Wednesday, September 22, 2010

आणि...पुन्हा तुझी आठवण !!

आणि...पुन्हा तुझी आठवण !!


सहज कामासाठी म्हणून कॅलेंडर बघायला घेतले ....

पाहिले तर आज वटपौर्णिमा ..........



कॅलेंडर वर असलेले वड आणि सुवासिनींचे चित्र......

आणि..... आणि......पुन्हा तुझी आठवण !!!



तुझी पहिलीच वटपौर्णिमा होती आणि....

आदल्यादिवशी संध्याकाळी तुझा ऑफिसमध्ये फोन...

"अरे बघ ना माझी काहीच तयारी नाहीय...आता मी काय करू ?".. भलीमोठी यादीच सांगितलीस फोनवर ....

तुझी धडपड पाहून खरतर मला जाम हसायला आले.....



मी स्वतः मार्केट मध्ये जाऊन तुझ्यासाठी पूजेचे समान घेऊन आलो ....

त्या दिवशी किती सुंदर दिसत होतीस तू .......

लग्नाचा शालू नेसलेली सुंदर परीच !!!



पूजेला जाताना मी आणलेला मोठा धागा जास्त होईल

म्हणून तू दुसरा छोटा धागा सोबत नेलास......

पण...पण... तुला तो वडाला सात वेळा गुंडाळायला पुरलाच नाही...

म्हणून तू दुसरा धागा जोडून वडाचे सात फेरे पूर्ण केलेस....



घरी आलीस तेव्हा तुझे डोळे भरून आलेले....

काय झाल राणी.. का रडतेयस ....?

तू मला धाग्याचा प्रकार सांगितलास...



रडतच माझ्या कुशीत शिरलीस....

ए वेडाबाई....अग काही होत नाही त्याने...तो वड नसेल आला तुझ्या धाग्याच्या टप्प्यात...



पण हा तुझा वड आहे ना ....

त्याला तुझ्या दोन हातांची मिठीच पुरते....

सात जन्मासाठी...

आणि नाही पुरला तो धागा तर तर....

माझ्या काळजाचा धागा करून देईल तुला....

आणि तुझ्या ओठांवर ओघळलेले अश्रू मी ओठांनीच टिपले ...

शहारलेली तू ..अन तुझी ती गच्च मिठी.... किती आठवणी.....





राणी पण.....पण तू .......न सांगताच एक दिवस निघून गेलीस...

धागा आणि वडालाही ईथेचं सोडून.......

मी आणला होता तुला सात जन्म पुरेल एवढा धागा....

पण तू तो सोबत नेलाच नाहीस ...



आता रस्त्याने जाताना घराजवळचा वड ...

आणि माझी तू गुंडाळलेला धागा नजरेनेच शोधण्याची धडपड....!!

No comments: