Wednesday, September 22, 2010

ती माझ्या बरोबर..

दरवाजा उघडताच


ती अगदी माझ्या डोळ्यांसमोर दिसते

तिलाच पाहून हल्ली मी विचारात पडतो...

-

ती माझ्या बरोबर

अगदी कॉलेजला सुद्धा सोबत जायची

येताना सुद्धा माझ्या सोबतच यायची...

-

तिच्या सहवासात

वेळ अगदी हसत हसत निघून जायची

घरी पोहचलो कधी हे समजत नसायचे...

-

दिवसभर आम्ही

वेड्या सारखे बाहेरच भटकत रहायचो

फिरता फिरता अचानक संद्याकाळ व्हायची...

-

तिच्या प्रेमात

मी मला स्वतःला विसरत चाललो होतो

तिच्यामुळेच मी सर्वांशी जिंकत आलो होतो...

-

काय सांगू तुम्हाला

हल्ली मी घराचा दरवाजा सारखा उघडतो

दरवाजा उघडला की, ती अगदी समोर दिसते...

.

.

.

माझी सायकल हो, अगदी समोर दिसते...

No comments: