कधी कुणाला पाहून माझं मन एवढं दाटलं नव्हतं,
मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....!
अनमोल होते ते क्षण तुझ्या सवे घालविलेले,
नजरे नजरेतून बोलतांना मनातल्या भावना सांगितलेले,
त्याच क्षणांचा मी कधी गुलाम होईल वाटलं नव्हतं,
मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....!
रम्य होती ती पहाट तुझ्या नजरेतून पाहिलेली,
आणि ती ढळती सांज तुझ्या सवे घलाविलेली,
तुझ्या विना जीवन एवढं नीरस होईल वाटलं नव्हतं,
मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....!
आज नाहीस तू माझ्याकडे आहेत फक्त तुझ्या आठवणी,
हसावीणार्या रडावीणार्या हळव्या अश्या त्या आठवणी,
आठवणीनच्या पुरात मी वाहून जाईल वाटलं नव्हतं,
मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....!
अस्तित्वासाठीही आज तुझी उणीव भासेल वाटलं नव्हतं,
मला देखील प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं....
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment