Friday, September 17, 2010

अजूनही तू हवीशी वाटतेस

का अजूनही तू हवीशी वाटतेस


" एवढं " सारं झाल्या नंतरही .....



तुझे हात पहिले की ,

कधीकाळी झालेल्या स्पर्शांची आठवण होते

तुझ्या अशा कितीतरी गोष्टींशी निगडीत

अगणित गोष्ट आतःवत राहतात



तुझं नि माझं झालेलं शेवटचं भांडण

शेवटचे माझ्याशी बोललेले शब्द ,शेवटचा तो राग

आणि मग पुढे,मी लपवलेले

सुक्या पापण्यान्मागचे ओले अश्रू

अन हसऱ्या खळीमागाची कडवट दुःख ....



वाटायचं की तुझेही डोळे भरून आले असतील

कदाचित तुही गुडघ्यांत मान खाली घालून

रात्रभर बसली असशील

झोपेची वाट बघत,

मी बोलल्याचे भास होऊन सुखावली असशील..तुही. ..कदाचित....



कोणास ठाऊक कदाचित सुटकाही मिळाली असेल तुला

माझ्यापासून ...माझ्या स्वभावापासून ....



आता बरेच महिने लोटले

आता बऱ्यापैकी पुसलं गेलय दुःख

शेवटी काळ हे जालीम औषध असतं

" असल्या " जखमांवर ...

किंवा नसेलही कदाचित .....



का अजूनही तू हवीशी वाटतेस

" एवढं " सारं झाल्या नंतरही .....

No comments: