आज एक वर्ष झालं
आज एक वर्ष झालं… आपल्या वेगळ होण्याला
थांबवू शकत नाही मी… डोळ्यामधल्या पाण्याला
अजूनही आठवतात मला.. आपण भेटलेल्या जागा
फुललेल्या असूनही मला… उजाडच वाटतात बागा
तुझ्यासाठी आणलेलं एक…. फुल तसच सुकून गेलं
कळलंच नाही मला कधी…. एक वर्ष निघून गेलं
सांग तरी एकदा मला ...माझी काय चूक झाली
आंधळ असतं न प्रेम तरीही….का जात आडवी आली
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment