Wednesday, June 3, 2009

गझल


गझल

तु कशास शोधते माझी हरवलेली कहाणी
वक्षावरी अजुन माझ्या कोरलेली तु निशाणी

वासनेचे पाश सारे कोठल्या कोठे पळाले
अंतरी दाटुन आहे भाबडी प्रिती अडाणी

कोरडे होते सरोवर माझ्या सताड लोचनांचे
कोण किमया आज झाली दाटले नयनांत पाणी

No comments: