा वाजला

बेवारस प्रेताजवळील मोबाईल मध्ये

पोलिसांना माझा " Recent Call " दिसला

बर झाल तू गेलीस सोडून मला..

बर झाल तू गेलीस सोडून मला ते


आता नाही करत मी तुजा विचार







आता नाही वाटत मला भीती , घरात असताना मोबाइल ची रिंग वाजली तर

भीती ताई ने sms वाचायची, भीती आईने फ़ोन उचलायची

आता गरज नाही वाटत मोबाइल सतत जवळ ठेवायची

आता करतो मी फ़क्त माझ्यचं मोबाइल चे recharge

आता नसतात मोबाइल मधे misscall वर misscall



बर झाल तू गेलीस सोडून मला ते

आता नाही करत मी तुजा विचार



आता असतो मित्रांसोबत , त्यांच्याशी गप्पा मारत , करतो एन्जोय चायनीज पार्ट्या

आता कोणीही म्हणत नाही " आज कसा काय साहेबाना वेळ म्हणाला "

आता असतो मज्याकडे वेळ मंदिरात जायला

आणि नाही वाटत भीती कुणी आपल्या कड़े पहायची

आता मला मोजकेच पैसे न्यावे लागतात shopping ला जाताना



बर झाल तू गेलीस सोडून मला ते

आता नाही करत मी तुजा विचार



आता दुरावलेले cricket आहे माज्या सोबतीला

आता रमतय माझ मन अभ्यासात , वाटतय त्यात काहीतरी तथ्य

करतोय मी माज्या career चा विचार

आता बांधली आहे मी माझ्या स्वप्नांची माडी

स्वप्नांच्या माडीतले ते स्वनाचे घर , वाट पाहतोय त्या घरात तिची ,

येइल ती , एका दिवशी , माज्या बरोबर लग्नाचे ७ फेरे घेवून बनवेल माझे आयुष्य सुखाचे



बर झाल तू गेलीस सोडून मला ते

आता नाही करत मी तुजा विचार



जाता जाता प्रेमाचा कठू अनुभव देवून गेलीस,

२१ व्या शतकातील आधुनिक मुलींच्या स्वभावाची ओळख करून दिलीस

आता आहे माझ्याकडे अनुभवाचे गाठोडे , मग कसा फसेन त्या जाळ्यात पुन्हा ?

आता घेणार सात फेरे ते फक्त माझ्या आई च्या समत्तिने ,

१ डाव फसला आहे म्हणुन आता दूसरा आई च्या हातात दिला आहे

नक्कीच तो सफल होयेल, आणि नक्कीच त्याला समर्थांचा आशीर्वाद असेल यात शंका नाही



बर झाल तू गेलीस सोडून मला ते

आता नाही करत मी तुजा विचार

असे कितीही म्हटले तरी शेवटी तुझ्यावरच कविता करतोय ................... !!!

थोड्या वेळापुरता का होईना स्वताशीच खोट बोलतोय ................... !!!

आणि एकटाच स्वताशी हसतोय ................... !!!

तरीही मनापासून १ खर सांगतोय ................... !!!





" बर झाल तू गेलीस सोडून मला ते ,

आता डोक्याला कसलंच tension नाही आहे "

अजूनही तू हवीशी वाटतेस

का अजूनही तू हवीशी वाटतेस


" एवढं " सारं झाल्या नंतरही .....



तुझे हात पहिले की ,

कधीकाळी झालेल्या स्पर्शांची आठवण होते

तुझ्या अशा कितीतरी गोष्टींशी निगडीत

अगणित गोष्ट आतःवत राहतात



तुझं नि माझं झालेलं शेवटचं भांडण

शेवटचे माझ्याशी बोललेले शब्द ,शेवटचा तो राग

आणि मग पुढे,मी लपवलेले

सुक्या पापण्यान्मागचे ओले अश्रू

अन हसऱ्या खळीमागाची कडवट दुःख ....



वाटायचं की तुझेही डोळे भरून आले असतील

कदाचित तुही गुडघ्यांत मान खाली घालून

रात्रभर बसली असशील

झोपेची वाट बघत,

मी बोलल्याचे भास होऊन सुखावली असशील..तुही. ..कदाचित....



कोणास ठाऊक कदाचित सुटकाही मिळाली असेल तुला

माझ्यापासून ...माझ्या स्वभावापासून ....



आता बरेच महिने लोटले

आता बऱ्यापैकी पुसलं गेलय दुःख

शेवटी काळ हे जालीम औषध असतं

" असल्या " जखमांवर ...

किंवा नसेलही कदाचित .....



का अजूनही तू हवीशी वाटतेस

" एवढं " सारं झाल्या नंतरही .....

मित्र आणि प्रियकर

मित्र आणि प्रियकर






मित्र असेपर्यंत ठीक होता,

प्रेमाचा खेळ सुरु झाल्यापासुन

अधिकारच माझ्यावर गाजवतो,

प्रत्येक गोष्टीतही विनाकारण

Explanation आता हा मागतो.



मित्र होता तेव्हा नेहमी

माझ्याआधीच आलेला असायचा,

प्रेमाचा खेळ सुरु झाल्यापासुन

कामातील व्यापामुळे दरवेळी

वेळच ह्याच्याजवळ नसायचा.



मित्र होता तेव्हा कसा

स्वत:हूनच फोन करायचा,

प्रेमाचा खेळ सुरु झाल्यापासुन

मी केलेला फोनही कधी कधी

रागाने नाही उचलायचा.



मित्र होता तेव्हा कसा

रागाची माझ्या खूप पर्वा करायचा,

प्रेमाचा खेळ सुरु झाल्यापासुन

उगीचच माझ्यावर भडकतो

आणि रोजच मला हा रडवतो.



मित्र असेपर्यंत सगळं ठीक होतं,

प्रेमाचा खेळ सुरु झाल्यापासुन

ह्याचं नातं अजूनही तसंच आहे सगळ्यांसाठी,

मी मात्र बंदिस्त ह्याच्याच कोषात जगासाठी.

माझ्या थडग्याजवळ ढाळू नको आसू...

माझ्या थडग्याजवळ ढाळू नको आसू...


माझ्या थडग्याजवळ ढाळू नको आसू

तुझाच होईल आवाज, मी शांत असेन

असह्य होऊन कबर खोदून पाहशील

तेव्हां त्या थडग्यात मीच नसेन



कारण..



मी सूर्याचा सहस्त्र किरण

मी उन्मुक्त बेधुंद पवन

मी जरासा लाजरा सावन

शांत शांत पुलकित पावन



मी भारलेला सुशांत मेघ

तू हारलेली निवांत रेघ

मी रातराणीचा गंधित वारा

माळतेस अजूनी तू माझाच गजरा



तू कडाडती रौद्र दामिनी

मी गात जातो चिमणगाणी

तू करीत जा चांदणे गोळा

मी नभीचा चंद्र वाटोळा



कशास मोजतेस अजूनी नाणी

मी पक्षांची किलबिल गाणी

कशास आताही तो जुनाच तोरा

मी पहाटल्या स्वप्नांचा तारा



गळून पडतील बाह्याचे इमले

वेचत जाशील मोत्याचे शिंपले

नको उघडू गं, निखळतील मोती

दोन्ही डोळ्यातून कबरीभवती





म्हणूनच प्रिये, सांगतो तुजला





माझ्या थडग्याजवळ ढाळू नको आसू

तुझाच होईल आवाज, मी शांत असेन

असह्य होऊन कबर खोदून पाहशील

तेव्हां त्या थडग्यात मीच नसेन

एकदा केव्हातरी शांतपणे बसावं...

एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे. कॅलिडोस्कोप पाह्यलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राह्यलेला नाही. कापसाच्या म्हतारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही...... त्या उडणार्या म्हतारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत.

तुझी आठवण आली कि..

तुझी आठवण आली कि

मन सुद्धा हळवं होत

कस समजावू त्याला

तुझ प्रेम सत्य नाही मृगजळ होत ...!



.................................................................................



दूर जाण किती कठीण असत

हे मला आता कळतंय

थोडा वेळ का होईना

तुझ्या जवळ परत याव अस हे वेड मन म्हणतय.

नको देवूस माझ्या जीवनात साथ

नको देवूस माझ्या जीवनात साथ,


पण काही पावलं तर माझ्या सोबत चालू शकते ना ...



नको देवूस मला माझ्या दुखात साथ ,

पण काही क्षण सुखाचे तरी घालवू शकते ना ...



नको देवूस माझ्या प्रेमात साथ ,

पण काही क्षण माझा विचार तर करू शकते ना ...



नको होवूस तू माझी ,

पण एकदा माझ्या हातात हात तर दिवू शकते ना ...



एवढ तर तू माझ्या साठी करूच शकते ना ....!!!

" Hello .... Hello .... "

" Hello .... Hello .... "


" चल निघते मी आता ....

खूप उशीर होतोय ....

आज मुलाचा वाढदिवस आहे ....

सारखा त्याचा फोनही येतोय .... "



" अरे व्वा ! " मी म्हणालो

" लवकर पळ मग आता ....

माझ्याही wishes नक्की सांग ....

सांग हा ! न चुकता .... "



" हो हो नक्की सांगेन .... "

ती जरा घाईतच निघाली

" केकही घ्यायचाय अजून .... "

जाता जाता म्हणाली



काही वेळ असाच मग कामात गेला

नंतर थोडा कंटाळा आला

बघुया बाहेर काय घडतंय म्हणत

सहज टि. व्ही. चा रिमोट दाबला



" ब्रेकिंग न्यूज .... ब्रेकिंग न्यूज .... "

सगळ्या वाहिन्यांवर बातम्या त्याच

नवीन नवीन मथळ्या मागे

सांगत होते कथा जुन्याच



नंतर अचानक लक्ष गेल

स्क्रीन वरील आडव्या स्क्रोलवर

" लोकल मधून पडून महिलेचा मृत्यू "

घडला होता थोड्या अंतरावर



मध्यमवयीन, रंग सावळा,

किरकोळ बांधा, अंगावर साडी हिरवी,

गळ्यात ID - Card, आणि ऑफिसची Bag,

इतर सामानासोबत हातात केकची पिशवी



अरे ... अस कस ....

आत्ताच ती माझ्याशी बोलून गेली

क्षणभर सार सुन्न झाल

मग माझ्या मनाची मी तयारी केली



खूप खुश होती ती आज

मुलाचा वाढदिवस होता तिच्या

तोही अजून वाट बघत असेल

असच घडायचं होत ... या दिवशी आजच्या



काय कराव आता ... काही सुचेना

श्वासही मधेच कोंडत होता

तिच्यासोबतचा एक एक क्षण

डोळ्यांसमोर फिरत होता



किती क्षणिक असत सार

जुनी मैत्री, जुनी नाती-गोती

मृत्यू ... हेच अंतिम सत्य

मनी असेच तेव्हा विचार किती



फोनची बेल मग अचानक वाजली

" Hello, अरे पोहोचले घरी मी मगाशी ...

माझा मुलगा फोनवर येतोय ...

त्याला बोलायचय तुझ्याशी ... "



" Hello .... Hello .... "

ती अगदी अशी होती...

ती अगदी अशी होती,


थोडीशी हळवी,

स्वताः मधेच रमलेली,

नेहमी रागात बोलणारी..

-

तिच्या प्रेमात कधी पडलो

हे समजलेच नाही मला

ती जवळ असताना कधी

हे जाणवलेच नाही मला..

-

माझ्या मनातील अडीच अक्षरे

तिच्या मनापर्यंत पोहचली होती

पण तिच्या मनातले मात्र तिने

कधी कळूच दिले नाही मला..

-

रोज सकाळी कॉलेज मध्ये

मैत्रीनींशी बोलताना दिसायची

संध्याकाळी क्लास मध्ये मात्र

माझ्या समोरच येऊन बसायची..

-

नजरा नजर होण्याची ती सवय

माझी अजून सुटली नव्हती

रस्त्यात दुरूनच दिसली तरी

तिला पाहायला विसरत नाही..

-

आजही तिचा विचार माझ्या मनात

घर करून बसला आहे

विसरणे कठीण झाले आहे तिला

कारण ती अगदी अशी होती..

हे आतलं वेड मन....

अजब आहे रसायन


हे आतलं वेड मन....

दगड दगड म्हणता म्हणता

अचानक पाघळून जात हे मन....



कितीही बोललं तरी,

ऐकत नाही...

कितीही समजावलं तरी,

समजत नाही....



आपल्याच मनासारखं वागणार

त्याला पटेल तेच करणार

खरच, अजब आहे रसायन

हे आतलं वेड मन....



नेहमी क्षितीजापलीकडेच

बघत राहणार....

उडत्या पाखराप्रमाणे

मुक्तपणे फिरत राहणार..



ठेच लागून पडला तरी.

आपल्याच मनासारखं वागणार

त्याला पटेल तेच करणार

खरच, अजब आहे रसायन

हे आतलं वेड मन....



चारचौघात असताना

नेहमी एकट एकट राहणार

सगळे झोपी गेल्यावर

हा वेड्यासारखा ' जागा ' राहणार



'' नाही '' म्हटलं तरी झुरत राहणार

काहींही झाल तरी.....

आपल्याच मनासारखं वागणार

त्याला पटेल तेच करणार

खरच, अजब आहे रसायन

हे आतलं वेड मन....

तुझ्या सोबतच्या आयुष्यात एक वेगळीच गंम्मत होती

तुझ्या सोबतच्या आयुष्यात एक वेगळीच गंम्मत होती


रंग नवे भरतान तुझी मला साथ होती



जग माझे होते सुंदर तुझ्या माझ्या स्वप्नांचे

रंग त्याचे किती निराळे पाहून ते मी लाजावे



पण अचानक तो भयंक दिवस उजाडलंच

तुझ्या माझ्या प्रेमाचा शेवटचा दिवस ठरला



ठरवून आले मनाशी आज सर्व काही संगाचे

माझ्या परस्पर ठरवलेल्या लग्न बद्दल बोलायचे



पण नियती हि वाईट असते ते त्या दिवशी कळले

तुझ्या आनंदाच्या क्षणांची मीच वैरी ठरले



पुढच्या वळणा वरती भेठणार नाहीस तरी वाट पाहत आहेस

माझ्या मनाची व्यथा तुला सांगत आहे....तुला सांगत आहे

कधी आलीस तर नक्की येउन जा...........

कधी आलीस


तर नक्की येउन जा...........



तिथं .....

जिथं ...... मी तुला नेहमी भेटायचो....



तिथं.... तुला आता....... काहीच दिसणार नाही.......



तिथं दिसेल.....

फ़क्त तुला.......तुझ्या माझ्या आठवणींच अस्ताव्यस्त झोपड़



कधी आलीस

तर नक्की कोणाला तरी विचार........

पुर्वीचा ओळखीचा

पण

सध्याचा ...अनोळखी मी .. कुठे आहे???

तुला उत्तर मिळणार नाहीच...........

नंतर.....

तुझी पावल जड़ होतील तू माघारी फिरशील

डोळे ही पाणावतील

तुझे थोड़े



नंतर तू स्वताशिच म्हणशील

फ़क्त एकदा...... तुला भेटायचय ..... फ़क्त एकदा.......

नसत केल तिच्यावर प्रेम तर बर झाल असत...

नसत केल तिच्यावर प्रेम


तर बर झाल असत

मुंबई मधे किमान १० बाय १० च

झोपड़ तरी विकत घेता आल असत



नसत करता आल डी एड

पण बी एड तरी करता आल असत

नसतो झालो टीचर पण

शिपायाच पद तरी भेटल असत



नसता केला आई बाबांना फ़ोन

पण त्यांचा तरी घेता आला असता

आई मी महत्वाच्या फ़ोन वर बोलतोय ग

परत करतो , अस सांगायचा प्रश्नच उरला नसता



माझ्या लेकरा ला खुप

काम असत ग ?

अस डोळ्यात अश्रु आणून

आई चा उदगार निघाला नसता



तिला भेटून रात्रि , बेरात्री घरी गेल्यावर

घड्याला कड़े बघत चिंता ग्रस्त झालेला

बाबांचा बेचैन चेहरा कदीच दिसला नसता



प्रतेक सुट्टीत घराच्या बाहेर असतोस

कसल आहे काम , सोडून दे त्या कामाला

आम्ही सुधा कामाला जातो

असा " ह्रदय हेलावनारा " आई बाबांचा

आवाज कधीच ऐकला नसता



नसता घेता आला फ्लैट

पण एवढ तरी केल असत

मुंबई मधे किमान १० बाय १० च

झोपड़ तरी घेता आल असत



नसत केल तिच्यावर प्रेम तर बर झाल असत

कंपनी ने माझ प्रमोशन कधीच झाल असत

नसत हसता आल पण रडाव तरी लागल नसत

बनविलेल्या कवितान्नी डोळ पुसाव लागल नस्त