तुझ्या मृत्यूवर वीस वर्षांनी रडलो .........
आज आपल्या मनुनी मला खरी पावती दिली
जेव्हा सासरी जाताना माझ्या गळ्यात आई आई म्हणून रडली
प्रथम मला वाटल कि तुझीच तिला आठवण येते आहे
मग मला कळाल ती मला बाप असून आईच स्थान देते आहे
जाताना तू म्हणाली होतीस दुसर लग्न नक्की कर....
......"पण माझ्या मुलीला वाटू दे हे तीच स्वतःच घर"
बघ मी सर्व पुर्षांसारखा नाही निघालो
"आई" आणण्या ऐवजी "आई" बनून राहिलो
तुझ्या जाण्या नंतर मी स्वतःला खूप सावरल
आई-बाप बनून मन्या भौती आयुष्य गुंफल
आज तिच्या सासरी जाण्याने मी पोरका झालो
तुझ्या मृत्यूवर वीस वर्षांनी ढसा ढसा रडलो.
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment