Friday, September 17, 2010

ब्रेकअप च्या दिवसापासून

हसत खेळत तो असायचा


सुखानं जगात वावरायचा

ब्रेकअप च्या दिवसापासून तो

नैराश्याच्या घरात राहायचा...



कामासाठी तो धडपडायचा

ऑफिसात सदा वेळेत असायचा

ब्रेकअप च्या दिवसापासून तो

वेळेशी त्याचा ताळ-मेळ नसायचा...



मित्रांमध्ये वेळ घालवायचा

स्वताची सर्वांत छाप पाडायचा

ब्रेकअप च्या दिवसापासून तो

स्वताच्या अस्तित्वाच्या शोधात असायचा...



घोळक्यात सर्वात उठून दिसायचा

इतरांना ही हवाहवासा वाटायचा

ब्रेकअप च्या दिवसापासून तो

गर्दीत हरवलेला असायचा...



मैत्री त्याची सर्वांपेक्षा न्यारी

मदतीसाठी सदा पुढे असायचा

ब्रेकअप च्या दिवसापासून तो

स्वताच्या मदतीसाठी धावा करायचा...



आजही तो असा हरवलेला

सुखापासून सध्या दुरावलेला

आहे सारा समुद्र जवळी त्याच्या

तरीही एका पाण्याच्या थेंबासाठी तहानलेला....पाण्याच्या थेंबासाठी तहानलेला...

No comments: