ती अगदी अशी होती,
थोडीशी हळवी,
स्वताः मधेच रमलेली,
नेहमी रागात बोलणारी..
-
तिच्या प्रेमात कधी पडलो
हे समजलेच नाही मला
ती जवळ असताना कधी
हे जाणवलेच नाही मला..
-
माझ्या मनातील अडीच अक्षरे
तिच्या मनापर्यंत पोहचली होती
पण तिच्या मनातले मात्र तिने
कधी कळूच दिले नाही मला..
-
रोज सकाळी कॉलेज मध्ये
मैत्रीनींशी बोलताना दिसायची
संध्याकाळी क्लास मध्ये मात्र
माझ्या समोरच येऊन बसायची..
-
नजरा नजर होण्याची ती सवय
माझी अजून सुटली नव्हती
रस्त्यात दुरूनच दिसली तरी
तिला पाहायला विसरत नाही..
-
आजही तिचा विचार माझ्या मनात
घर करून बसला आहे
विसरणे कठीण झाले आहे तिला
कारण ती अगदी अशी होती..
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment