कधी आलीस
तर नक्की येउन जा...........
तिथं .....
जिथं ...... मी तुला नेहमी भेटायचो....
तिथं.... तुला आता....... काहीच दिसणार नाही.......
तिथं दिसेल.....
फ़क्त तुला.......तुझ्या माझ्या आठवणींच अस्ताव्यस्त झोपड़
कधी आलीस
तर नक्की कोणाला तरी विचार........
पुर्वीचा ओळखीचा
पण
सध्याचा ...अनोळखी मी .. कुठे आहे???
तुला उत्तर मिळणार नाहीच...........
नंतर.....
तुझी पावल जड़ होतील तू माघारी फिरशील
डोळे ही पाणावतील
तुझे थोड़े
नंतर तू स्वताशिच म्हणशील
फ़क्त एकदा...... तुला भेटायचय ..... फ़क्त एकदा.......
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment