सय एक नाजुकशी
रेशमी ओल्या क्षणांची
सुटतांना हात तुझा
तेव्हा भिजल्या मनांची
सय एक नाजुकशी...
पापणीच्या कडा ओल्या
स्पंदनेही भिजलेली
ओथंबल्या हृदयात
कैक क्षणे रुजलेली
सय एक नाजुकशी.....
तुझ्या हाती चाफे कळी
थरारे तिची पाकळी
चिंब-चिंब श्वास होई
दरवळ भासे ओली
सय एक नाजुकशी....
दु:ख दुराव्याचे मनी
ओठांवर हसू फुले
निरोपाच्या त्या क्षणात
अडकले मन खुळे
सय एक नाजुकशी
रेशमी ओल्या क्षणांची
सुटतांना हात तुझा
तेव्हा भिजल्या मनांची
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment