Sunday, June 14, 2009

स्वर्गातले एक फूल

स्वर्गातले एक फूल, पृथ्वीवर अवतरलेघेऊनी ओंजळीत त्याला, निरखून मी हसलेफुलावरील दवबिंदूंन्ने, हळूच मज पाहिलेहृदय वेडे माझे, त्या पाकळ्यांमध्येच हरविलेयेताच घरी त्याला, खिडकीपाशी ठेविलेक्षणात माझे सारे, जिवनंच त्यास अर्पिलेविश्वसाच्या धाग्याने, त्याच्याशी खूप बोललेदु:खाच्या काळ्या ढगांन्ना, मी वेडी साफ विसरलेहोताच संध्याकाळ मात्र, " ते " फुलसुद्धा कोमेजलेअचानक आयुष्यात माझ्या, हे अघटित कसे घडलेपुन्हा एकदा त्याच्याकडे, सुन्न मनाने मी पाहिलेआयुष्याच्या या प्रवासात, पुन्हा मी मागे एकटी उरले.... पुन्हा मी मागे एकटी उरले..........

अजब दिवसा स्वप्ने बघतो

अजब दिवसा स्वप्ने बघतो मीरात्री जागत बसतो मी...उगाच कविता करतो मीजगात वेडा ठरतो मी...मनात इमले रचतो मीआशेवरती जगतो मी...असतो तेथे नसतो मीमलाच शोधत बसतो मी...वरवर नुसते हसतो मी'अजब' मनाशी कुढतो मी...

चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारेवेड्या मुशाफिराला सामील सर्व तारेमी चालतो अखंड चालायाचे म्हणूनधुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारेडरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचेहे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे! मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशाविझले तिथेच सारे ते मागचे ईशारेचुकली दिशा तरीही आकाश एक आहेहे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे (न्या रे?)आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचेबेसावधास कैसे डसणार हे निखारे? विंदा करंदीकर

काही प्रश्नान उत्तरे नसतात

जन्म नाही मृत्यु ही नाही हाती आपल्या काही नाही तरी ही खेळ चालुच आसतो ना ?हा माझा , तो तुझा हा विश्वासु , तो बनेल अंदाज आपलेच आपल्याच मानत सुरु आसतात ना ?विचारांना सीमा नसते....तरी जगणे हे सीमीत असते प्रकाश्यातुंन चालताना ही डोळ्यासमोर आंधली येते कारण बुद्धि आपली भ्रमित आसते म्हणतात जीवन हे सुन्दर असते......का मग दुखच त्यात भरमसाठ भेटते कदाचित काही प्रश्नान उत्तरे नसतात

संध्याकाल...

डोळ्यांची कवाडे उघडतात दिवस मज़ा चालू होतोह्या न त्या कामात कसा भर्रकन संपून जातो आणि मग होते, आठवणींचे काहूर उगिच मानत दाटतेसन्ध्याकाळ्चा गार वारा तनाला भिडून जातोमी मात्र तेंव्हा भूत्काळात जातोतिचे माझे सारे क्षण पुन्हा एकवटु लागतोएका क्षणी हसतो अन पुन्हा उदास होतोहोणार्या त्या अस्तात तेंव्हा आस होती उदयाचीरात्र होता नभास व्हावी आरास ती चांदण्यांचीपाहता त्या चंद्राकडे माझा मज वाटे हेवातो चन्द्र म्हणे हा चन्द्र कोठुनी उदयास आला नवाहाती घेउन हात तिचा मी काव्यपंक्ती करायचोतिच्या सोबत असताना मी न माझा उरायचोमाझ्या काव्यवेडेपणावर ती फ़क्त हसायची माझ्याहूनहि अधिक प्रेम ती कवितान्वरच करायचीआता उगिच वाटते मला का बरे मी माणूस झालो असतो तिजवरील कविता ज़र नसतो तिच्या प्रेमास मुकलोकशीबशी ही संध्याकाळ सरते नित्याची एकदारात्र होते वैरिण माझी करते सोबत सर्वदाकल्पनेवर कविता करण्याचा कन्टाळा आलाय आताशा मलास्वप्नांमध्ये रंगन्याचाही वीट येतो आहे भलाप्रार्थना मी हीच करतो विसर तिचा मज पडून जावाअथवा आयुष्याच्या माझ्या प्राण पर्ण तरी गळून जावा... अ.वि. दाते

मला जायलाच हवं

]मला जायलाच हवंतुला जायचं होतं तू गेलीस मी देखिल जाईल,एक दिवस ,माझा श्वास थाम्बल्यावरनाहीतरी तुझ्याविना .....काय तग धरणार तो ..पुन्हा विचारायचं नाहीस , मला नं विचारता ...का गेलास ,भकास चेहरे , आणि उष्ण वारे उरतील मग माझ्या नंतर कोरड्या विहिरी , सुकलेली वृक्ष वेलीआठवण देतील तुला माझ्या विना जीवनाची ...जीवनातल्या प्रतेक क्षणी तुला ..माझी सोबत हवी होती ........पण शक्य नाही ते .रूतुचक्राचा मान मला ठेवावाच लागेल ..मला जायलाच पाहिजे..

ठिगळ लावतोय आभाळालामाझं

ठिगळ लावतोय आभाळालामाझं आभाळच फाटलयंडोळ्यांमधलं पाणी माझ्याफार अगोदरच आटलयंतरीही रडगाणे ते नेहमीचंझिजलेलं आजकाल मी गात नाहीश्वास थांबतायत धावायचे हळुहळुतरी मन मात्र थांबत नाहीअपेक्षा भंगाचं ओझंआता माझ्याने पेलवत नाहीपावसात चालतो नेहमीच आवडीनेकारण मी रडतोय हे कधीच कुणाला कळत नाहीमाझं प्रेत बघुन उद्यातुम्ही नाकाला रुमाल लावालचांगला माणुस होता बिचाराम्हणुन दोन अश्रु ढाळालसरणावर एकदा गेलो मीकी माझ्या आठवणे देखील सरतीलमी गेल्यावर माझ्यापाठी कोणकशाला माझी आठवण देखील काढतील?उद्या त्या खोट्या अश्रुंचेव्याज माझ्या डोक्यावर नकोनिदान वर गेल्यावर् तरी मलाकाही द्यायचे बाकी राहील्याची चिंता नकोउगाच माझी कोणाला काळजी नकोअन माझ्यामुळे तुम्हाला त्रासही नकोही कवीता वाचुन कदाचीततुम्हीदेखील चुकचुकालकाहीतरी वेड्यासारखं लिहीलय ह्यानेअसेच काहीसे पुटपुटालपण ह्यातही जगण्याची एक निराळी अदा आहेमरतामरता जगण्याची एक बेगळीच नशा आहेजगलो तर जगुद्यामेलोच तर मरुद्याआभाळ शिवुन झालंय माझंत्यात निदान पाणी तरी साठु द्याह्या जगातुन जायच्या आधीमला एकदा मनसोक्त रडायचयंअन त्यासाठी कदाचीत मलाअगदी चिंब होउन भिजायचयं

विश्वास

नको गोष्टी करू प्रेमाच्या प्रेमाचा व्यापार मी पहिलाय विश्वास ठेवेल तो मरेल हाच ह्याचा कायदा कामापुरते आसते सारे काम संपले की संपते नाही संपविता येत ज्याला प्रेम त्याला संपवीते संपविले तरी ठीक आहे हे हाल हाल करुन मरते पहिल्या वर म ज नुना काळीज तीळ तीळ तुटते

हसत ये तू कधी ही

हसत ये तू कधी ही तयारी करुन ठेवली आहे .एक दिवस संपायचेच आहेसामोरे जायची कला मी शिकली आहे.नाही मी घाबारनार आणि नाही कोणी ही रडणार आयुष्यभर सर्वाना हसण्याची सवय मी लावली आहे हसत ये तू कधी ही तयारी करुन ठेवली आहे .तिकडे हिशोब द्यावा लागतो म्हणुन रोजनिशी रोज लिहिली आहे .स्वतसाठी ही नाही तर इतरांसाठी ही किती तरी पाने त्यातली भिजली आहे .नाही दावा फार मोठी समाजसेवा.हातून माझ्या घडली आहे.काठी ने शारीर सावरत इतराना उभे करायची सवय मला जडली आहे हसत ये तू कधी ही तयारी करुन ठेवली आहे .चाळीचा फ्लैट करता करता उमर ही ढळली आहे .सगळी कर्तव्य पूर्ण केलि पोरांनी बंगल्याची भिंत आता बांधली आहे . हसत ये तू कधी ही तयारी करुन ठेवली आहे .किती दिवस हे आसे थकलेले शरीर घेवून जगणार झाल्या होत्या काही चूका त्यासाठी पुन्हा पुन्हा रडणार तरी ही इतकेच सांगेल त्या चूका इतरांकडून होवू नये म्हणुन बदनामी ही स्वताच्याच माथी मारली आहे.का सोस करायचा आयुष्याचा साठी माझी दोन वर्ष्य पुर्वीच सरली आहे लवकर ये तुझ्या आगमनाची हुरहुर मानत भरली आहे हसत ये तू कधी ही तयारी करुन ठेवली आहे

रंग बदलतात हो माणसे

सरडयाला ही लाज वाटावी इतक्यापटकन रंग बदलतात हो माणसे क्षणात शब्द देवून क्षणात शब्द मोडतात हो माणसेआधाराला हात देताना ही नखेच टोचतात हो माणसेउठवाता उठावता ही दोन चारदा पडतातच हो माणसेजखमेवर फुंकर मारताना ही मिठ्च फवारतात हो माणसेआपला आपला म्हणत पाठित घाव घालतात हो माणसेसाधु बनुण ही वासनानाच कवटाळतात हो माणसेरामाच रूप घेवून ही रावणाचीच पुजा करतात हो माणसे संत्वनाला आल्यावर ही काटेच पेरतात हो माणसेमी नाही त्यातला म्हणत तशीच वागतात हो माणसे थोड्या फार स्वार्थासाठी जात बदलतात हो माणसेकेलेल्या उपकराना क्षणातविसरतात हो माणसे प्रश्न पडतो मला खरच आशी का वागतात हो माणसे ? स्वाभिमान शून्य आयुष्य कशी जगतात हो माणसे ?

मला भेटवी आशीच माणसे

खरच आशी कशी वागतात हो माणसे ? माणसात राहून ही देवबनतात हो माणसेदिलेल्या शब्दांसाठी जीव सोडतात हो माणसेप्राण जाये पर वचन ना जाये आशी जगतात हो माणसेकाळजाला पीळ पडेल इतकी माया लावतात हो माणसेसंबंध नाही आश्यांसाठी ही जीवाची बाजी लावतात हो माणसेरक्ताच्या नात्यापेक्ष्या मैत्री श्रेष्ट मानतात हो माणसेठेचाललेल्या पावलानी नाचतात हो माणसेसारे कही विसरून वारीत रमतात हो माणसेघरात आलेल्या पाहुण्याला देव मानतात हो माणसेसमाज्यासाठी घर दार सार विसरतात हो माणसेआनाथ आपन्गान्मधे देवबघतात हो माणसेडोंगरा एवढे उपकार करून नामा निराळी राहतात हो माणसेएकमेकांच्या मदतीला धावतात हो माणसेप्रश्न पडतो मला कशी जपावी आशी माणसे ?एकच प्राथना देवा पदोपदीमला भेटवी आशीच माणसे

काही प्रश्नान उत्तरे नसतात

जन्म नाही मृत्यु ही नाही हाती आपल्या काही नाही तरी ही खेळ चालुच आसतो ना ?हा माझा , तो तुझा हा विश्वासु , तो बनेल अंदाज आपलेच आपल्याच मानत सुरु आसतात ना ?विचारांना सीमा नसते....तरी जगणे हे सीमीत असते प्रकाश्यातुंन चालताना ही डोळ्यासमोर आंधली येते कारण बुद्धि आपली भ्रमित आसते म्हणतात जीवन हे सुन्दर असते......का मग दुखच त्यात भरमसाठ भेटते कदाचित काही प्रश्नान उत्तरे नसतात

ध्येय

मला पुन्हा लहान व्हायचंयलोकांवर निस्सीम प्रेम करायलानिर्मळ, श्वेत मेघ बनायचंयसुसाट वार्‍याशी झुंजायलारंगीत छानसा पक्षी व्हायचंयआकाशात उंच भरारी घ्यायलामला जलाचा साठा व्हायचंयतहानलेल्यांची तहान भागवायलामला एक छान "मन" व्हायचंयदुसर्‍या चांगल्या मनांशी बोलायलामला एक छान "सुर" व्हायचंयसर्वांच्या मनात उमटायलामला मोठा वेडा व्हायचंयवेड्या "शहाण्यांन्ना" लाजवायलाशक्य नसले काही जरीनिदान एक चांगला माणूस व्हायचंय....... निदान एक चांगला माणूस व्हायचंय......

मुक्त...

पिंजरा तोडून मुक्त झालेला तो पक्षी जखमी पंखातील रक्ताने हिरव्या भूमीवर लाल नागमोड उमटवीत उडतो आहे आपल्या घरट्याकडे,कदाचित आपल्या म्रुत्युकडेही.पणत्याच्याकडे करुणेने पाहणारे सारे आकाशही हिरावून घेऊ शकत नाहीरक्तात माखलेला त्याचा आनंद ... अभिमान...पिंजरा तोडल्याचा.- कुसुमाग्रज

आयुष्य

आयुष्य म्हणजे कटकट.. जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतंसुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतंआयुष्य म्हणजे वणवा....इथे वेदनांना घेउन जळावं लागतपोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतंआयुष्य म्हणजे अंधार...इथे काळोखात बुडाव लागतंपरस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतंआयुष्य म्हणजे पाऊस....आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतंकष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतंपण ...आयुष्य हे असेच का ?मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्यजिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

उगाचच...

एकदा कधी चुकतात माणसं,सारंच श्रेय हुकतात माणसं...प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं, सावकाश हे शिकतात माणसं...गंधासाठी दररोज कोवळ्या,कितीक फुलांस विकतात माणसंशतकानुशतके कुठलीशी आस,जपून मनात थकतात माणसं...जुनाट जखमा भरू लागल्या की,नवीन सिगार फुकतात माणसं...हरेक पाकळी गळुनिया जातेअन अखेरीस सुकतात माणसं...नको रे असं कडू बोलू 'शता'..उगाचच किती दुखतात माणसं !!!

मी म्हणालो मनाला

मी म्हणालो मनाला थोडा विचार कर ना रे ?बद्लतय जग सारे थोडा तू बदल ना रे ?विसर जुन्या रुढी परंपरा मनाची कवाडे थोडी उघड ना रे आपलीच आहेत ती लेकर बरोबर त्यांच्या चाल ना रे मी म्हणालो मनाला आजूबाजू ला जरा बघ ना रे संपलय आपले कर्तुत्वनव्या पीढित रम ना रे प्रत्येक पीढीच विद्रोही आसते स्वताची तरुनाई आठव ना रे विश्व चक्र हे आसेच चालणार नवी पीढी जुन्याशी भांडनार बदल स्रुस्तिचा अटळ नियम एवध तरी समज ना रे मी म्हणालो मनाला थोडा विचार कर ना रे ?

आता तरी हसून घेआजचा दिवस

आता तरी हसून घेआजचा दिवस मिळालाय तुलाआज तरी जगून घे कश्याला उद्याची काळजी करतेसआता तरी हसून घे माहीत आसते सर्वाना फुलणारे फूल हे सुकनारेच असते किती ही ते जपले तरी कोमेजनारच असते आज फूललय ते सुगंधात न्हाऊन घे आजचा दिवस मिळालाय तुलाआज तरी जगून घे कश्याला उद्याची काळजी करतेस आता तरी हसून घे काही बरोबर आणलेल नसत काही बरोबर नेता येत नाही इतकी दुर्दैवी नको बानूस की कोणाला क्षणभर सुख ही देता येत नाही देण्यात ही सुख आसते ईतके तरी समजावून घे कश्याला उद्याची काळजी करतेस आता तरी हसून घे आजचा दिवस मिळालाय तुला आज तरी जगून घे कश्याला उद्याची काळजी करतेस आता तरी हसून घे काहीच आपल्या हातात नसत काहीच आपण करत नाही किती ही योजना आखल्या तरी तसे काही घडत नाही कश्याला विचार करतेस होईल तसे करून घे कोणावर तरी प्रेम कर आपला त्याला मानून घे आजचा दिवस मिळालाय तुला आज तरी जगून घे कश्याला उद्याची काळजी करतेसआता तरी हसून घे तुला काय वाट ते तूच सारे करत आसतेस नशिबात जे आसते तसेच सारे घडत असते मीळतय जे आत्ता तुलाते तर उपभोगून घे काळजी सोड नशिबवर स्वतावर हसून घे शहाणपण ठेव बाजूला मनप्रमाणे जगून घे आजचा दिवस मिळालाय तुला आज तरी जगून घे कश्याला उद्याची काळजी करतेसआता तरी हसून घे

उत्साह

उत्साह वयात नसतो , असतो तो मनातमनाने रहा उत्साही , येईल सारे हातात ! ..इंद्रधनुची कमान, रंग त्यात सातउधळुनिया रंग , करू सर्वांवर मात..रंग भंगले कां ? उत्साह संपतात !हात सुटला कां ? घेतला जो हातात..रंगात रंगताना, तुझी असो साथमार्ग क्रमणे आहे, घेउन हाती हात..मार्गी कोण आले, गुंतले की कोणात ?खुलली न असता, कलिका सुकतात ? ..मार्गात थांबणे नाही, होई जरी रातमाघार नाही जराही, जरी होय आकांत..माहीत नाही सारे, उगा झुंजतातया मिळून सारे, करूयात रुजुवात..घेऊ शपथ, ना बाहेर काही आंतनिर्धास्त होऊद्या आजची सांजवात..आजच्या दिवशी करूया एक बातप्रेम देऊ, प्रेम घेऊ करू बरसात

Thursday, June 11, 2009

जमलच नाही

जगाकडे बघून जगताना ,असे दिवस , रात्री पळताना .तुझ्याकडे कधी लक्ष द्यायला जमलच नाही गालावरल्या रंगाचा अर्थ...मिठितिल स्पर्शाचा अर्थ....रुसवे फुगव्यातील अर्थ ....डोळ्यातील भावांचा अर्थ ....समजायला वेळच मिळाला नाही .....खरच प्रेम व्यक्त करण कधी जमलच नाही .उभे केले जीने, चालायला शिकवले .....एक घास चिउचा म्हणत बळ बळ भरविले...जेव्हा गरज होती तिला माझी, तेव्हा ......तिच्यासाठी वेळ द्यायला जमलच नाही .....श्वाश म्हणायचा मी ज्यांना ,ज्यांच्यात स्वताला मी शोधायचो .....त्यांच्या साठीच सारे लढने ,स्वताच स्वताला फसवायचो.....त्याना उमलताना पहायला जमलच नाही आज विचार करतोय ,.अखेरचा दिवा मालवताना...भरलेले डोळे पुसताना....आणि जिवंत जळताना ..खरच एकही नाटक आपल्याला जमलच नाही ....धावलो आपण खुप पण,कश्यासाठी तेच कळले नाही....

फक्त एकदाच

कोठे निघालिस ? का निघालिस ?एक कारण तरी सांगून जा नाही आडवणार तुला पण संपताना मला पाहून जा. मुक्त व्हायचे होते ना तुला. मला तर पहिले सोडवून जा. नाही आडवणार तुला. पण दोन आश्रू ढाळून जा. तुज्या साठीच प्राथना केल्यात सार्‍या एकदा त्याना बघून जा. काहीच नको मला आता सारे काही घेऊन जा .फक्त एकदाच खोटे खोटे का होईना पण प्रेम होते म्हणुन जा

दोन शब्दात बोललीस तु

दोन शब्दात बोललीस तुसार काही संपल कसे समजावू तुझ्या त्या शब्दाने जगच माझे लुटलरचत बसलो स्वप्न स्वताला फसवत फसवत कसे समजावू मनाला स्वप्न आता ते तुटल दोन शब्दात बोललीस तु सार काही संपल टव टवित प्रीत फुल माझे क्षनामध्ये आचानक सुकल जगविल होत ज्याला मी आयुष्याची किंमत मोजुन त्यानेच सांगितले आज आसतित्व माझे मिटलदोन शब्दात बोललीस तुसार काही संपल नाही दोष तुला देणार तुझे तर सारेच मी मानल तुझा प्रत्येक आश्रू पुसन्यासाठीरक्त ही माझे सांडल कसे सांगू हे बोलण्या पेक्ष्यातु प्राणच का नाही घेतल ?दोन शब्दात बोललीस तुसार काही संपल कसे समजावू तुझ्या त्या शब्दाने जगच माझे लुटल

तू गेल्यावर

मी स्वप्न तुझे प्रेमाचे गुलजार उधळले होते! तू गेल्यावरती मग का हे रक्त उसळले होते? तू गेल्यावरती आले मज गंध प्रेमकुसुमांचे कळले न मला मी केव्हा गजरे चुरगळले होते! माझाच वेगळा रंग मी मिरवित होतो तेव्हा पण रंग तुझे अन माझे केव्हाच मिसळले होते! मी अंगावरच्या जखमा कुरवाळित बसलो होतो तेव्हाच जख़्म हृदयाचे अपरोक्ष चिघळले होते! तू गेल्यावरती दिधला मी दोष तुझ्या असण्यालापण्........अस्तित्व तुझे माझ्यात तेव्हा विरघळले होते!

आयुष्य असचं जगायचं असतं

जॆ घडॆल तॆ सहन करायचं असतं,बदलत्या जगाबरॊबर बदलायचं असतं,आयुष्य असचं जगायचं असतं.कु‍ठून सुरू झालं हॆ माहित नसलं,तरी कुठेतरी थांबायचं असतंआयुष्य असचं जगायचं असतं.कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणॆ करायचं असतं,स्वतःच्या सुखापॆक्षा इतरांना सुखवायचं असतं,आयुष्य असचं जगायचं असतं.दुःख आणि अश्रुंना मनात कॊडुन ठेवायचं असतं,हसता नाहि आलं तरी हसवायचं असतं,आयुष्य असचं जगायचं असतं.पंखामध्यॆ बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं,आकाशात झॆपाहुनही धरतीला विसरायचं नसतं,आयुष्य असचं जगायचं असतं.मरणानं समॊर यॆऊन जीव जरी मागितला,तरी मागून मागून काय मागितलस? असचं म्हनायचं असतं,आयुष्य असचं जगायचं असतं.इच्छा असॆल नसॆल तरी जन्मभर जगायचं असतं,पण जग सोडताना मात्र समाधानानॆ जायचं असतं,आयुष्य असचं जगायचं असतं.

हाच तर जिवलग मित्र असतो...

कोल्ड ड्रिंक मधे दारू मिसळवतोटाईट झाल्यावर उशिरा रात्री घरी सुखरूप सोडतो१ दिवस फोन नहीं केला तर रागवतोफोन केला तरीही शिव्या घालतोसमोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल तरतिच्या समोर मस्त पोपट करतोकॉलेज ला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतोकुठे आहेस म्हणुन विचारतोपिकनिक ला जातानाआई बाबांना हाच तर मस्का लावायला कामी येतोबाइक वरून पडलो की सगळे हसत असतानाधावत येउन उचलतोआपण विसरलो तरीहीवाढदिवशी १२ वाजता बरोबर मेसेज करतोपरिक्षेच्या वेळीसुपरवायज़रला घाल चुलीत म्हणुन सप्प्लिमेंट हातात देतोकाही चुकले तर ओरडतोगरज असेल तर कान पीळतोइतर मित्रांच्या तुलनेतआपली जास्त काळजी घेत असतोहाच असतो जोआपल्या कली रूपी आयुष्याला फुलवत नेत असतोहाच असतो जोआपल्या कृष्ण-धवल आयुष्यात रंगांची उधलन करत असतोदुखात असताना.. जवळ येउन काय झाल..? म्हणुन विचारतोआपण नजर खाली करून काही नाही म्हणुन त्याला टाळतोआपल्या डोळ्यात बघूनकाय रे एवढा परका झालो का..? असा उलट प्रश्न करतोसुखात हक्काने पार्टी मागणाराआणि दुखात रडायला खांदा देणारा हाच तर जिवलग मित्र असतो.

Wednesday, June 3, 2009

सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवेते

सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवेते
शतजन्मीचे हो माझे नाते

हळव्या तुझिया करात देता
करांगुळी ही रुप गोजिरी
गोड शिरशिरी उरांत फुलता
स्पर्शाने जे मुग्ध बोलते

करकमळाच्या देठाभवती
झिम्मा खेळत प्रीत बिलवरी
दृष्ट लाजरी जरीकाठी ती
तुझ्या लोचने वळूनी बघते

आठवे पाऊल प्रीत मंदिरी
अर्धांगी मी सगुण साजिरी
मूर्त होता तुझ्या शरीरी
अद्वैताचे दैवत होते

अबोल प्रेम

हे फक्त माझ्याचसोबत
नेहमी असंच घडणार आहे?
तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट
'ते' न बोलताच संपणार आहे?

भेट-वेळ रोजची ठरलेलीच
तरी अजून काय ठरणार आहे?
बोलायचं पटकन पण वेडं मन
त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !

भेटतो तेव्हाच माहित असतं
निघायची वेळ येणार आहे
पटकन विचारावा प्रश्न हवासा
तर शब्द ओठीच अडणार आहे !

मी न विचारताच तू काय
हवं ते उत्तर देणार आहे?
हे पुरतं कळतंय तरीही
तोंड माझं का बोलणार आहे?

न बोलता बोललेले शब्द
तुला वेड्याला कळणार आहे?
मी बोलले/न बोलले तरी गप्पच
नेहमीसारखा तू राहणार आहे !

भावभावना समजून घेणं
सगळंसगळं थांबणार आहे
उष्ट्या कुल्फीची चव मात्र
जिभेवरती रेंगाळणार आहे

स्वप्न माझं हे संपलं तरीही
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसले तरी
माझ्यात तूच सापडणार आहे !

कसे समजावू ग तुला

कधी कधी वाटते माझ्या मना
तू नसतीस तर काय अर्थ
राहिला असता जीवना
जेव्हा लाडात म्हणतेस मज तू साजणा
जगण्याचा मिळतो जणू एक नवा बहाणा

पाहूनी तुझ्या डोळ्यातील स्वप्नांची आर्तता
मनी विचार येतो कधी करू शकीन
मी त्या स्वप्नांची पुर्तता
देऊ शकत नसलो जरी आत्ता काही तुला
तरी वचन देतो सदैव तत्पर असिन मी तुझ्या साथीला

तुझ्या गालावर पडणारी खळी ती पाहून
हृदयात येतात आनंदाच्या लहरी दाटून
ओठांवर तुझ्या उमलनारे ते मंद हास्य
उलगडून देते जगण्याचे एक नवे रहस्य

नेहमीच आठवत असत मला
कठीणसमयी तुझ ते मला साथ देण
द्विधा मनस्थितीत सापडलेल्या मला
हळूवारपणे तुझ ते समजावण

कसे समजावू ग तुला
तुझे माझ्या आयुष्यात असलेले स्थान
तुझे माझ्या जीवनात येणे म्हणजे
परमेश्वराने मला दिलेले सर्वात मोठे वरदान

तु असताना तुझाशी

तु असताना तुझाशी
तु असताना तुझाशी,
खुप खुप बोलायचं ठरवतो,
मुक्या भावनांना,
शब्दात बसवायचं ठरवतो,
चार ओळी जोडुन
कवीता करायची ठरवतो,
पण तु आलीस की,
शब्द अबोल होतात,
मन मात्र बोलयला लागत
तु नसताना मात्र
मुक्या भावनांनचे शब्द होतात,
आपसुक चार ओळींची कविता होते,
एक गोष्ट मात्र नक्की
तुझ्या असण्यापेक्शा तुझ्या,
नसण्यातच मी जास्त जगतो

मनमंदिरातील देवा

आज मी माझ्या मनात एक मंदिर उभारलय
त्यात देव म्हणून फ़क्त तुलाच वसवलय
करणार नाही मी ह्या मंदिराच्या गाभार्‍यात इतर कुणाची स्थापना
माझ्या प्रेमाची फूले वाहुनी करीन तुझीच पूजाअर्चना
आरतीतूनी माझ्या गाईन तुझे गुणगान
संरक्षणास तुझ्या लावीन प्रणाला माझे प्राण
तुझ्यावरची माझी श्रद्धा कधी होणार नाही कमी
भक्ती माझी अखंड राहिल ह्याची देतो मी हमी
तुझ्याच आराधनेमध्ये देवा मी माझे सर्वस्व वाहीन
माझ्या प्रेमाने तुजभोवतालच्या दशदिशा उजळविन
होणार नाही ह्या मंदिरात प्रवेश इतर कुठल्या देवाचा
गरज भासल्यास प्राण त्यागून देईन पुरावा माझ्या प्रेमाचा
वाटतय देवा आता तुझ्याकडे काहीतरी मागाव
तू नेहमी मला एकट्यालाच तुझा परमभक्त मानाव.

माझी ती अशी असावी...

माझी ती अशी असावी...

माझी ती अशी असावी,
जगात दूसरी तशी नसावी,
मलाच सर्वस्व माननारी,
माझी ती अशी असावी\\१\\

प्रानजळ असावी, अवखळ असावी,
परी ती अगदी सोज्वळ असावी,
सर्वांना अगदी आपलं माननारी,
माझी ती अशी असावी\\२\\

फारच सुंदर, फारच गोरी,
फारच देखणी पण नसावी,
मजवर भरपूर प्रेम करणारी,
माझी ती अशी असावी\\३\\

आपली माणसं, आपलं घर,
आपलेपणा जपणारी असावी,
ससूलाही आई म्हणनारी,
माझी ती अशी असावी\\४\\

चाणाक्ष, हुशार, व्यवहारी,
आयुष्यातील सल्लागार व्हावी,
माझ्या चुका लक्षात घेणारी,
माझी ती अशी असावी\\५\\

माया, प्रेम आपुलकी,
हे सर्व देणारी असावी,
माझी ती कशी असावी?
माझी ती अशी असावी\\६\\

जग माझे बदलल.

तु आपल म्हटलेस आणि,
जग माझे बदलल.
सगळ काही मीळlल,
स्वप्न सत्यात उतरल.
झुरत होतो तुझ्यासाठी,
मारत होतो तुझ्यासाठी,
कळत होता वेडेपणा तरी,
तसेच वागत होतो तुझ्यासाठी .
तु हा म्हटलस आणि,
जग माझे बदलल.
सगळ काही मीळlल,
आयुष्य माझे पालटल.
क्षणो क्षणी,ओढ़ होती
क्षणो क्षणी बैचैनी,
मनामध्ये शिरली होती
तुझीच ती धुंदी.
तु हा म्हटलस,आणि
सुख मला मीळlल.
हवे होते जसे मला
उत्तर तसेच मीळlल.
तु आपल म्हटलेस आणि
जग माझे बदलल.
सगळ काही मीळlल
मन आनंदाने भरल.
किती स्वप्ने पहिली होती
किती कल्पना रंगवल्या होत्या
तुझ्या विचlरने सखे
रात्र रात्र जागवल्या होत्या
स्वप्नातून सत्यात तु आलीस
आणि प्रेम माझे खरे ठरले
तु आपल म्हटलेस आणि
जग माझे बदलल

दिसं गेले, रात्र गेली

दिसं गेले, रात्र गेली
काळ सरला सरसर,
यादरम्यान ठावुक नाही तुला
माझ्या मनाची झाली किती मरमर...

मी तुला विसरलो
असं साहजिकपणे तुला वाटलं असावं,
म्हणुन काय तू आपलं
इतके दिवस रुसावं...?

घाईगर्दीचं जीवन असतं हे
अनाहुतपणे काही गोष्टी घडतात,
चार क्षण सुखासाठी
सारेच इथे धडपडतात...

वेडाबाई कुठली,
आताशा तू खुप त्रास देतेस,
थोडा-थोड़का उरलेला माझा
जीव सुद्धा घेतेस..

पुरे झाले आता
कधी येणार आहेस ते सांग,
येतांना मात्र आपल्यासाठी
देवाकडे खुप सारं सुख माग...

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे
प्रेम असते,
पण नेहमीच
तुमचं आणि आमचं
तसं सेम नसतं...

तुम्ही म्हणता,
लग्नआधी प्रेम करणं
म्हणजे शेम असतं,
आम्ही म्हणतो,
प्रेम लग्न आधी करण्यातच
तर खरं फेम असतं...

आमच्या मते,
प्रेमाच्याच मुलीशी
लग्न करणं
हेच आमचं एम असतं,
तुमच्या मते,
प्रेमाचं आमच्या
"flirting" हे एकच
त्याचं नेम असतं...

परीस्थितिनुरूप
पावले उचलिता
होवू शकले नाही
लग्न तिच्याशी
तरी ख-या प्रेमात
सारं काही क्षेम असतं,
मैत्री- प्रेम
लग्न अन् वियोग
असं चाललेलं
काळाचं ते एक गेम असतं...

म्हणुन,
प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे
प्रेम असते,
पण नेहमीच
तुमचं आणि आमचं
तसं सेम नसतं...

तु येणार आहेस...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
झाडावरली कोकिळा जेव्हा
गाणं गाऊ लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
ठिबक्या ठिबक्या पावसानंतर जेव्हा
माती तिचा गंध देऊ लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
वर्षाराणी पाणी सांडुन जेव्हा
जमिनीवरुन वाहु लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
सुगरिणीचं पिलु जेव्हा
खोप्यातुन बाहेर डोकावु लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
चंद्रासोबत चांदणीही जेव्हा
अवकाशात चमकु लागते...

आता तु जाणार आहेस
याची मला चाहुल लागते,
भग्नावस्था सारी, कोरडया खट्ट रानी
निरव शांतता पानोपानी,
जेव्हा पसरु लागते...

का रे वेड्या अस करतोस??

नेहमी मला लपून-छपून बघत असतोस
पण मी दिसली नाही की मग मात्र गोंधळून जातोस
इमारतीखाली येउन रोज मी जाण्याची वाट पाहत असतोस
पण मी आले की मात्र आडोश्याला जाउन लपून बसतोस

का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.

लांबून नजरेस नजर देतोस
पण जवळ आलास की मात्र लाजून डोळे झुकवतोस
"आज काहीही झाल तरी तिच्याशी बोलायच" अस ठरवून येतोस
पण बोलण्यासाठी अगदी जवळ येउन देखील, न बोलता निघून जातोस

का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.

रोज स्वप्नात येउन छळत असतोस
तिथे मात्र खूप वेळ बोलत असतोस
आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत असतोस
पण समोर येउन एक लाल गुलाबही न देऊ शकतोस

का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.

कधी कधी वाटत तुझ्याशी स्वतहून जाउन बोलाव
"मैत्री करणार का?" अस तूला विचाराव.
मैत्रीतच मग तुझ्या मनातल जाणून घ्याव.
पण तू माझ्याबद्दल काय विचार करशील
ह्या विचाराने मन माझ घाबराव.

का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.

मलाही आहे तुझ्याशी खूप सार बोलायच
मनात असलेल सर्व काही सांगायच
आपल्या सुख-दू:खांना वाटून घ्यायच
पण तू पुढाकार घेत नाहीस ह्याला मी तरी काय कराव?

का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.

आता तुम्हीच सांगा मला
आमच्या ह्या अबोल प्रेमाला
मी बोलक तरी कस कराव?

मैत्रि तुझी अशी असवी

मैत्रि तुझी अशी असवी,

आयुश्यभर सोबत राहावी,

नको कधि त्यात दुरावा ,

नेहमीच नवा फ़ुलोरा,

मैत्रि अपुली अशी असावी,

सर्वांना एकत्रित अनावी,

हसने रुसने चालत राहवे,

एकमेकांना समजुन घ्यावे,

मैत्रि आपण अशी जगवी,

एकमेकांचा आधार असावी,

सुख दुखात नेहमी सोबत असवी,

असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,

तुझी मझी मैत्रि अशी असावी

]मनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ, !!!!!!!!

मनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ,
ह्रदयाचा माझ्या केलास तु विनाकारणच खेळ.
मी म्हणालो नाही म्हणून काय ?
तूही म्हणायचं नव्हतसं.
चुकलेल्याला वाट,
तहानलेल्यांना विहीर,
आणि माझ्यासारख्यांना प्रेमाचा घाट,
का... तुला दाखवायचाचं नव्हतं.
मला वाटलं तू समझशील,
अनं.... तु माझा तू स्वीकार करशील.
नाही मजला तुझ्यापासून कोणतीचं आशा,
फ़क्त तुच आहेस माझ्या जीवनाची दिशा.
माझं मन झालय व्याकूळ फ़क्त तुझ्यासाठी,
करु नकोस दिशा भूल या ह्रदयाची.
मनातं आहे फ़क्त खंत तुझ्याच प्रेमाची,
देईन तुला मी साथ "सात जन्मांची".

मलाही girl friend मिळावी ॥

मलाही girl friend मिळावी ॥
सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

चौपाटीवर पाणीपूरीतून,
प्रणयाचेच घास भरवू ।
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥
आयुष्यातील सारी दु:खं,
जिच्या सहवासात टळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
आधी girl की आधी friend ।
आयुष्यभराचं नातं हवं,
का हवा one night stand ॥
देव करो तीच्याकडूनचं,
प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी

मी वाट बघते re

मी वाट बघते re मी वाट बघते re
बोलायच होत अजुन
, का झालास शांत तू...
काही गोष्टी डोळ्यांनी kalalya तरी ...
बोलुनच सांगाव्या ...
स्पर्शानी सांगायचं असतास .
का हातवारे करतोस
स्पर्शानी लवकर kalata रे...
किती दिवस .
असा किती दिवस अबोल राहणार..
बोलायला शिक रे ...
डोळे तुझे बोलके जरी,
मी वाट बघते रे ...
तुझ्या शब्दांची ...शब्दातून umalanaarya
मोरपिशी स्पर्शाची ..
स्पर्शातून bolnaarya .....
तुझ्या होकाराची..

प्रेमात असं का होतं ?

प्रेमात असं का होतं ?
एकाएकी जाणीव होते की त्याच्याशिवायही जगू शकते
त्याच्याशिवाय भर चांदण्यात गाढ झोप येऊ लागते
त्याच्या आठवणीने येणारा शहारा उमटेनासा होतो
आता ती त्याची मिठी नसते, तो फक्त वाराच असतो

त्याच्या नावाची हाक मारली तरी दचकेनाशी होते
त्याच्यावरून चिडवलं तरी, आता ती लाजेनाशी होते
फोनची वाट बघत नाही, वर स्वतःचा एंगेज असतो
त्याला! reply करायला तिच्याकडे balance नसतो

तो पिक्चरला बोलावतो तेव्हां मैत्रिणीशी गाठभेट असते
अचानक घरी जायचं असतं अन त्याची बस लेट असते
मुद्दाम त्याच्या ऑफिस वरून ऑटोही न्यायची नसते
तो काल काय करत होता याची नोंदही घ्यायची नसते

प्रेमात असं का होतं ?
ते आकर्षण कुठं विरतं ?

कुठे गेले ते मंतरलेले दिवस अन् धुंद रात्री
ती हुरहुर, ती जवळीक, ती लुटुपुटुची मैत्री
त्या हळव्या गोष्टी फक्त फक्त त्यालाच सांगण
त्याच्या तिच्या स्वप्नांत दिवस दिवस रमण

खूप भूक लागली असून अर्धा अर्धा वडापाव खाण
महिनों महिने लक्षात ठेवून त्याला आवडलेलं घड्याळ देण
त्याच्या क्रिकेटच्या वायफळ गप्पा तास न् तास ऐकून घेण
त्याला चिडून मनवून हट्टाने शौपिंगला घेउन जाण

प्रेमात असं का होतं ?
ते आकर्षण कुठं विरतं ?

त्याच्या बहिणीचा वाढदिवससुद्धा व्यवस्थित लक्षात होता
त्याच्या आवडत्या रंगाच्या ड्रएसेसच ढीग झाला होता
त्याच्या बरोबर घेतला तेव्हां हा teddy क्यूट वाटला होता
त्याच्या सोबत फिरताना कितीदा भयानक उशीर झाला होता

त्याच्या पत्रांचा ग्रीटिंग्सचा खच तिच्या गादीखाली होता
तिच्या पुस्तकाच्या मधल्या पानांत त्याचा 'तो' फोटो होता
त्यानं दिलेलं पहिलं रोझ इतके दिवस खालच्या खणात होतं
आणि कधीतरी आईबाबांना धीर करून सांगायचही मनात होतं

पण प्रेमात असं का होतं ?
ते आकर्षण कुठं विरतं ?

त्यानं सॉरी म्हटलं तरी तिने किती सहज फ़ोन ठेवला
छान तयार होउन, संध्याकाळी, चहा-पोह्यांचा ट्रे धरला.

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे

'नक्की कोण तू माझा' ???

'नक्की कोण तू माझा' प्रश्नाचा मी निकाल लावायचे ठरवले,
निकालाचा दिवस 'एक एप्रिल' ला निवडले,
प्रेमपत्र त्याच्या हातात दिले,
नजर त्याची झाली कावरीबावरी,
वाटलं हिची लग्नपत्रिकाच..हातात पडली..

त्याच्या चेह-यावरचे भाव वाचत होते,
माझ्या उतराच्या मी जवळ जात होत्ते,
आनंदाने तो बोलला,माझ्या मनातले बोललीस,
तुला विचारायची इच्छा होती पण नकाराने,
दोस्ती तुटु नये हीच काळजी होती..

विचार केला, विमान याचे खाली आणूया,
म्हटले त्याला, अरे वेडया, 'एप्रिल फूल' केले तुला,
दोस्तीत आपल्या प्रेम बिम आणाच कशाला,
उसने हसु आणत कसाबसा बिचारा बोलला,
'जातो,उशीर झालाय'..म्हणत त्याने रस्ता धरला..

डोळे भरले होते त्याचे,मी ही काही क्रूर नव्हते,
धावत त्याला थांबवले,परत 'एप्रिल फूल' बोलले,
माझ्या डोळ्यांतले भाव त्याने ऒळखले,
'एक एप्रिल'ने मैत्रीत प्रेमाचे धागे गुंफले,
'नक्की कोण आम्ही एकमेकांचे' ह्या प्रश्नाचे उत्तर दिले

.....येशील सांजवेळी

साद देती सखे गं या सागरी लहरी
येशील सांजवेळी या सागरी किनारी ।।धृ।।

येती किती तरी गं या सागरा उभारे
केस कुरवाळताना उठती किती शहारे
बोल छपवू नको गं ओठांच्या तिजोरी ।।
......येशील सांजवेळी

क्षितिजावरी अभाळ धरेवरी झुकले
प्रेम या सागराचे किनारी धडकले
भेटीस साक्ष देईल चांदणे रुपेरी ।।
......येशील सांजवेळी

रेंगाळला इथे गं हा रेशमी समीर
जात्या क्षणासवे होतोय जीव अधीर
आहे तुझ्याचसाठी हा श्वासही अखेरी ।।
......येशील सांजवेळी

एक क्षण

काळ्याभोर केसांत तुझ्या
क्षणभर तरी बुडु डे
केसांच्या बटा सावरताना
आज तुला पाहुदे
हास प्रिये एकदाच मला
क्षणभर तरी जगु दे

हात तुझा हातात आल्यावर
स्मित ओठांवर पसरु दे
गजरा माळतांना केसांत तुझ्या
मीच फुल बनुन फुलु दे
हास प्रिये एकदाच मला
क्षणभर तरी जगु दे

होईन तुझसाठी फुलपाखरु
तुझ्या तळव्यावरी बसुदे
होईन घन निळा मी
तुला चिंब करुन जाऊदे
हास प्रिये एकदाच मला
क्षणभर तरी जगु दे

होईन तान मी त्या कान्हाची
तुला गुंग करुनी जाऊदे
होईन मोरपीस मी तुझसाठी
वा-यावरी मज ऊडु दे
हास प्रिये एकदाच मला
क्षणभर तरी जगु दे

नेहमीच तुमचाच

पुन्हा एकदा..

ब-याच दिवसांनी पुन्हा एकदा
पुन्हा एक चेहरा खुणावतोय

डोळे मिटले की
पापण्यान्मध्ये लापतोय
डोळे उघडले की
नजरेसमोर तरळतोय..
हसरा, लाजरा, साजिरा
मूकपणे बोलणारा...
.. हरवून टाकणारा

सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ डोळे
त्यावर लपलपणा-या पापण्या
गुलाबाच्या पाकळ्याच..
बाकी काहीच नाही
मी इतकंच पाहीलं
मला इतकंच दिसलं
इतकंच पुरलं.. पुरून उरलं..!!

पुन्हा एकदा..
काळजाचा ठेका काही मात्रा थांबलाच
आणि नंतर लागली लग्गी
दिडपट की दुप्पट..
तालात आहे की नाही..
माहीत नाही
पण मी मुग्ध आहे
मी धुंद आहे.. पुन्हा एकदा.

पुन्हा एकदा साचलेल्या डोहाला
वाट मिळाली आहे..
वाहायला, खळखळायला
.. मनसोक्त नाचायला
आता मी वाहाणारच,
प्रश्न इतकाच..
असाच वाहाणार की पुन्हा एकदा..
साचणार..
आटणार..
शेवाळणार..
हिरवटणार.
बघू या..!!

एक मात्र नक्की.
माझी जागा बदलणार
अन् मागे एक खळगा राहणार..
.. इथे मी साचलो होतो....

सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?

सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?


आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?


तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!



माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?


''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ

ती किती वेडी आहे,

ती किती वेडी आहे,
एवढी शी गोष्ट तिला समजली नाही
मी किती वेडा आहे,
मला एवशी शी गोष्ट सांगता आली नाही
ती किती वेडी आहे,
डोळ्यातल्या भावना तिला काळात नाही
मी किती वेडा आहे,
तिच्या डोळ्यातच पाहत नाही
ती किती वेडी आहे,
प्रत्येक गोष्ट निरखून पाहते
मी किती वेडा आहे,
प्रत्येक गोष्टीत तिला पाहतो
ती किती वेडी आहे,
प्रत्येक गोष्टीवर रगवते
मी किती वेडा आहे,
मला तीच रागवन् ही आवडत
ती किती वेडी आहे,
उद्या तीच लग्न आहे
मी किती वेडा आहे,
तिच्या लग्नाची तयारी करतोय

आधीच ठरले होते तुझे माझे नाते

आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
एकांतपणी ही माझ्या साथ तु येते
कळत न कळत गीत तयार होते
योगा योग म्हण नाही तर अंधश्रधा
पण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
टाळतो मी , जाळतो मी, तरी ही
मनापुढे कित्येकदा हारतो मी
स्वप्नात ही तुझाच वावर
झोपेत ही मुखी नाव तुझेच येते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
नाही कळत जगाला जगापलिकडे हे जाते
"कृष्ण, कृष्ण "करीत मीरा विष ही पीते
ठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होते
मान न मान तु पण मन गीत तुझेच गाते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते

आहे एक वेडी मुलगी......!

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?


आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?


तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!



माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?


''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!

प्रेमाची शान

एक एक सजने तुझ्या संगे जगने
कल्पना ही किती छान आहे
एक ध्यान देऊन नको जाउ मन मोडून
तूच तर माझा प्राण आहे ;
एक एक सजने तुझ्या संगे जगने
कल्पना ही किती छान आहे
किती सांगू तुला आता कसे समजाउ
तुज्या भोवती आसा मी किती घुटमळत राहू
एकदा तरी मान ना ,मन माझे जान ना
तुला प्रेमाची आन् आहे "
एक एक सजने तुझ्या संगे जगने
कल्पना ही किती छान आहे
जीथे जीथे जातो तेथे तुलाच मी पाहतो
तुज्या स्वप्नमधे दिवस रात्र झुरत राहतो
ए हो म्हणून स्वप्न माझे बनून हीच प्रेमाची शान आहे
एक एक सजने तुझ्या संगे जगने
कल्पना ही किती छान आहे

तुझ्यात मी पाहिल

आसे कसे प्रिया तू वेड्या सारखे प्रश्न करते ?
काय पाहिले तुम्ही माझ्यात आसे कसे म्हणते ?
गोंधळलोना या प्रश्नानी खरच काहीच नाही सुचले
काय सांगावे ,काय समजवावे ,बोलनेच खुटले
कसे समजवीनार स्वप्नच पड़न ,काळजाच धडधडन
नाही मला नाही हे जमणार हे आसे बोलन
लहान मूल कसे निरागस आसते
भल बुर त्याला काहीच कळत नसत
आश्याच लहान मुलाचा आवखळपना
तुझ्यात मी पाहिलाय
बरसनारा पावूस जसा सरे सरे भिजवुन टाकतो
तन मन सारे क्षणात सुख्वुन टाकतो
त्या धारांचा आवेग तुज्यात मी कितीदा अनुभवलाय
वरु न जरी शांत आसला तरी आतून सागर बैचैन आसतो
सागराचा तो शांतपना कित्येकदा तुझ्यात दिसलाय
सारे काही बरोबर घेवून वारा नुसताच वाहत आसतो
सुगंध दुर्गन्ध सारे काही तो बरोबर नेत आसतो
त्या वार्याचा आवखळपना कित्येकदा तुज्यात जाणवला आहे
कधी कधी मी वेड्या सारखा विचार करतो
प्रत्येक जागी , प्रत्येक गोष्टीत सहभागी तुला धरतो
माझ्यासारखा वेडेपना नेहमी तुझ्यात मी पहिला आहे
शब्दाना आर्थ आसतोच तरी सर्व त्यात नाही व्यक्त करता येत
न व्यक्त करता येणारे सारे मी तुझ्याकडून मी मिळविले आहे
हृदयतील आणु रेनूत तुला मी पाहिले आहे
कारण हृदयाच्या प्रत्येक कोपरयात
फक्त तुला आणि तुलाच मी पाहिले आहे

तुला मानावेच लागेल

माझे मन मला सांगतय
तुला यावेच लागेल
ठरव किती ही , काही ही तू ,
तुला यावेच लागेल
प्रेम आहे तुझे माझ्यावर
तुला मानावेच लागेल
वेडा झालोय तुझ्या प्रेमात
तुला समजून घ्यावेच लागेल
लाख खोटे नकार दे तू
पण तुला हा म्हणावेच लागेल
प्रेम जर माझे खरे आसेल
तर तुला झुकावेच लागेल
माझे मन मला सांगतय
तुला यावेच लागेल
नाही जर आता आलिस
आयुष्य भर पाछतावा लागेल
मी तर एकदाचा संपून जाईल
तुला रोज मरावे लागेल
सकाळ संध्याकाळी आठवणीत माझ्या
स्वताला जळावे लागेल
माझे मन मला सांगतय
तुला यावेच लागेल
प्रेम माझे खर आहे
तुला मानावेच लागेल
तुला यावेच लागेल

प्रेमाला मनातील शब्दात बांधायचे

नाही बांधू शकत ताज महल मी

म्हणुन काय मी शोक करत बसायचे

प्रेमाला मनातील शब्दात बांधायचे

ठरविले मी काही तरी लिहायचे

घेतला आधार मी शायरीचा

आणि ठरविले मनसोक्त वहायचे

नाही जमल ताज महल तर

यमुनेचे पवित्र पाणी आपण व्हायचे

नाही होऊ शकत नायक मी

म्हणुन काय नालायक व्हायचे

खुप मनापासून केलेल प्रेम

पायाखाली तूडवायचे .

ठरविले मी नाही आता नाही

तटस्थ आपण रहायचे

थोडून सारी बंधने

प्रेमसागारत डुबायचे

सांग ना कधी तरी माझीच तू होशील

सांग ना कधी तरी माझीच तू होशील

चार चोघात देखील हात हातात देशील

किती दिवस घाबरत जगणार

किती दिवस चोरून भेटणार

सांग ना कधी तरी माझीच तू होशील

जगासमोर न घाबरता माझे नाव घेशिल

वेगवग ळे बहाने करुन तुझे मला भेटन

जाते जाते म्हणत उगाचच थाबन

काहीतरी बोलून मग लाजण

पाठ करुन माझ्याकडे डोळे झाकून बसन

सांग ना कधी तरी माझीच मला म्हाणशील

चार चोघात देखील हात हातात देशील

मला वाटायच तीच माज्यावर जीवापाड प्रेम आहे

मला वाटायच तीच माज्यावर जीवापाड प्रेम आहे .
फ़क्त मी विचारायची देरी आहे ..
मलाही ती प्रचड आवडायची
जेव्हा ती मला आपला "best friend" म्हणायची ,
मनातल गुपित फोडायची ,
लाडत येऊन बोलायची ,
लटक रागवायाची ,
माज्याशी भान्डायची ,
गप्पा मारायची ..
माज्या कविता ऐकायाची,
त्याना उत्सुर्फ़ दाद द्यायची ..
माज्यावर प्रेम करायची ..

पण मला माहित नव्हत ती मला
फ़क्त आपला "best friend " मानायची ..


मला खुप यातना जाल्या, जेव्हा ती म्हणाली .
"मी प्रेमात पडले रे त्याच्या...."
पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तेव्हा तिची थट्टा केली .
अन तिची कळी लगेचच खुलवली,
तिला काय सांगू काय नको जालेल.
असे तिला मी कितीदा तरी पहिलेल .
मी म्हणालो, "मज़ा आहे बुवा एका मुलीची.!"
ती म्हणाली," तुला पण मिळेल रे साथ कोणा सुन्दरीची.!"
मन रडत असतानाही रडत होतो.
तिला कलू न देण्याची सगळी काळजी घेत होतो .
तिला पण काहीच कळल नाही .
प्रेमात पडलेल्या तिला वेगळ काहीच दिसत नाही .


मी पण तसदी घेतली नाही मनातल काही बोलायची..
कारण ती मला आपला "best friend" मानायची ..


ती गेल्यावर मी सुन्न जालो ,
आतल्या आत मी मग्न जालो ,
तिच्या आठवणी मी आठवू लागलो .
त्या पुसून टाकायचा निष्फ़ळ प्रयत्न करू लागलो ,
तिच्याशी बोलताना मी तिची खुप थट्टा करायचो .
'त्याच्या' नावाने तिला भरपूर चिडवायचो .
कोणाशी भांडल्यावर मात्र तिला माजी आठवण यायची .
आजही माज्या मध्यस्थीची तिला गरज वाटायची ,
ती अजुन ही माज्याशी खुप बोलायची ,
खुप काही सांगायच म्हणायची ,
पण कधी ते सांगायला विसरायाची..

मनातले अश्रु मी तिला कधीच दिसू दिले नाहीत ,
कारण ती मला तिचा " best friend " मानायची .

मी मात्र आतल्या आत कुढत बसायचो,
माज्याच एकटेपणात हरवलेला असायचो.
तिचे बोलणे ऐकत असताना ,
मुकपणे आपले अश्रु गिळत असायचो
तिच्यासमोर नाटक करणे फारच कठीण होते .
त्याच तीच भांडण ती मला येऊन सांगायची .
माज्याशी बोलून मोकळ वाटल अस म्हणायची.
स्वत:च्या वेदना लपवून तिचे बोलणे..
शांतपणे ऐकून घ्यायचो .
एक दोन गोष्टी सांगून..
तिला बरे वाटावे असे काहीतरी करायचो ..

माज्या बोलन्यापेक्षा माज्या असन्यावरच ती समाधानी असायची ..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची ..

आधेमधे तिलापण काही तरी हुक्की यायची ,
कोणाच्याही नावावरून मला चिडवून पहायची .
मीही हसून खोटा राग दाखवायचो ,
तिच्या चीडवन्यावर खोटे चिडून तिला खुष करायचो .
माज्या वेदना आणि दुःख कधीच दाखविले नाही ,
एका शब्दाने ही तिला कलु दिले नाही .
त्या दिवशी त्याची आणि माजी भेट जाली..,
माजी ठसठसणारी जखम पुन्हा उघडी पडली ..
तिने माजी ओळख चांगला मित्र म्हणुन करून दिली .
मी भेट दिलेल्या "माज्या कविताची वही" त्याला दाखविली.
दुसरयाच दिवशी त्याने तिला आपली कविता भेट दिली..
कारण त्याला कदाचित तिच्या बद्दल असुरक्षितता भासली .


तिला मात्र कधीच याची भिती नाही वाटायची..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची .


तिच्या लग्नामधे तिने मला आवर्जुन बोलावले..
"लग्नाला नक्की यायचे " असे पत्रिकेत लिहून पाठविले .
माज्या ह्रुदयाची शकले मीच गोला केली ,
एक तिच्या आवडीचे गिफ्ट घेवून तिची भेट घेतली ..
चेहरा हसरा ठेवून मी काळजी घेतली तिला खूष ठेवायची .
कारण ती मला तिचा "best friend" मानायची..


तिच्या लग्नानंतर मात्र मी एक गोष्ट केली
कटाक्षाने तिची भेट टाळली .
माज्या वागन्यातला फरक .
तिला कलू द्यायची माजी तयारी नव्हती ..
कारण त्याच्या प्रेमात बुडालेल्या तिला..
माज्या अश्रुंची मुळीच कदर नव्हती .
मी इतके दिवस असे काही दाखवले नाही
कारण ती मला फक्त तिचा"best friend " मानायची ..


आयुष्यभर एकट राहून जगत आलो,
तिच्या पत्राना जानून बुजुन एक दोन ओळीत उत्तर लिहू लागलो
माज्या बिजी लाइफचा चांगला बहाना माज्या कड़े होता..
तिच्याही व्यापनमुले तिला आजिबत वेळ नव्हता ..
तरी पण माज्या एक दोन ओळीना ती उत्तर पाठवायची ..
कारण ती मला तिचा "best friend" मानायची..


तिच्या अखेरच्या क्षणी मी तिला भेटलो ,
इतके दिवस थाम्बलेल्या अश्रु संकट बोललो ..
शेवटच्या घटका मोजताना तिला फार बोलावले नाही ..
मलाही जास्त वेळ थाम्बवले नाही .
तरीही एका वाक्यात तिने सांगितले ..
"तू आता पर्यंत खरे मित्रत्व दाखवले "
डोळ्यानीच ती म्हणायचे ते म्हणाली ,
ती मला तिचा "best friend " मानायची..

आता माजाही प्रवास संपत आला आहे ,
मागे बघताना त्या हीरवळीचा हेवा वाटत आहे ,
आताच पोस्टमन येवुन हे पारसल देवून गेला ..
माज्या मनात प्रश्नांचे काहुर माजवुन गेला .
काय गरज होती का तिला तिच्या मृत्युपत्रात
आवर्जुन माज्या साठी काही ठेवायची ...!
पण नाही , कारण ...
ती मला तिचा "best friend " मानायची..


तिच्या डायर्यांमधे सापडले ,
माजे हरवलेले क्षण, आठवणी ,
खोडया, थट्टा, हसने, बोलणे, रडणे..,
गुपित, गोष्टी, गाठी, भेटी ...
मैत्री आणि बरच काही ..
आणि पटत गेले की ..,
खरच ती मला तिचा "best friend " मानायची..


जेव्हा शेवटच्या पानावर तिच्या ओळी वाचल्या ..
ह्रुदयातिल अश्रूना जणू वाटा मोकाळ्या जाल्या..


"मला वाटायच त्याच माज्यावर जीवापाड प्रेम आहे ..
फक्त त्यांन मला विचारायची देरी आहे ...
मला तर तो प्रचंड आवडतो ..
मी त्याला " best friend " म्हटल्यावर ..
गालातल्या गालात हसतो ....
मनातल गुपीत सांगतो . माजे ऐकतो ...
माज्याशी भांडतो ....
त्याच्या कविता ऐकवून , माज्या कड़े अर्थपूर्ण कटाक्ष टाकातो ..
माज्या वर प्रेम करतो ....
खरच का तो माज्या वर खर प्रेम करतो ...Huh?


जणू माज्या ओळी मी तिच्या डायरीत वाचत होतो ..
मरन्यापूर्वी सरणावर जळत होतो..
काय गरज होती मरण शय्येवर नियतीनेही
माजी अशी क्रूर थट्टा करायची ...Huh
त्या शेवटच्या क्षणी मला जाणवून दयायची की ...
वेड्या ती तुला तीच "true love " मानायची..

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात


भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं


मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

ती म्हणजे,

ती म्हणजे,
अगदीच निरागस
नेहमीच हसणारी,
दु:खात सुद्धा
सुख शोधणारी...

मैत्रीण असावी अशी
निरागस आणि प्रेमळ,
बोलणे तिचे
रोखठोक आणि सरळ...

दु:ख पचवण्याची क्षमता
मात्र तिची अफाट होती,
म्हणुनच की काय सर्वांना वाटे
दु:खाची झालर तिजवर कधीच नव्हती...

तिला समजण्यात इतरांसारखाच
मी ही तसा कमीच पडलो,
तिला काय हवे ! काय नको !
यासाठी अनेकदा धडपडलो...

तिला त्रास होइल अशा
सर्व व्यक्ति अन् गोष्टींना
मी सहजतेने टाळले,
न बोलण्याचे दिले वचन
मनापासून पाळले...

यापूर्वी कधी
मी रागावलो नाही,
ती म्हणायची,
तुझं असलं वागण
मला काही पटत नाही...

आता काळजीच्या हेतूने
अधूनमधून रागावतो,
तिचे आपले उगाच म्हणणे
की, अविश्वास दाखवतो...

दिवसागणिक दिवस जाता
आठवणींचे क्षणही सारेच सरले,
सोबत असावी कुणाची म्हणुनी
तिलादेखील घेवुनी गेले...

दूर वर गेली तरी
तिची काळजी वाटतेच हो...!
न मिळालेले सुख तिला
भावी आयुष्यात मिळत राहो...

आता तरी मनाला थोडे
हलके हलके वाटते,
प्रत्यक्ष्यात नाही पण
स्वप्नात मात्र ती भेटते...

विचारते मला,
कसा आहेस ? काय करतोय ?
मी म्हणतो,
काही विशेष नाही ग..!
चेह-यावर तुझ्या आनंद बघतोय...

ती म्हणजे
अगदीच निरागस
नेहमीच हसणारी,
दु:खात सुद्धा
सुख शोधणारी...

क्षण क्षण वाटताना

क्षण क्षण वाटताना

क्षण क्षण वाटताना
दोघांची साथ असते
अंधार दूर करण्या साठी
दिव्यातिल ती वात असते ......

येणारया क्षणाना
कोणाचीही परवा नसते
तो क्षण कसा सावरावा
हीच तर दोघांची कसोटी असते .....

मी कसाही वागलो तिच्याशी
तरी ती माजी वाट बघत असते

वागतेस तू जशी तशीच ओळ जन्मते


वागतेस तू जशी तशीच ओळ जन्मते

वाटते भले बुरे अता बरेच सारखे
होत राहते अशामुळे भलेच सारखे

जाउदेत, सोड राग, जाहले चुकून ते
सांग मी कुठे उगाळतो खरेच सारखे?

वागतेस तू जशी तशीच ओळ जन्मते
गात राहते महत्त्व आपलेच सारखे

पाहिजे मिळायला शरीर वेगळे अता

जा मुक्त तू

जा मुक्त तू

जा मुक्त तू सार्‍या जुन्या शपथातुनी
जा मुक्त तू सार्‍या नव्या वचनातुनी

माझ्यातुनी केले वजा आहे तुला
शून्यात आलो परतुनी शून्यातुनी

आता तुझे तर मौनही झाले घुमे
अन मागतो मी उत्तरे शब्दातुनी

जाताच तू विझले कसे सारे दिवे?

बिलगून रात्र गेली.

बिलगून रात्र गेली.

उधळून तुझ्यावरी रे, बहरून रात्र गेली,
उठवून उरात वणवा, विझवून रात्र गेली.

चाले हितगूज रे रोज तुझ्याच आठवांशी,
हे वेड जुनेच माझे, उमजून रात्र गेली.

तू सांग कसे हसू मी? मदधुंद या क्षणांशी,
जे घाव दिलेस वर्मी, उगळून रात्र गेली.

चाललो आहे कुठे मी, जायचे होते कुठे?


चाललो आहे कुठे मी, जायचे होते कुठे?


मी जसा नाही तसे मी व्हायचे होते कुठे ?
चाललो आहे कुठे मी, जायचे होते कुठे ?

वेगळी तू,वेगळा मी राहतो एका घरी
वेगळे याहून काही व्हायचे होते कुठे?

वेगळे दोघे, तरीही राहतो एका घरी
चांगले याहून काही व्हायचे होते कुठे?

निरपेक्ष

निरपेक्ष

माझ्याशी नाम्याचा विठू बोलणार नाही
पण तरी आळवणी मी सोडणार नाही

सोबतीला कुणीसुद्धा जरी असणार नाही
वाट एकटा चालेन वसा टाकणार नाही

बरसेल खडकांच्या पालथ्याच घड्यावर
पण आकाशीची गंगा कधी सुकणार नाही

गझल


गझल

तु कशास शोधते माझी हरवलेली कहाणी
वक्षावरी अजुन माझ्या कोरलेली तु निशाणी

वासनेचे पाश सारे कोठल्या कोठे पळाले
अंतरी दाटुन आहे भाबडी प्रिती अडाणी

कोरडे होते सरोवर माझ्या सताड लोचनांचे
कोण किमया आज झाली दाटले नयनांत पाणी

काय होतास तू, काय झालास तू...


काय होतास तू, काय झालास तू...

आरश्या घातकी का निघालास तू?
काय होतास तू, काय झालास तू!

एवढी काय मित्रा चितेची नशा?
का पडावास होऊनसा लास तू?

जीवना वाटले तेच झाले, असो!
सत्य येता समोरी पळालास तू

पोचलो त्याच जागी पहा मी नि तू
मी कुठे ऐकले जे म्हणालास तू?

करशील माफ मज तू

करशील माफ मज तू

आलाप घेववेना, कंठात स्वर वळेना
नग्मा अबोल झाला का हे मला कळेना

बेरंग झालि श्याई, कागद उडून गेला
निस्तेज हुनर पडला अन शब्दही जुळेना

तू कारवां उठविला बेहोश मज बघोनी
गेलीस टाकुनी अन कुणि दोस्तही मिळेना

ओझे झाले जगण्याचे

ओझे झाले जगण्याचे

भावनांना दारात तुझ्या मान नाही
कौतुकाची आस मनी जपलीच नाही

तुडवित चाललो रानाला एकटाच्
पायवाट मागे साकारली कळलीच नाही

प्रेमाला माझ्या कुणाची साक्ष नाही
दावेदार जन्मा आले कोण माहीतच नाही

श्रावणात रंगला खेळ उन्हापावसाचा

थांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा

थांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा

थांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा
आणि ना थांबायचे तर वळण हे टाळून जा

बांधलेल्या चौथर्‍याला कर हळूसा स्पर्श तू
अन्यथा सार्‍या स्मृतीना तू पुरे जाळून जा

चौथर्‍याच्या खालती ती जागते तव चिंतनी

मी अजुनी तसाच आहे

मी अजुनी तसाच आहे

क्षणात बदलतो आसमन्त मी अजुनी तसाच आहे
न वेदना न खन्त मी अजुनी तसाच आहे

जाणिवा बोथटुनी गेल्या मी इतुके सोसले
किती समीप आला अन्त मी अजुनी तसाच आहे

मी जाणतो तत्वज्ञान फक्त चतकोर भाकरी चे
मज कळला न वेदान्त मी अजुनी तसाच आहे

जाताना मज निरोप द्यावा माझ्या गाण्याने

जाताना मज निरोप द्यावा माझ्या गाण्याने

डोळे यावे भरुन कुणाचे अलगद पाण्याने
कोणाच्या हृदयात तुटावे माझ्या जाण्याने

रसिकांपाशी आहे माझी एकच ही प्रार्थना
जाताना मज निरोप द्यावा माझ्या गाण्याने

वाङमयचोरीचा माझ्यावर आळ नका घेऊ

झाक आहे !


झाक आहे !

जिंकण्याला हारण्याची झाक आहे
दु:ख ओझे मणभर सुख छटाक आहे

सोडुनी दे आठवांना गात जाणे
जीवनाची हीच मजला भाक आहे

नाद आहे व्यापतो दाही दिशांना
हा तुझा आक्रोश की ही हाक आहे

कोरडे घेऊन डोळे कां फिरावे ?

पाऊस


पाऊस

तुझ्या अंगणी रिमझीम झरलेला पाऊस
माझ्या दारी... फक्त कोसळलेला पाऊस

अलगद विरूनी गेली..... ती चांदरात...
कोणा च्या तरी डोळी साकळ्लेला पाऊस

तो असतो आजकाल एक्-एकटा असा...
श्रावणसरीतुन जसा निखळलेला पाऊस

आपल्याच भावना...आपल्याच वेदना...

तुझ्या प्रेमरंगात नाहून गेले

तुझ्या प्रेमरंगात नाहून गेले

कटाक्षात एकाच पाहून गेले
तुझे स्वप्न बघण्यात वाहून गेले

विचारायचे "मी तुला भावले का?"
मनाच्या तळाशीच राहून गेले

जरी बोलले नाहि काही तरीही
खुणेनी तुझे नेत्र बाहून गेले

"उद्या भेट" ऐशा तुझ्या त्या खुणेने

गुज मनातले...

ओठातले शब्द परतायला होते
मलाही नको तिथेच थांबायला होते

शीणते आभाळही धरूनी स्वतःच स्वतःला
घेण्या आधार धरेला भीडायला होते

तु गेल्यावरी न जाणे काय हरविते
उगाच काहीतरी शोधायला होते

फुल फुलास केव्हा कळते? सांग

नसेल जर का, तुला भरवसा

मुक्त्तक
व्याकुळ माझ्या, नजरेला दे, नजर प्राशिण्यासाठी
तृषार्त माझ्या, अधराना दे, अधर प्राशिण्यासाठी
वसंतात तू, वसंतात मी, वसंत अवती भवती
मोहरलेल्या, वृक्षाला दे, बहर प्राशिण्यासाठी

नसेल जर का, तुला भरवसा,
नसेल जर का, तुला भरवसा, श्र्वासांची तू, झडती घे
रूप तुझेही, भरून उरले, डोळ्यांची तू, झडती घे
दुसरा तिसरा, विचार नाही, अविरत चिंतन, तुझेच गे
कधी अचानक, धाड टाकुनी, स्वप्नांची तू, झडती घे
तेल, वात अन्‌, ज्योत दिव्याची, तुझी आठवण, आणी मी
कसे तुला, समजावू वेडे, प्राणांची तू, झडती घे
क्षणाक्षणावर, तुझाच ताबा, तुझीच सत्ता, सभोवती
वाटल्यास मम, रोजनिशीच्या, पानांची तू, झडती घे
कळेल तुजला, कळेल मजला, भाकित अपुल्या, प्रीतीचे
तुझ्या नि माझ्या, तळहातांच्या, रेषांची तू, झडती घे
या ह्रदयाचा, अथांग सागर, नभी चंद्रमा, रूप तुझे
काठाची तू, झडती घे अन्‌, लाटांची तू, झडती घे
अजुन कोणता, हवा पुरावा सांग `इलाही' सांग तुला
तुझ्याच रंगामध्ये रंगलो, ग़ज़लांची तू, झडती घे

तुझी वंचना, साधना, होत आहे

तुझी वंचना, साधना, होत आहे
तुलाही अता, वेदना, होत आहे
पुन्हा मेघ आलेत, आश्र्वासनांचे
पुन्हा एकदा, गर्जना, होत आहे
जशी लागली, ओहटी आसवांना
मनाचा किनारा, सुना होत आहे
जरा कुंडलीला, विचारून बघ तू
मनोकामना, वासना होत आहे
नवा क्षण, नवा क्षण, नवा क्षण कशाचा
नव्याने म्हणेतो, जुना होत आहे
कशाला उगी, फुगवटा पाहिजे रे
तुझे बोलणे, वल्गना होत आहे
शिळा एक होती, घडविलीस मूर्ती
मलाही अता, भावना होत आहे
तुला स्पर्श केला, असा भास झाला
किती गोड, संवेदना होत आहे
जिथे तू तिथे मी, जिथे मी तिथे तू
दुरावा `इलाही', गुन्हा होत आहे

आकाशाला, भास म्हणालो,

आकाशाला, भास म्हणालो, चुकले का हो?
धरतीला, इतिहास म्हणालो, चुकले का हो?
चिरंजीव वेदना, अंतरी, दरवळणारी
जखमांना, मधुमास म्हणालो, चुकले का हो?
कलेवराला, जगण्यासाठी, काय लागते?
आठवणींना, श्र्वास म्हणालो, चुकले का हो?
मरण्याआधी, नाव सांग त्या, हत्याऱ्याचे
मी त्याना, विश्र्वास म्हणालो, चुकले का हो?
निंदानालस्तीही, केवळ, मिळवत गेलो
प्रीतीला, हव्यास म्हणालो, चुकले का हो?
लिहिल्या कविता, लिहिल्या ग़ज़ला, गीते लिहिली
सरस्वतीचा, दास म्हणालो, चुकले का हो?
चौदा वर्ष, पतीविना, राहिली उर्मिला
हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?
घात आप्त, आघाता सगे, अपघात सोयरे
ह्रदयाची, आरास म्हणालो, चुकले का हो?
चुकले का हो? चुकले का हो? म्हणणाऱ्यांनो!
याचनेस, गळफास म्हणालो, चुकले का हो?
जन्मठेप, आत्म्याला कोणी, दिली `इलाही'?
कुडीस, कारावास म्हणालो, चुकले का हो?

मी नजरेला, खास नेमले

मी नजरेला, खास नेमले
मी नजरेला, खास नेमले गस्त घालण्यासाठी
तुला वाटते, ती भिरभिरते, तुला पाहण्यासाठी
म्हणून तू, जाहलीस माझी, माझी, केवळ माझी
किती बहाणे, केले होते, तुला टाळण्यासाठी
घडीभराने, मलूल होतो, गजरा वेणीमधला
खरे सांगतो, खरेच घे हे, ह्रदय माळण्यासाठी
गुपचुप येउन भेटत असते, तुझी आठवण मजला
तिचा दिलासा, मला पुरेसा, आहे जगण्यासाठी
कधी कवडसा, बनून यावे, तुझ्या घरी एकांती
उघडझाप करशील मुठीची, मला पकडण्यासाठी
तू म्हणजे गं, फूल उमलते, गंध तुझा मी व्हावे
दवबिंदू, व्हावेसे वाटे, तुला स्पर्शिण्यासाठी
तुझी साधना, करता करता, अखेर साधू झालो
निर्मोही, जाहला `इलाही', तुला मिळविण्यासाठी