Wednesday, September 22, 2010

’ती’ आणि ’तो’

’ती’ आणि ’तो’






ती सांगते शेजारणींच्या गप्पा त्याला, मोठ्या उत्साहात

तेंव्हा तिला भरभरून आनंद मिळतो.

कारण महत्वाच्या नसतात त्या गप्पा,

महत्वाचा असतो त्याच्याशी होणारा संवाद.



ती विचारते त्याला ऑफीसच्या कामाबद्दल

तेंव्हा तिला मनापासून उत्सुकता वाटते.

कारण महत्वाचे नसतात ते फाईलींचे ढीग,

महत्वाची असते त्याच्याबद्दलची काळजी.



ती घेऊन जाते त्याला सहलीला

तेंव्हा तिथली हिरवळ तिला सुखावते.

कारण महत्वाची नसते ती सहल,

महत्वाचा असतो त्याचा सहवास.



ती बनवते त्याच्या आवडत्या रेसिपीज

तेंव्हा तिला खूप धन्यता वाटते.

कारण महत्वाच्या नसतात त्या रेसिपीज,

महत्वाचं असतं त्याच्याविषयीचं प्रेम.



’ती’ ही अशी असते.

’ती’ ही अशी असते.



पण तो.......



तो ऐकतो शेजारणींच्या गप्पा

तेंव्हा त्याला ती कटकट वाटते.

कारण त्याला दिसत नाही त्यातला संवाद,

त्याला दिसते फक्त त्यातली व्यर्थता.



तो सांगतो ऑफीसच्या कामाबद्दल

तेंव्हा त्याला ती अज्ञानी वाटते.

कारण त्याला स्पर्शत नाही त्यातली काळजी,

त्याला दिसतो फक्त तिचा अडाणीपणा.



तो जातो तिच्याबरोबर सहलीला

तेंव्हा त्याला रजा फुकट गेल्यासारखी वाटते.

कारण त्याला जाणवत नाही तिचा सहवास,

त्याला दिसते फक्त एनकॅश न केलेली लीव्ह.



तो खातो तिने बनवलेल्या रेसिपीज

तेंव्हा काहीच दाद देत नाही तिला.

कारण त्याला कळत नाही तिच प्रेम,

त्याला दिसतो फक्त तिचा नोकरी न करणारा गृहिणीपणा.



’तो’ हा असा असतो.

’तो’ हा असा असतो.

No comments: