Wednesday, September 22, 2010

आज खुप एकट-एकट वाटतय,

आज खुप एकट-एकट वाटतय,


जणु तुला शोधावस वाटतय,

नज़रेतुन तुला बघावस वाटतय,

मनातून थोडस रडावसही वाटतय…..



चिंब पावसात भिजावस वाटतय,

तुझ्या हाताला धरून नाचावस वाटतय,

ओल्या डोळ्यांनी तुला पहावस वाटतय,

पहाता-पहाता तुला सर्व काही सांगावस वाटतय…..



पण....

सर्व काही नुसत वाटतच रहातय,

नसून सुद्धा ह्या इथे, तू असल्यासारखी वाटतेस ,

तुझ्याशिवाय मन जणु वेड होऊन रहातय,

हळव्या मनाला कुठेतरी समजवावस वाटतय…..

No comments: