नसत केल तिच्यावर प्रेम
तर बर झाल असत
मुंबई मधे किमान १० बाय १० च
झोपड़ तरी विकत घेता आल असत
नसत करता आल डी एड
पण बी एड तरी करता आल असत
नसतो झालो टीचर पण
शिपायाच पद तरी भेटल असत
नसता केला आई बाबांना फ़ोन
पण त्यांचा तरी घेता आला असता
आई मी महत्वाच्या फ़ोन वर बोलतोय ग
परत करतो , अस सांगायचा प्रश्नच उरला नसता
माझ्या लेकरा ला खुप
काम असत ग ?
अस डोळ्यात अश्रु आणून
आई चा उदगार निघाला नसता
तिला भेटून रात्रि , बेरात्री घरी गेल्यावर
घड्याला कड़े बघत चिंता ग्रस्त झालेला
बाबांचा बेचैन चेहरा कदीच दिसला नसता
प्रतेक सुट्टीत घराच्या बाहेर असतोस
कसल आहे काम , सोडून दे त्या कामाला
आम्ही सुधा कामाला जातो
असा " ह्रदय हेलावनारा " आई बाबांचा
आवाज कधीच ऐकला नसता
नसता घेता आला फ्लैट
पण एवढ तरी केल असत
मुंबई मधे किमान १० बाय १० च
झोपड़ तरी घेता आल असत
नसत केल तिच्यावर प्रेम तर बर झाल असत
कंपनी ने माझ प्रमोशन कधीच झाल असत
नसत हसता आल पण रडाव तरी लागल नसत
बनविलेल्या कवितान्नी डोळ पुसाव लागल नस्त
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment