Friday, September 17, 2010

ती चाललीय माझ्या पासून दूर........

ती चाललीय माझ्या पासून दूर........


खूप दूर...... कदाचित परत न येण्यासाठी..



थांब ना जरा..... जाऊ नको......

अस म्हणायचा माझा आता अधिकार आहे कि नाही

माहिती नाही...

पण जाता जाता एक मागण मागू का.....?

जरा ऐकशील का......?

माझ्या काही गोष्टी तुझ्याकडे राहिल्यात

परत मला देशील का..?



हि माझी आताची नजर

नेहमीच कल्पनेत हरवते......

भिरभिरत्या नजरेने तुलाच शोधत राहते...

कधी काळी ती शून्यात हरवली होती

ती शून्यात हरवलेली नजर मला परत देशील का...?



हे आताच मन नेहमी आनंदान बागडत असत,

तुझ्याच आठवणीत पाझरत असत.....

कधी काळी ते एकटच उदास कुठेतरी भरकट होत...!

ते उदास, तुझ्या आठवणीने भिजलेले मन परत मला देशील का..?



आता नेहमी हसमुख राहणारे ओठ

कधी काळी अबोल होते.....

आता प्रत्येक शब्दात त्याची बडबड चालू आहे

कधी काळी ते निशब्द होते....

ते अबोल , निशब्द ओठ परत मला देशील का....?



हा आता बहरलेला गुलमोहोर

कधी काळी पानझडीच्या विळख्यात

कित्येक वर्ष खंगत पडला होता.....

तो पानझडीचा वृक्ष परत मला देशील का...?



सांग ना सखे.......

जाता जाता एक मागण मागू का.....?

जरा ऐकशील का......?

माझ्या काही गोष्टी तुझ्याकडे राहिल्यात

परत मला देशील का..?

No comments: