Wednesday, September 22, 2010

कदाचित सारखा सारखा तुझ्या आयुष्यात मी येणार नाही

कोरड्या शुभेच्छा मी कधी तुला देणार नाही


उगाच मी तुझ्याशी गोड मी कधी बोलणार नाही

आनंदावर तुझ्या मी विरजण घालणार नाही

आणि सारखा तुझ्या आयुष्यात मी येणार नाही



जगाच्या गर्दीतला एकांत कुणालाच चुकला नाही.

कदाचित तुही त्याला मुकणार नाहीस

आपलीच माणस स्वार्थी कधी होतात, कदाचित तूला कळणार नाही.

वादळी सागरासारख्या तुझ्या मनाला तेव्हा, कदाचित किनारा दिसणार नाही.



मग,

तू जवळचं म्हणून कोणालातरी कॉल करावा म्हणशील.

मोबाइलमध्ये तुझ्या नावं वाचशील.

कदाचित अपेक्षित उत्तर तुला मिळणार नाही.



कदाचित होईल माझी आठवण .

पुन्हा मोबाईल चेक करशील.

पण, कदाचित माझं नंबर त्यात असणार नाही.



हतबद्ध होशील, तशीच बसशील.

डोळे घट्ट मिटशील,

अश्रू कधी वाहू लागतील तुला कदाचित कळणार सुद्धा नाही.



विचित्र स्वभावान्मागही चांगले भाव लपलेले असतात .

तूला कदाचित ते दिसणार नाहीत .



मग,

येईल कोणीतरी,

तुझ्या मिटल्या पापण्यानमागचं पाणी टिपायला .

तुला सावरायला,धीर द्यायला.



तेव्हा दचकू नकोस.

डोळे उघडून बघ.

आता मात्र तिथं 'नक्की' ."..................." असेन.



कदाचित सारखा सारखा तुझ्या आयुष्यात मी येणार नाही.

पण............................



.........................!!!!!

No comments: