Friday, September 17, 2010

" Hello .... Hello .... "

" Hello .... Hello .... "


" चल निघते मी आता ....

खूप उशीर होतोय ....

आज मुलाचा वाढदिवस आहे ....

सारखा त्याचा फोनही येतोय .... "



" अरे व्वा ! " मी म्हणालो

" लवकर पळ मग आता ....

माझ्याही wishes नक्की सांग ....

सांग हा ! न चुकता .... "



" हो हो नक्की सांगेन .... "

ती जरा घाईतच निघाली

" केकही घ्यायचाय अजून .... "

जाता जाता म्हणाली



काही वेळ असाच मग कामात गेला

नंतर थोडा कंटाळा आला

बघुया बाहेर काय घडतंय म्हणत

सहज टि. व्ही. चा रिमोट दाबला



" ब्रेकिंग न्यूज .... ब्रेकिंग न्यूज .... "

सगळ्या वाहिन्यांवर बातम्या त्याच

नवीन नवीन मथळ्या मागे

सांगत होते कथा जुन्याच



नंतर अचानक लक्ष गेल

स्क्रीन वरील आडव्या स्क्रोलवर

" लोकल मधून पडून महिलेचा मृत्यू "

घडला होता थोड्या अंतरावर



मध्यमवयीन, रंग सावळा,

किरकोळ बांधा, अंगावर साडी हिरवी,

गळ्यात ID - Card, आणि ऑफिसची Bag,

इतर सामानासोबत हातात केकची पिशवी



अरे ... अस कस ....

आत्ताच ती माझ्याशी बोलून गेली

क्षणभर सार सुन्न झाल

मग माझ्या मनाची मी तयारी केली



खूप खुश होती ती आज

मुलाचा वाढदिवस होता तिच्या

तोही अजून वाट बघत असेल

असच घडायचं होत ... या दिवशी आजच्या



काय कराव आता ... काही सुचेना

श्वासही मधेच कोंडत होता

तिच्यासोबतचा एक एक क्षण

डोळ्यांसमोर फिरत होता



किती क्षणिक असत सार

जुनी मैत्री, जुनी नाती-गोती

मृत्यू ... हेच अंतिम सत्य

मनी असेच तेव्हा विचार किती



फोनची बेल मग अचानक वाजली

" Hello, अरे पोहोचले घरी मी मगाशी ...

माझा मुलगा फोनवर येतोय ...

त्याला बोलायचय तुझ्याशी ... "



" Hello .... Hello .... "

No comments: