बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार
आता नाही वाटत मला भीती , घरात असताना मोबाइल ची रिंग वाजली तर
भीती ताई ने sms वाचायची, भीती आईने फ़ोन उचलायची
आता गरज नाही वाटत मोबाइल सतत जवळ ठेवायची
आता करतो मी फ़क्त माझ्यचं मोबाइल चे recharge
आता नसतात मोबाइल मधे misscall वर misscall
बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार
आता असतो मित्रांसोबत , त्यांच्याशी गप्पा मारत , करतो एन्जोय चायनीज पार्ट्या
आता कोणीही म्हणत नाही " आज कसा काय साहेबाना वेळ म्हणाला "
आता असतो मज्याकडे वेळ मंदिरात जायला
आणि नाही वाटत भीती कुणी आपल्या कड़े पहायची
आता मला मोजकेच पैसे न्यावे लागतात shopping ला जाताना
बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार
आता दुरावलेले cricket आहे माज्या सोबतीला
आता रमतय माझ मन अभ्यासात , वाटतय त्यात काहीतरी तथ्य
करतोय मी माज्या career चा विचार
आता बांधली आहे मी माझ्या स्वप्नांची माडी
स्वप्नांच्या माडीतले ते स्वनाचे घर , वाट पाहतोय त्या घरात तिची ,
येइल ती , एका दिवशी , माज्या बरोबर लग्नाचे ७ फेरे घेवून बनवेल माझे आयुष्य सुखाचे
बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार
जाता जाता प्रेमाचा कठू अनुभव देवून गेलीस,
२१ व्या शतकातील आधुनिक मुलींच्या स्वभावाची ओळख करून दिलीस
आता आहे माझ्याकडे अनुभवाचे गाठोडे , मग कसा फसेन त्या जाळ्यात पुन्हा ?
आता घेणार सात फेरे ते फक्त माझ्या आई च्या समत्तिने ,
१ डाव फसला आहे म्हणुन आता दूसरा आई च्या हातात दिला आहे
नक्कीच तो सफल होयेल, आणि नक्कीच त्याला समर्थांचा आशीर्वाद असेल यात शंका नाही
बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार
असे कितीही म्हटले तरी शेवटी तुझ्यावरच कविता करतोय ................... !!!
थोड्या वेळापुरता का होईना स्वताशीच खोट बोलतोय ................... !!!
आणि एकटाच स्वताशी हसतोय ................... !!!
तरीही मनापासून १ खर सांगतोय ................... !!!
" बर झाल तू गेलीस सोडून मला ते ,
आता डोक्याला कसलंच tension नाही आहे "
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment