Thursday, May 19, 2011

जे घडेल ते सहन करायचे असतं..


जे घडेल ते सहन करायचे असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं

आयुष्य असचं जगायचं असतंकुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, कुठतरी थांबायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतंकुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं

आयुष्य असचं जगायचं असतंदु ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतंपंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,

आयुष्य असचं जगायचं असतंमरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतंइच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतंआयुष्य असचं जगायचं असतं............

ओळख नसते पाळख नसते,

ओळख नसते पाळख नसते,


असे आपणास कोणीतरी भेटते ,

मग एकमेकांची ओळख पटते,

त्याची आपली गट्टी जमते,

एकमेकांच्या मनातील भाषा कळते,

...इकडे-तिकडे मन वळते,

इतकी मग पक्कड बसते,

सहज तोडणे अवघड असते,

दूर रहाणे असह्य होते,

का असे हे नाते असते,

अशीच हि न तुटणारी जन्मोजन्मीची "मैत्री " असते

प्रेम तुझं खरं असेल तर...

प्रेम तुझं खरं असेल तर


जीव तुझ्यावर ओवाळेल ती

स्वत:च्याचं भावनांचं मन

शेवटी ती मारेल तरी कीती..भावना तुझ्या शुद्ध असतील, तर

तीही त्यात वाहून जाईल

मनावर अमृत सरी झेलत

तीही त्यात न्हाहून जाईल..विचार तुझा नेक असेल, तर

तीही तुझा विचार करेल

हृदयाच्या तिच्या छेडून तारा

सप्तसूरांचा झंकार उरेल..आधार तुझा बलवान असेल, तर

तीही तूझ्या कवेत वाहील

मग, कितीही वादळं आलीत

तरी प्रित तुमची तेवत राहील..आशा सोडण्या इतकं

जिवन निराशवादी नाही रे

तिला न जिंकता यावं इतकं

मानवी हृदय पौलादी नाही रे..पण, मित्रा जर ती नाहीचं आली

तरीही तू हार मानू नकोस

तू तर प्रामाणिकपणे खेळलास

आयुष्याला जुगार मानू नकोस..शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं

थांबत नाही ते कोणासाठी

घे भरारी पुन्हा गगनी

नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

.........

एक विनंती आहे......

एक विनंती आहे


दुरच जायच असेल तर

जवलच येऊ नका,

busy आहे सांगुन टालायाच असेल

तर वेळच देऊ नका

......एक विनंती आहे

साथ सोडून जायचच असेल तर

हाथ पुढे करुच नका ,

मनातून नंतर उतरायचच असेल तर

मनात आधी भरूच नका

एक विनंती आहे

अर्ध्यावर सोडून जायचाच असेल तर

आधी डाव मांडूच नका,

एक विनंती आहे

सवयीच होइल म्हणुन तोडायच असेल तर

कृपया नात जोडूच नका ,

फाडून फेकून द्यायच असेल तर

माझ्या मनाच पान उलगडूच नका.

Wednesday, May 18, 2011

तुझ्या नयनांच्या अग्नीमध्ये सजनी

तुझ्या नयनांच्या अग्नीमध्ये सजनी


मला प्रेमयद्य करावेसे वाटते

तुझ्या गोड हास्याच्या लहरींसंगे

मला वाहुन जावेसे वाटते....

तुझ्या मनाच्या कोण्यात हरवलेल्या

जाणीवांना पुन्हा जागवावेसे वाटते....नको तु रुसुन बसु अशी सजनी

मनाच्या त्या काटेरी कुंपणाशी

तोडुन टाक आज बंधने सगळी

मिळुन जा नदी बनुन सागराशी

तुझ्या दगडधोंड्यांच्या मार्गामधले

सगळे अडथळे हटवुन द्यावेसे वाटते...तुजविन अधुरा आहे खेळ सावल्यांचा

तुझ्या विरहाचे दु:ख उन्हापरी चटके

मोत्यांचे ते चमकणे खेळ शिंपल्यांचा

कोहिनुर मन माझे तुझ्यासाठी भटके

ना सावली ना शिंपले तुच माझे आपले

तुला पुन्हा आपलेसे करावेसे वाटते

तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता,

तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता,


तिच्या राधारूपी मनाचा वेगळाच कृष्ण होता.

तिच्या कक्षाच अमर्याद होत्या अन वेगवान गती,

माझे क्षितिजच होते तोकडे, अगदी हाताच्या अंतरावरती,

अन जीवनात चालण्याचा मार्गही भिन्न होता.

पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.तिच्याकडे बुद्धी होती, चातुर्य होतं,

रुपाची अन धनाची तर श्रीमंती होती,

माझ्याकडे बुद्धी सोडून इतर सगळ्याची नापसंती होती,

मग का वळवावे मत तिने तिचे,

हा परखडतेचा बाण तिचा तीष्ण होता.

पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.यावे तिने कधीतरी अन बोलावे जरा गोड,

हसताना दाबावी लाजेने डाळिंब फोड,

द्यावा हातात हात, सांगावी जन्माची साथ,

पण ती बुद्धीनेही जरा हुशार होती व्यवहारात,

तिने कसे मावावे माझ्या तुटपुंज्या प्रवाहात(पगारात),

समजत होते सारे तरी प्रीतीचा भाव मनी सूक्ष्म होता.

पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.मी कवटाळायचो जेव्हा तिच्या आठवांना,

ती वेगळ्याच बाहुपाशात असायची,

खरंतर मी संपायचो साऱ्यातून जिथून,

तिथून तिची सुरुवात व्हायची.

ती कोमलस्पर्शी, नाजूक नयनी,

सुवर्णकांती अप्सरा माझी नव्हती,

हा वास्तव मला मान्य होता.

पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.

मैत्री वाचून रडते.....

मैत्री वाचून रडते , मैत्री पासून हसते...


कळत नाही मला तू आशी का वागते..

मैत्री आस्ते दोन जीवाची जोडी..

त्यात फुलायची आस्ते सुंदरशी गोडी...

एक फुल तुटल म्हणून अशी का रुसते ..

नवे उमलणारे फुल आहे तुच्या अवती भवती ..

गोडी तीच आहे , मैत्री हि तीच आहे कधी आजमावून बघ..

तुझ्या कोमल पायाखालील काटे , स्वताच्या पाई घेणाऱ्या या मित्राला कधी समजून तर बघ...

रोज किती तू त्रास करून घेशील ..

ऐका मैत्रीच्या आठवणीत तू कितीना दुखावाशील...

थोडासा विचार कर , मनाला स्थिर कर ...

किती वेळ समजावशील त्याला , कधीतरी माझा विचार कर...

तुझ्या डोळ्यातील आश्रू बघवत नाही मला..

बघ त्या सूर्याकडे , तो सांगतोय काहीतरी तिकडे ...

" तुझी नृत्य कला हीच तुझा लक्ष्य आहे "

या कलेपाई तू विसर मला हि, तुच्या ध्येयाच्या पलीकडे , कारण ..

कळत नाही मला तू आशी का वागते

प्रेम असावं निरपेक्ष, आभाळासारखं निरभ्र

प्रेम असावं निरपेक्ष, आभाळासारखं निरभ्र


जीव ओतून केलेलं, निर्मळ आणि शूभ्रमावळत्या सूर्यासारखी ऊबदार असावी सोबतीची जाणीव

सगळे आसपास असले तरी भासावी एक उणीवसागरासारखा अथांग असावा विश्वास

दुसर्‍यासाठीच घ्यावा आयुष्याचा प्रत्येक श्वासहातातून वाळूसारखे निसटून जातात क्षण

अलगद हात हाती येतो सलते एक आठवणमनाच्या शिंपल्यात जपावा आठवणींचा मोती

अशीच फुलत रहावी साताजन्मांची नाती

क्षण ते आठवले , तुझ्या माझ्या भेटीमधले

क्षण ते आठवले , तुझ्या माझ्या भेटीमधले


तुझी तार जुळली होती , माझ्या कावित्येच्या ओळीमध्ये

आज कविता करतो , आठवून तुज रूप चंद्राच्या कोरी मध्ये

तुझा आवाज एकूण मन फिरत गगणामध्ये

तुझे दोन शब्द ऐकण्यासाठी रोज धडपडतो

तुला भेटण्यासाठी रोज तुला मी एक फोन करतो

तू फोन तर उचलत नाही व उत्तर हि देत नाही

तसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला ...वाटेवरच्या मंदिराच्या पायऱ्या अनोळखी होत्या मला

रोज संगती जायचो त्य मंदिरात , ज्यात होता तुझा जिव्हाळा

तू होती संगती तेव्हा विश्वास होता माझा हि तिच्या वरती

आता दुरूनच पाहतो त्या मंदिराच्या कळसावरती

जाता जाता त्या मंदिराच्या पायऱ्या पाहतो

त्या पायऱ्या वरती तू माझी वाट बघत बसायची तो क्षण आठवतो

क्षणभर त्याच जागेवर थांबतो , डोळ्यातील अश्रुना घट्ट धरतो...

तसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला...वाटेवरती एक वळणदार रस्ता येतो , तो माझ्या साठी खूप लांब लांब जातो

त्या वाटेवरती तासान तास फिरत होतो , तुला घरापर्यंत सोडत होतो

तुला जड पाउलांनी निरोप देत होतो , तुझी विचार पूस करत होतो

आता तुझी माझी भेट तर होत नाही , तुझ्या भेटीचा अंत मला पाहवत नाही

त्या वाटेवरती , तुझ्या आठवणीच्या भोवती , एकटा फिरतो त्य रास्त्यावर्ती

हाताच्या घड्याळाकडे पाहतो ,क्षणभर थांबतो ....

तसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला ...

तुझी माझी मैत्री म्हणजे एक परीस,

तुझी माझी मैत्री म्हणजे एक परीस,


स्पर्श करील ज्याला, होईल त्याचे सुवर्ण,

तुझी माझी मैत्री म्हणजे पुरण पोळी,

वरून कितीही भाजली, तरी आतून गोड पुरण,तुझी माझी मैत्री म्हणजे एक गुलाब,

काटे कितीही असले, तरी दरवळे सुगंध,

तुझी माझी मैत्री म्हणजे एक ज्योत,

अंधार कितीही असला, तरी तेवत राहे मंद,तुझी माझी मैत्री म्हणजे एक दोरखंड,

कितीही ताणली गेली, तरी बांधून ठेवे एकसंध,

तुझी माझी मैत्री म्हणजे फुलपाखरू,

जीवन जरी थोडे, प्रत्येक क्षणाचा घेई आनंद,तुझी माझी मैत्री म्हणजे एक सूर्य,

स्वतः जळत राही, दुसऱ्या देई प्रकाश,

तुझी माझी मैत्री म्हणजे रम्य पहाट,

अंधार क्षणात संपवी, दावी निळेभोर आकाश...

एक नाते असते मैत्रीचे,

" एक नाते असते मैत्रीचे,


तोडल्याने न तुट्नारे,

एक नाते असते अधिकाराचे,

अधिकाराने बोलण्याचे,

एक नाते असते मैत्रीचे,

एक मेकांच्या चूका समजुन घेणारे,

एक नाते असते विश्वासाचे,

विश्वास घात न करण्याचे,

एक नाते असते मैत्रीचे,

अंधारात ही काजव्या सारखे चमकणारे,

असेच एक नाते असु दे !!!

एक कविता तुझ्यासाठी...

एक कविता तुझ्यासाठी.....


तू दिलेल्या मैत्रीसाठी आणि मैत्रीतल्या त्या अनामिक प्रेमासाठी...!

एक कविता तुझ्यासाठी...

तुझ्या माझ्यापाशी व्यक्त झालेल्या त्या प्रत्येक अश्रुसाठी आणि खळाळून वहाणार्या तुझ्या हास्यासाठीही....!

एक कविता तुझ्यासाठी...

तुझ्यातल्या प्रौढपणासाठी आणि त्यात डोकावणार्या तुझ्या निरागस बालपणासाठी....!

एक कविता तुझ्यासाठी....

फक्त तुझ्याचसाठी....

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..


मी सुद्धा.. अडखळत..

जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..

अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..

पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..

एवढ्या खोलवर जाईल..

मुळापासून उखडलं तरी..

थोडी आठवण शिल्लक राहील..

ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..तुझी निरागसता संपून..

निष्ठुरता डोळ्यांत उरेल..

माझ्या डोळ्यांत मात्र..

काकुळतीने.. पाणी तरेल..

भयाण हे स्वप्न, कधी वास्तवातही उतरेल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..ठसठसणारी वेदना..

तुझीच आठवण करुन देईल..

वेडं.. मनाचं पाखरु..

पुन्हा तुलाच शोधत राहील..

अवघड प्रयत्नानं त्याचा मात्र जीव जाईल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..पुन्हा उभा राहीन..

तुझ्या पलीकडे असणाऱ्या..

अंतिम ध्येयाला पाहीन..

आयुष्य पुढचे, त्याच्या चरणांवर वाहीन..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..आयुष्याच्या पानांवर पुढे..

प्रेमाचं पर्व अधुरंच राहील..

तुझ्या उल्लेखाशिवाय माझं जीवनसुद्धा..

अपुरंच जाईल..

मरताना सुद्धा ओठांवर तुझंच नाव घेत जाईन..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..असं.. कधी वाटलंच नव्हतं..

कॉलेजला जाणार्‍या आम्ही चार चौघी

कॉलेजला जाणार्‍या आम्ही चार चौघी


चार चौघीत तो मलाच शोधायचा

मला शोधणारी त्याची नजर

माझ्या नजरेला भिडण्याची वाट पहायचा .........कधी मी हि अलगद नजर उचलून

न बघितल्या सारखं करायची

पण त्याच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य

माझ्या मनातली गोष्ट ओळखून जायचीकॉलेज ते घर प्रवास एकटीचाच

त्याला चुकउन मी निघायची

पण केसातली बंड खोर फुले

रस्त्यात पडून त्याला सांगायची .............कदाचित फुलांनाही त्याच प्रेम कळल असाव

म्हणूनच त्याला मनातल माझ्या कळत असाव

मनात काय आहे त्याला माहित होत

पण माझ मन मलाच कळत नव्हत .........प्रेम तर माझे ही होते

हे तर त्याला हि ठाऊक होते

माझ्या लाजण्यातच

त्याच्या प्रश्नाचे उत्तर होतेसुरु झालेल्या खेळाचा

नियम एकच होता

नजरांच्या खेळात हृदयातील शब्द

ओठांवर आणून द्यायचा नव्हतानजरेतील खेळ ते आमुचे

नजरांच्या पुढे जातच नव्हते

शब्द ही सारे आतुरलेले

ओठी येण्याच्या प्रतीक्षेत होते...नजरेचा खेळ हा सारा

नजरांच्या सागरात बुडाला

राहिली शोधत नजर माझी

तो अचानक दिसेनासा झाला..शोधत आहे नजर माझी..

त्याच्या परतण्याची

हृदयाचा ठोका चुकेपर्यंत

वाट पाहीन मी त्याची....नजरांच्या त्या खेळाची...

सुर नवा जुळताना.....

सुर नवा जुळताना


मन का कातर व्हावेजुन्या नात्यांना तोडताना

डोळे का भरून यावेतमाहित होते या वळनावर

आठवन तुझीच येणारतू दिसनार नाहिस तरीही

डोळे तुलाच शोधनारसुर नवा जुळताना

मागे मी नं पाहनारहोय ..! मी तूला विसरनार

पण ..! माहित आहे तूला अण् मलाहीमनात कुठेतरी खोलवर तूच तू असनार

Wednesday, March 30, 2011

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

दोघांच्याही मनात होतं,
दोघांनाही ते ठाऊक होतं
कुनी कधी काही बोललेच नाही…..
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

जाण्या-येण्याच्या वेळाही एक,
ठरुनच गेल्या होत्या बहुतेक
वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नजर भिरभिरते,एकमेंका शोधते;
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते
नजरेपलिकडे काही घडलेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नसेना का घडले मिलन परि…
आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी
नियतीचे कोडे कळ्लेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

राहिले जरी हे प्रेम अव्यक्त
मनी न उरली बोच हि फक्त
जगणे…..वाटणार ओझे नाही
ज़रि……. हे अबोल प्रेम फुललेच नाही !!

एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं ......

एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......

की सर्व जग त्याला सुंदर दिसू लागतं.
फुलांचा सुवास त्याला प्रफुल्लित करून टाकतो,
पक्ष्यांची किलबिल जणू त्याला मधुर गाणं वाटू लागतं...
जगणे हे तर आत्ताच सुरु झाले आहे याचा आनंद मिळू लागतो.
एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......

कामातील नीरसपणा जाऊन त्यात उत्साह येऊ लागतो,
काम काम न राहता तो एक खेळ आहे असे वाटू लागतं .
रात्रीच्या वेळी आकाश पाहताना एक वेगळीचं मजा येऊ लागते,
झोपल्यावर स्वप्नांच्या दुनियेत जगण्याची एक वेगळीच किमया वाटू लागते.

हे सर्व असचं घडत राहत
कारण

एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे....


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........

आयुष्यातली एकच इच्छा......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे

Wednesday, March 23, 2011

जीवनाचे मोल


जीवनाचे मोलजीवनाचे मोल, मला कळून आले
जेंव्हा माझे प्रेत, अवघे जळून आले

बघ उमलून आली, पहाटेची लाली
बोचर्‍या थंडीत येती, रोमांच गाली
बघ शुक्राचे रंग, कसे उजळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

डोंगरामागून सुर्याचे, लाल बिंब आले
गवताचे हिरवे पाते, ओलेचिंब झाले
दरीतले धुके बघ, विरघळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

पाखरांचा थवा बघ, रानात चालला
किलबिलाट त्यांचा, कानात चालला
वासरु बघ गाईकडे, पळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

बघ शाळेत पोरांचा, घोळका चालला
कोण आले कोण नाही, घोळ का चालला?
सरळ कोणी, कोणी मागे वळून चाले
जीवनाचे मोल, मला कळून आले

बघ आमराईची, ती गर्द सावली
गाई गुरे उन्हाची, तेथे विसावली
वासरु हुंदडून पुन्हा, तेथे वळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

तिन्ही सांजेला पावसाचे, चार थेंब आले
स्वागताला त्यांच्या, बाहेर कोंब आले
नको झळा त्यांना, उन टळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

बघ सांजेला ते, किती रंग झाले
ढग मावळतीचे, इंद्रधनूत न्हाले
हळूच चांदण्याचे थवे, उजळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

इथे श्वासांची मंदी आहे .....


इथे श्वासांची मंदी आहे .....जीविताचे नाक दाबले गर्दीने
नव्या अभ्रकास तोंड उघडणे
बंदी आहे ......
मोजकेच आहेत वाटून घ्या
इथे श्वासांची
मंदी आहे.............

गोर गरीब असाल तर मरून जा
इथे श्रीमंतांचीच चांदी आहे
लुटा किवा तुटून पडा
फाटक्याना हीच शेवटची
संधी आहे .............
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे....

श्वास तोडकेच तुझे
काड्यांचे कुंपण...
इथे वादळाना चढलेली
धुंदी आहे.................
ते ठेवतील जपून बरेच
त्यांचे वाडे
चिरेबंदी आहे.........
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे...

विकले जातील
खरीदले जातील
श्वास हे ....हिसकून
घेतले जातील
तू सावध राहशील किती
डोळ्या देखत ते
चोरले जातील

विश्वास राहील गहाण इथे
श्वासांचीच भूक नि तहान
मरण्याचे भाव वधारतील
नि जीवन होयील लहान
सावरशील किती प्राण
पाखरा ....
उडणारयांची नांदी आहे
एक घे मिळाला तर श्वास
कारभार इथे सुरु
अंधाधुंदी आहे .............
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे.

इथे श्वासांची मंदी आहे .....जीविताचे नाक दाबले गर्दीने
नव्या अभ्रकास तोंड उघडणे
बंदी आहे ......
मोजकेच आहेत वाटून घ्या
इथे श्वासांची
मंदी आहे.............

गोर गरीब असाल तर मरून जा
इथे श्रीमंतांचीच चांदी आहे
लुटा किवा तुटून पडा
फाटक्याना हीच शेवटची
संधी आहे .............
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे....

श्वास तोडकेच तुझे
काड्यांचे कुंपण...
इथे वादळाना चढलेली
धुंदी आहे.................
ते ठेवतील जपून बरेच
त्यांचे वाडे
चिरेबंदी आहे.........
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे...

विकले जातील
खरीदले जातील
श्वास हे ....हिसकून
घेतले जातील
तू सावध राहशील किती
डोळ्या देखत ते
चोरले जातील

विश्वास राहील गहाण इथे
श्वासांचीच भूक नि तहान
मरण्याचे भाव वधारतील
नि जीवन होयील लहान
सावरशील किती प्राण
पाखरा ....
उडणारयांची नांदी आहे
एक घे मिळाला तर श्वास
कारभार इथे सुरु
अंधाधुंदी आहे .............
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे.

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या
रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू
पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी
असावं...

छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर
निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने
माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव
....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं...ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या
रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू
पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी
असावं...

छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर
निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने
माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव
....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं...

न मागताच तू खूप काही दिलेस ..........

न मागताच तू खूप काही दिलेस ..........

पहाटेच्या गुलाबी थंडीत आठवणींची ऊबदार रजई दिलीस
चांदण्यांच्या शीतल प्रकाशात उजळणारी स्वप्नांची रात्र दिलीस

एका क्षणातच जणू आयुष्य जगण्याचा हर्ष दिलास
दुःखी निराश मनाला मायेचा हळूवार स्पर्श दिलास

आकांक्षांचे ढासळलेले मनोरे पुन्हा एकदा उभे केलेस
हरवलेले सूर छेडूनी अंतरी प्रीतीचे गीत फुलविलेस

आयुष्यात ज्याची कमी होती ते सारे काही पदरात टाकलेस
एका कोमेजलेल्या कळीला जणू पुन्हा नवजीवन दिलेस

काही उरलेच नाही आता मागण्यासारखे ...

खरंच ... न मागताच तू खूप काही दिलेस !!!

आठवणीच काय ..केव्हा ही येतात..

आठवणीच काय
केव्हा ही येतात
तू दाखवलेल्या "सव्प्नाची"
आठवण करून देतात


तुझी आठवण येते आणि
मी "अश्रुच्या" पावसात भिजते
आभाळ फाटून वीज कोसलावी
तशी अवस्ता माझी होते
आठवण येताच सख्या तुझी
ओलावली ही पापन्याची कडा
वेडे "डोळे" उगीच पाहत आहेत तुझी वाट
अन अनावर होताच वहातयेत अश्रुंचे पाट

Thursday, March 10, 2011

एक पाखरू मनातलं,

एक पाखरू मनातलं,


खूप दिवसापासून जपलेलं,

आताशा कुठे भिरभिरू लागलेलं,एक पाखरू मनातलं,

कधी खूप आनंदून जाणारं,

तर कधी लगेच खट्टू होणारं,एक पाखरू मनातलं,

खूप खूप अगदी जीवापाड प्रेम करणाऱ,

अन तेवढ्याच रागाने लाल-लाल होणारं,एक पाखरू मनातलं,

पावसात ओलं-चिंब होऊन नाचणारं,

रणरणत्या उन्हात खूप कष्ट करणारं,एक पाखरू मनातलं,

मोठ्या कारणावरून मुसमुसून रडणार,

आणि छोट्या आनंदासाठी लढणार,एक पाखरू मनातलं,

कायम स्वप्नात रमणार,

वास्तवाशी बिनघोरपणे झगडणार,एक पाखरू मनातलं,

मायेच्या कुशीत अलगद शिरणार,

मोठ होऊन समजुतदारपणे थोपटणार,एक पाखरू मनातलं,

आवडतं गाण हळुवार गुनगुनणार,

स्वतःच अस्तित्व ताकदीने शोधणार ,एक पाखरू मनातलं,

आपल्या माणसाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल,

तितक्याच तन्मयतेने वेगळी वाट नव्याने हुडकणार,एक पाखरू मनातलं,

वाईट अनुभवांना भेदरणार,

अन दिलखुलासपणे हसत सर्वांगाने स्वीकारणार,एक पाखरू मनातलं,

खूप घाबरून भुरकन उडणार,

पण "वेड" होऊन आकाशाकडे झेपावणार,एक पाखरू मनातलं,

एक होती मैत्रीण

एक होती मैत्रीण


होती ती जिवलगहसवत होतो एकमेकांना

ओरडत होतो एकमेकांनाबोल्याशिवाय राहवत नव्हते

भेटल्याशिवाय जमत नव्हतेप्रेम माझ्यावर करत होती

मैत्रीसाठी गप्प बसत होतीपण केली मी चूक मोठी

न मिळणारे दिले प्रेम तिलात्या प्रेमाने मैत्रीचा वध केला

नकळत तिने मैत्रीचा शेवट केलाआता हसायला जमत नाही

डोळ्यातून पाणी येत नाहीपुन्हा अशी मैत्रीण भेटणार नाही

या जन्मी तरी मी मैत्री करणार ना

असं.. कधी वाटलंच नव्हतं..??

असं.. कधी वाटलंच नव्हतं..??


जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..

अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..

पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..

एवढ्या खोलवर जाईल..

मुळापासून उखडलं तरी..

थोडी आठवण शिल्लक राहील..

ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

तुझी निरागसता संपून..

निष्ठुरता डोळ्यांत उरेल..

माझ्या डोळ्यांत मात्र..

काकुळतीने.. पाणी तरेल..

भयाण हे स्वप्न, कधी वास्तवातही उतरेल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

ठसठसणारी वेदना..

तुझीच आठवण करुन देईल..

वेडं.. मनाचं पाखरु..

पुन्हा तुलाच शोधत राहील..

अवघड प्रयत्नानं त्याचा मात्र जीव जाईल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मी सुद्धा.. अडखळत..

न्हा उभा राहीन..

तुझ्या पलीकडे असणाऱ्या..

अंतिम ध्येयाला पाहीन..

आयुष्य पुढचे, त्याच्या चरणांवर वाहीन..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

आयुष्याच्या पानांवर पुढे..

माचं पर्व अधुरंच राहील..

तुझ्या उल्लेखाशिवाय माझं जीवनसुद्धा..

अपुरंच जाईल..

मरताना सुद्धा ओठांवर तुझंच नाव घेत जाईन..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

असं.. कधी वाटलंच नव्हतं

आयुष्य हे.........!!

आयुष्य हे.........!!


जीवन एक शाळा म्हणून...

जन्मभर शिकत राहिलो...

मोठा न होता आले कधी....

फक्त happy birthday ऎकत वाढत राहिलो.कोणाला न देऊ शकलो काही .....

जन्मभर मी मागत राहिलो...

आला दिवस गेला तैसा.....

घटका फक्त मोजत राहिलो.गुन्हा न करताही.......

शिक्षा फक्त भोगत राहिलो....

अहो......! वाईट नाही मी खरच..........!!

आयुष्यभर पटवून देत राहिलो.एकामागून एक गेले.........

नवे नाते जोडत राहिलो.......

भेटेल का कोणी जीव देणारा.....

हेच फक्त शोधत राहिलो.उरला न भरोसा कुणाचा........

फक्त दिलासे मनाला देत राहिलो...

रडण्याची न मुभा मला....

दुसर्यांचे डोळे पुसत राहिलो.शपथेवरचे खेळ इथले.......

खेळत आणि हरत राहिलो.......

जखमेवरती हात ठेउनी..........

आयुष्यभर हसत राहिलो

एक मैत्री अशी हवी

एक मैत्री अशी हवी ........


पाहता क्षणी मन भरून यावे.......एक

मैत्री अशी हवी ........

मन तिच्याच भोवती सतत रुंजी घलाव.........एक

मैत्री अशी हवी ........

मनातल्या गोष्टी तिला संगीतल्याशिवाय मन हलके न

व्हावेएक मैत्री अशी हवी ........

अवगुनाकडे हक्काने बोट

दखावानारी

आणि आदराने चूका कबूल करणारीएक मैत्री अशी हवी

........

प्रेमाचा स्पर्श असलेली

प्रेमाने चेहर्यावर हस्याची कारंजी

फुलावनारीएक मैत्री अशी हवी ........

विश्वसाने विश्वास

सम्पादुन

मैत्रिच्या नात्याला एकरूप करणारीएक मैत्री अशी हवी

........

भविष्यत कितीही नाती जोडली गेली

तरी मैत्री या नत्याला अंतर

न देणारी ....

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.


1) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.2) आयुष्यातल्या

कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.3) मनात आणलं तर या जगात अश्यक्य

असं काहीच नाही.4) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.5) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.6) आवडतं तेच

करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.7) तुम्ही किती जगलात

ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.8) अश्रु येणं हे माणसाला

ह्रदय असल्याचं द्योतक आहे9) कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल , तर

अपयश पचविण्यास शिका.10) स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी मनुष्य

इतरांच्या त्रुटींकडे लक्ष

" मन "


आथांग, विशाल असं काहीतरी असतं

वेगलं काही नसून ते अपलं मन असतं;

अस्थिर, चंचल असं काहीतरी असतं,

खरंच ते आपलं वेडं मनंच असतंकाही क्षण फारंच सुंदर असतात,

ते मनाच्या गाभार्यात साठवायचे असतात,

काही गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात,

त्या फक्त आपल्या मनाशी बोलायच्या असतात,जगण्यासाठी प्राणवायु मानसास लागतो,

सोबत एक चांगलं मनसुद्धा लागतं,

जगण्यासाठी मनासंसुद्धा एक छानसं स्वप्नं लागतं,

तुटलं जर ते, तर बिचार्‍या मनालाही लागतंक्षणात हसवणारं,क्षणात रडवणारं हे मनंच असतं,

रहस्यमयी,फसव्या गोष्टींन्चं ते गोदामंच असतं,

जर हे मन कायम रिकामंच राहिलं असतं

तर वाटतं किती बरं झालं असतं,किती बरं झालं असतं....

पाने आज आयुष्याची

पाने आज आयुष्याची


थोडी चाळून पाहिली

चोळामोळा झालेल्या

त्या पानांवर ...

सुरकुत्या पडलेली

अक्षरे फक्त तेव्हडी राहिलीबालपण पहिल्या पानावर

हसत खेळत होत ...

वाटचाल करीत ...नाजूक पावलांनी

तरुण एक पान....

२५ पाने मागे सोडून ..

दिमाखात स्वताच्या पायावर

एकटच उभ होत....जबाबदारीच एक पान..

दुमडलेल ..थकलेल भासल

शब्द परिवार माझा ...

म्हणत त्याच पानाला

वोघळलेला घाम पुसत हसलं..एकावर एक बरीच पाने होती

काही कोरी करकरीत

न वाचलेली ....

काही वाचून वाचून ....

मळलेली ...शेवटास एक पान ..

खूप जीर्ण झालेलं

फाटलेल ...स्वतावर लिहिलेल्या

शब्दांना कस बस ..त्याने

अंग चोरून सवरलेल ...पण ते दुखी दिसलं नाही..

किवा हसलही नाही ...

शेवटी असल्यावरही..

सुरवात आहे ...

असच म्हणताना भासल काही..बऱ्याच पानावर मला

काही जागा सुटल्यागत दिसल्या

पण त्याही तेवढ्याच ...

समाधानी वाटल्या .....

Thursday, February 10, 2011

मैत्री म्हणजे काय असतं?


मैत्री म्हणजे काय असतं?
एकमेकांचा विश्वास असतो?
अतूट बंधन असत? की
हसता खेळता सहवास असतो?
मैत्री म्हणजे मैत्री असते,
व्याख्या नाही तिच्यासाठी;
अतूट बंधन नसत,
त्या असतात रेशीमगाठी
मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी;
मैत्री करावी सोन्यासारखी,
तावुन-सुलासुलाखून चमचमणा;
मैत्री करावी हिर्या सारखी,
पैलू पडताच लख-लखणारी;
मैत्री असावी पहाडासारखी,
गगनाला भिडणारी;
मैत्री असावी समुद्रासारखी,
तलाचा थान्ग नसणारी;
मैत्री म्हणजे समिधा असते,
जीवन यद्न्यात अर्पण झालेली;
स्वताच्या असन्याने सुद्धा
मन पवित्र करणारी;
मैत्री हे नाव दिलय
मनाच्या नात्यासाठी;
अतूट बंधन नसत त्या असताततुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटू लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटू लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपून ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवू नयेत म्हणून
काळजाच्या तिजोरीत लपून ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असच राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतून
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात

बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी

बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी
काही पुसटश्या तर काही दिसेनाश्या......

काहींना लागलेला गंज
तर काही अडगळीत पडलेल्या
वर्षानुवर्ष जपलेल्या
पण म्हाताऱ्या झालेल्या.....

काही अलीकडच्याच स्वप्नात झुलत होत्या
स्वताला न्याहाळत आकर्षित करत होत्या
त्यातही काही गोड तर काही कडू होत्या
काही सुखद तर काही दुखद......

जवळ कोणी नसताना
सोबत असल्याचा धीर देतात
फेकल्या कितीही दूर तरी
जीवनाचा आधार बनतात.....

किती विचित्र असतात या आठवणी
पण एकांतात साथ आपली देतात.....
मनात दुख असतानाही
चेहऱ्यावर हास्य आणतात
 
 
 
जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........

नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........

पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही....

येशील ?अंधारात वाट शोधता येत नाही,
आणि कधीही परत येत नाही
त्याची कुणीच वाट बघत नाही....
तरीही मी अंधारात चाचपडायचं,
आणि वाट बघत रहायची..... तुझ्या येण्याची !

तू जाताना रणरणत्या उन्हाने
तुझे पाय भाजले असतील,
माळरानीचा उनाड वारा
तुझ्या केसांशी भांडला असेल....
आता मात्र तोच वारा
फुलांचा सुगंध गोळा करतोय,
आणि हिरव्यागार गवताचा स्पर्श
चुकलेल्या पावलालाही सुखावतोय... येशील ?

तेव्हा गावची नदी आटली होती,
आणि बहुतेक आपली मैत्री आणि गप्पाही...
आता काठांनाही पालवी फुटली आहे,
आणि शब्दांचा तर पूरच पूर....

बाकी काही नाही तरी
शब्दांना शब्दांची जोड द्यायला.... एकदा तरी येच !

दोन क्षण.....


मी पाहिले तुला
तु न् पाहिले मला,
चातकाने किती पाहिली वाट
ढ़ग मात्र न् बरसताच गेला!

कळया नुकत्याच उमललेल्या
पहाटेच्या दवाने न्हालेल्या,
तुज़्या ओन्जळित् हव्या होत्या खरया
पहिल्या मी सन्ध्याकाळि कोमेजलेल्या!

छोटासाच मी एक
खऴाऴता आहे झरा,
पारिजातक वाहण्याची होती आस
पाहिला मी रिक्त सडा!

सूर्यसुध्दा थाम्बलेला
चन्द्राच चान्दण प्यायला,
तुला खरच का वेळ नव्हता
मला दोन क्षण पहायला?

ह्याला जीवन ऐसे नाव...

 मृत्यू ज्ञात तरीही त्याची, बेगडी ती धाव.

वा‌र्‍यावरती फ़ुल आणि चंद्रावरती झूल
खिश्यांमधे कोंबलेला पोटासाठी पाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

भरभर वाटभर चांदण्यांचा थर
कुणी म्हणे धुळ त्याला घेई माथ्यावर
घामेजल्या अंगाचा हा कुणा पेहराव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

चुल्ह्यावर भाकरीची थाप त्याला येई
नळावर पाण्यासाठी धाप त्याला येई
कमाई काय? दारावर तेव्हडच नाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

नव काय, जुन काय, वाहतं ते पाणी
साचलेल्या स्वप्नांमधे जाते जिंदगानी
सरड्याची ठरलेली कुंपणाची धाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

थकलेल्या देहाला ह्या फ़ुंकराची आस
बायको देते चहा बसं तेव्हडा वाटे खास
हातात घेतो रिमोट जरा M TV लाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

Friday, January 28, 2011

जीवन असंच जगायचं

जीवन असंच जगायचं
काहितरी वेगळ करायचय........

ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय
पाणवठा जरी गढुळ असला तरी
पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.

काहितरी वेगळ करायचय........

आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय
पानांच्या जाळीवर बसुन उडायचय
मिटलेल्या श्वासांना आता
अस्तित्वातात आणायचय.

काहितरी वेगळ करायचय........

स्वप्नांच्या देशात भटकायचय
प्रयोगानिशी शोधायचय
भवनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय.

काहितरी वेगळ करायचय........

चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय
माती रुक्ष असलि तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय

जीवन असंच जगायचं

जीवन असंच जगायचं
काहितरी वेगळ करायचय........

ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय
पाणवठा जरी गढुळ असला तरी
पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.

काहितरी वेगळ करायचय........

आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय
पानांच्या जाळीवर बसुन उडायचय
मिटलेल्या श्वासांना आता
अस्तित्वातात आणायचय.

काहितरी वेगळ करायचय........

स्वप्नांच्या देशात भटकायचय
प्रयोगानिशी शोधायचय
भवनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय.

काहितरी वेगळ करायचय........

चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय
माती रुक्ष असलि तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय

जीवन असंच जगायचं

जीवन असंच जगायचं
तुझी नि माझी मैत्री एक
गाठ असावी
कुठल्याही मतभेदाला तेथे
वाट नसावी
मी आनंदात असताना हास्य तुझे असावे
तू दुःखात असताना अश्रु माझे असावेत
मी एककी असताना सोबत तुझी असावी
तू मुक असताना शब्द माझे असावेत

Monday, January 24, 2011

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नंसगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..फुलणारं हसणारं प्रत्येक फूलंकधी चुकलं तर सावरणारं पाऊलंआठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळहवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवाअन् जणू दरवळणारा मारवाअंगावर घ्यावा असा राघवशेलाएकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...ऍकत रहावी अशी हरीची बासरीअस्मानीची असावी जशी एक परी...मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपीदु:खावरची हळुवार जादूची झप्पीमैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हातनेहमीकरता असणारी तुझीचं साथ

काही माणसे असतात खास

काही माणसे असतात खास


जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,

दुःख आले जिवनात तरीही

कायम साथ देत राहातात.काही माणसं मात्र

म्रुगजळाप्रमाणे भासतात,

जेवढे जवळ जावे त्यांच्या

तेवढेच लांब पळत जातात.काही माणसे ही गजबजलेल्या

शहरासारखी असतात,

गरज काही पडली तरच

आपला विचार करतात,

बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात

काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.मात्र काही माणसं ही

पिंपळाच्या पानासारखी असतात,

जाळी झाली त्यांची तरी मनाच्या

मैत्री करत असाल तर

मैत्री करत असाल तर


पाण्या सारखी निर्मळ करा

दूरवर जाऊन सुद्धा

क्षणों क्षणी आठवेल अशी करामैत्री करत असाल तर

चंद्र तारे यां सारखी अतूट करा

ओंजळीत घेवून सुद्धा

आकाशात न मावेल अशी करामैत्री करत असाल तर

दिव्यातल्या पणती सारखी करा

अंधारात जे प्रकाश देईल

हृदयात अस एक मंदीर करामैत्री करत असाल तर

निसर्गापेक्षा ही सुंदर करा

शेवट पर्यंत निभावण्या करता

लाख क्षण अपूरे पडतातआयुष्याला दिशा देण्यासाठीपण,

""लाख क्षण अपूरे पडतात


आयुष्याला दिशा देण्यासाठी

पण, एक चुक पुश्कळ आहे

ते दिशाहीन नेण्यासाठी,,,,,,,,,,,,,,,,!

किती प्रयास घ्यावे लागतात

यशाचं शिखर चढण्यासाठी

पण, जरासा गर्व पुरा पडतो

वरुन खाली गडगडण्यासाठी,,,,,,,,,,,,!

देवालाही दोष देतो आपण

नवसाला न पावण्यासाठी

कितींदा जिगर दाखवतो आपण

इतरांच्या मदतीला धावण्यासाठी,,,,,,,,,!

किती सराव करावा लागतो

विजश्रीवर नाव कोरण्यासाठी

पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो

जिंकता जिंकता हरण्यासाठी,,,,,,,!

कितीतरी उत्तरं अपुरी पडतात

आयुष्याचं गणित सुटण्यासाठी

कितीतरी अनुभवातनं जावं लागतं

आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी,,,,,,,,,!

विश्वासाची ऊब द्यावी लागते

नात्याला जिवनभर तारण्यासाठी

एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे

ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी

Thursday, January 20, 2011

आठवणींचे कपाट ...


आठवणींचे कपाट ...


काय कराव काही सुचत नव्हत
काम तर होत पण करायचं नव्हत
शांत बसायला कधी जमलच नाही
बोलायलाही तेव्हा जवळ कुणी नव्हत

घरभर उगीच मग तसाच फिरत राहिलो
अडगळीच्या खोलीत जरा हळूच शिरलो
समोरच दिसलं ते छोट जून कपाट
उघडावं की जाव हाच विचार करत राहिलो

न राहवून शेवटी मी उघडलंच ते
करकरल थोड ... थोड डगमगल ते
धुळीचा एक लोट मग हवेत उठला
जळमट काढून नीट निरखल ते

काय काय नव्हत त्या एवढ्याश्या कपाटात
अख्ख बालपण माझ ठासून भरलेलं त्यात
एक एक कप्पा एक किस्सा होता सांगत
साठवायलाही आज पण जागा नव्हती घरात

मी जिंकलेल्या त्या पिशवीभर गोट्या
भातुकलीच्या खेळातल्या पितळेच्या वाट्या
रंगबिरंगी जमवलेल्या आता फुटलेल्या काचा
थोडे शंख-शिंपले, थोड्या लगोरीच्या चपऱ्या

कोपऱ्यात जुन्या पुस्तकांची थोडी थप्पी होती
रंगवलेल्या चित्रांची एक वहीही होती
लाकडी डब्यात एका तांब्याची नाणी होती
एक हत्ती, एक घोडा, एक बैलगाडीही होती

सारे किती क्षुल्लक किती स्वस्त होते
चार दोन आण्यांच्या किमतीलाही नव्हते
लाखमोलाचे क्षण परी त्यात होते गुंतलेले
कसे आज सांगू किती निसटले होते

दिवसभर तसाच मी तिथेच रमलेला
स्पर्श होता साऱ्याचा लहानगा झालेला
हाक मारली कुणी तेव्हा भानावर आलेला
आठवणींचे कपाट मनी बंद करून निघालेला ...

आठवणींचे कपाट मनी बंद करून निघालेला ...

जन्मी पुढच्या चालू आपण !!! फुले पाकळी मन मोहणारी
कोमजली आहे या वसंतात
या जन्माची उजाड़ बाग़
जन्मी पुढच्या फुलवू आपण !!!

आठवून भेट प्रथम आपली
आजुनही होते हृदयात कम्पन
सात पावले या जन्मातली
जन्मी पुढच्या चालू आपण !!!

रंग गुलाल उधळले सारे
रंग विहीन जीवन झाले
या जन्मी न रंग्लो जरी
जन्मी पुढच्या रंगु आपण !!!

भातकुलीचा खेळ हा
मोडला जरी अर्ध्यावर्ती
या जन्मातले राजा राणी
जन्मी पुढच्या होऊ आपण !!!

एकत्र पुन्हा येण्यासाठी
चल आता संपू आपण
नाहीतरी कुठे जगतोए एकटे
जन्मी पुढच्या जगु आपण !!

कधी काळी मी तुझा श्वास होतो..


 मी तुझ्यावर जेव्हा प्रेम करायचो
काय माहित काय मी करायचो...
तुझ्याच स्वप्नात मी जगायचो
आठ्वानित तुझ्या मी मरायचो...

पण आता का असे भासत नाही
तुझ्या नेत्रात हल्ली तो भाव असत नाही...
स्वप्न पड़न्यासाठी झोपायचा प्रयत्न करतोए
झोप तर नाही म्हणुन आठ्वानित नुस्त मरतोए...

काय ग करू मी जगता पुन्हा येत नाही
तुझ्या माझ्या मधे जो बांध तो कळत नाही ...
तू फ़क्त दखावतेस की तुला सुध्हा कळत नाही
जानतेस तू सारं पण मुद्दाम तू वळत नाही ...

प्रेम करत राहलो मी आजवर पाहित
डोळे बंद करून घाव राहलो सहित...
तूच म्हणायचिस प्रेमात जगायचे असते मरायचे नाही
पण जगणारेच घात करतात येथे मरणारे नाहीत ...

मी तर तुझा प्राण होतो
इतका कसा मी खोटा झालोए...
तुट्लेल्या तुझ्या ह्रुदयाचा
चुकीने पडलेला ठोका झालोए ...

कधी काळी मी तुझा ख़ास होतो
का आता परका झालोए...
कधी काळी मी तुझा श्वास होतो
आता मात्र ठसका झालोए...

विराहाच्या या जगात


विराहाच्या या जगात
असच काही होत असते
बाहेर कुणी हसत असते
आत कुणी रडत असते


काटयांनी भरलेल्या वाटेवर
मूकाटयाणे चालTयचे असते
पायाला रुतला जरी कटा
फुलाचा स्पर्श दाखवायचे असते


मग नको असते ति पहाट
नसते आपली ति सायंकाळ
उरतो फ़क्त आपल्या हक्काचा
रक्तबंबाळ करणारा भुतकाळ


पण ते मला मान्य आहे
तो तुझ्या सारखा ह्रदय मोड़त नाही
कितीही वेदना दिल्या तरी
मला एकटे सोडत नाही...


सर्वे ह्रदय तोड़णारे ऐकून घ्या
तुमचाही कधी हाच हाल असंणार आहे
रडाल जेव्हा तुम्ही तेव्हा
आम्ही सर्व हसणार आहे


त्या हसू मागे किती अश्रु आहेत
तेव्हा तुम्हा लोकांना कळणार आहे
याल धावत तुम्ही आमच्या बाहुत
अणि आम्ही मागे वळणार आहे


पण खरं प्रेम करणारे
कधीच असं नाही करू शकत
कितीही स्वतः रडले तरी
त्या डोळ्यात अश्रु नाही बघू शकत


त्या पणावलेल्या डोळ्यांना मग
आपल्या हास्याने सुकवायचं असतं
मन कितीही रक्त रडले तरी
चेहर्यावर हसू उम्लायचं असतं


विराहाच्या या विश्वात
असच सारे जगत असतात
बाहेर कुणी हसत असतात
आत सर्वे रडत असतात ...


आत .....
सर्वे .....रडत असतात

"कदाचित तुला माझी आठवण येईल !


"कदाचित तुला माझी आठवण येईल !"

खिडकीत जेव्हा उभा तू असशील
ऐकू येईल पानांची सळसळ
काही शब्द ओळखीचे वाटतील
दबक्या आवाजातले, अधीर मिलनाचे
बघ त्यांना ऐकताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

चहाचा कप ओठी तू लावताना
अचानक तुझ्या लक्षात येईल
अजूनही तिच्या ओठांचे ठसे
कपावर उष्ण उसासे घेत आहेत
बघ त्यांना जाणवताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

एकट्याने बाईक चालवताना
मंद झुळूक कानाशी खेळेल
स्पीड-ब्रेक जवळ ब्रेक मारताच
कुणी घट्ट बिलगल्याचे जाणवेल
बघ तो स्पर्श आठवताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

मुसळधार पाऊस असतानाही
पानांवरचे ओघळते थेंब पाहून
तिच्या निथळत्या केसांमधून
भिजलेले ते क्षण, तुला स्मरतील
बघ त्यांना स्मरताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

रात्री गोड झोपेत असताना
हलकेच कुणी स्पर्शून जाईल
पावलांना तुझ्या स्पर्श होता,
ती असल्याचा भास होईल
बघ तो भास होताच, कदाचित तुला माझी आठवण येईल !

मी काही जगात पहिला नाही


मी काही जगात पहिला नाही
ज्याच्या प्रियसीच लग्न झालाय
आता दु:ख करण्यात काय अर्थ
ती थोडीच परत येणार आहे
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी माझ्या मनाला समज घातली
पण, थोडा वेळ तर लागणारच
सार काही एका क्षणांत नाही संपत
या सारया लोकांना कोण सांगणार
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी जीवाच बर वाईट नाही करणार
मला पण भरपूर जगायचं
तिने मला प्रेमात नकार दिला म्हणून काय
मला अजून बरच काही बघायचं
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी कधी गप्प गप्प राहतो
याचा अर्थ मी तिचा विचार करतो असा
सारेच मला समजावण्याचा प्रयंत्न करतात
तुला हे वागण शोभत नाही असा म्हणतात
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

बाहेरच्या लोकांच एवढ मनावर घेत नव्हतो
पण, आता घरच्यानिहि सुरवात केली
काय झाल जरा सांगशील का आम्हला
का तिच्यासाठी तू हि अवस्था झाली
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

तिच्याएवढी ती सुंदर नसलीतरी
कोणीतरी नक्कीच असेल माझासाठी
अण, मी पण तिच्याच शोधात आहे
जिच्यासोबत देवाने बांधल्या सातजन्माच्या गाठी
(कारण आठव्या जन्मी फक्त ती हवी)

And that time no more compromise

म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

पण तुझ्यासाठी सखे मी तुझाच त्याग करेन ....


माहित आहे मला,
 माहित आहे मला तुझ विण हे जीवन व्यर्थ ठरेल ,
पण तुझ्या साठी सखे मी तुझाच त्याग करेन....
पण तुझ्या साठी सखे मी तुझाच त्याग करेन....


तू दिलेल्या वचनांपैकी एक वचन होत,तुला सुखी ठेवायच ,
म्हणूनच...........
म्हणूनच धाडस केल सखे तुला नाही विच्यारायच ,


इच्छा नाही.
इच्छा नाही मला डोळ्यात तुझ्या अश्रु पहायची म्हणूनच वेळ आली आज तुझा निरोप घेण्याची ,
मला स्वार्थी म्हणनार्यानी खुशाल स्वार्थी म्हनाव...................
मला स्वार्थी म्हणनार्यानी खुशाल स्वार्थी म्हनाव...................
पण देवारयात देव म्हणुन बसनार्याने एखादा तरी मानुस म्हणुन बघाव ,


मी वेडा आहे ,
हो मी वेडा आहे फ़क्त तुझ्या प्रेमासाठी ,
मला वेडा म्हणनार्यानी खुशाल वेडा म्हनाव ,
पण वेडा म्हनतानाही मझ्यातल शाहाणपण जनाव,


मला माहित आहे तुझी प्रत्येक आठवण मला रडवेल
पण तुझ्यासाठी सखे मी तुझाच त्याग करेन ........