आज पुन्हा डेक्कनवर तोचं दरवळ....
मोग-याची गजरेवालीही अगदी तीचं....
तेवढ्यातं कुठुनतरी चिरपरिचित रिंगटोन....
जी फ़क्त तुझ्यासाठी ’सेट’ केली होती मी...
.
.
.
खरचं ! कीत्ती नि काय...काय...बोलायचो रे
तासन-तास आपण फ़ोनवर....
ईतके दूरचे अंतर नाहिसे करणारे ते क्शण.....
किती अमूल्य वेळ खर्ची घातलास नं माझ्यावर...
.
.
.
ए !माहितयं मला तूही खराचं होतास रे....
नि मी तर अजूनही उभीय...त्याच वळणावर...
का कोण जाणे...मनापसून वाटतय़ आजकाल...
निश्चित जन्म सरेल हा... अश्या तुझ्या आठवणींवर...
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment