सोबत
आता असे वाटते
ज्योती सोबत हवी होती...
कारण ती सोबत असताना
आयुष्यात माझ्या फ़ुले होती..
तिने मैत्री तोडली..
ते माझ्या जिव्हारी लागले..
आणि वाट पाहता पाहता...
नजर माझी मरून गेली...
आता एकटाच आहे..
कधी कधी मागे वळून पाहत आहे...
झालेल्या चुकांचा विचार करत आहे...
आणि स्वत:लाच शिक्षा देत आहे...
झालेल्या चुकाने मन तडफडतेय...
कारण खूप वेदना होत असताना...
मला काही होत नाही असे दाखवतेय
एक वेडी आशा आहे...
परत येतील ते दिवस...
म्हणेल ती मला...
चल झालेल्या गोष्टी विसर....
पण ती वेडी आशा आहे..
स्वत:च्याच पायात पाय अडकून पडण्यासारखी..
घोर एक निराशा आहे...
येतेय का ती हे डोळे वाट पाहतील...
शेवट्च्या श्वासापर्यंत ऊघडे राहतील...
येणार नाही ती हे माहीती असून..
मरणानंतरही डोळे तिचे शोध घेत राहतील....
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment