आभाळाला कंठ फुटेल ..
आणि, ढगांना सूर
ति येईल ...
आणि मागोमाग, वीजांचा नादमय ताल ..
एक नवीन गाणंच जणू ...
तिच्या पाऊलवाटेवर, तिच्या प्रत्येक पावलांपुढे ..
सरींचे असंख्य पडदे पडत जातील ..
ति येईल ...
बहरती रातराणी,
लाजरा मोगरा,
दवधुक्यात भिजलेला गुलाब,
सारेच वाट बघत आहेत ..
ति नक्की येईल
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment