अजब आहे रसायन
हे आतलं वेड मन....
दगड दगड म्हणता म्हणता
अचानक पाघळून जात हे मन....
कितीही बोललं तरी,
ऐकत नाही...
कितीही समजावलं तरी,
समजत नाही....
आपल्याच मनासारखं वागणार
त्याला पटेल तेच करणार
खरच, अजब आहे रसायन
हे आतलं वेड मन....
नेहमी क्षितीजापलीकडेच
बघत राहणार....
उडत्या पाखराप्रमाणे
मुक्तपणे फिरत राहणार..
ठेच लागून पडला तरी.
आपल्याच मनासारखं वागणार
त्याला पटेल तेच करणार
खरच, अजब आहे रसायन
हे आतलं वेड मन....
चारचौघात असताना
नेहमी एकट एकट राहणार
सगळे झोपी गेल्यावर
हा वेड्यासारखा ' जागा ' राहणार
'' नाही '' म्हटलं तरी झुरत राहणार
काहींही झाल तरी.....
आपल्याच मनासारखं वागणार
त्याला पटेल तेच करणार
खरच, अजब आहे रसायन
हे आतलं वेड मन....
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment