स्वर्गातले एक फूल, पृथ्वीवर अवतरलेघेऊनी ओंजळीत त्याला, निरखून मी हसलेफुलावरील दवबिंदूंन्ने, हळूच मज पाहिलेहृदय वेडे माझे, त्या पाकळ्यांमध्येच हरविलेयेताच घरी त्याला, खिडकीपाशी ठेविलेक्षणात माझे सारे, जिवनंच त्यास अर्पिलेविश्वसाच्या धाग्याने, त्याच्याशी खूप बोललेदु:खाच्या काळ्या ढगांन्ना, मी वेडी साफ विसरलेहोताच संध्याकाळ मात्र, " ते " फुलसुद्धा कोमेजलेअचानक आयुष्यात माझ्या, हे अघटित कसे घडलेपुन्हा एकदा त्याच्याकडे, सुन्न मनाने मी पाहिलेआयुष्याच्या या प्रवासात, पुन्हा मी मागे एकटी उरले.... पुन्हा मी मागे एकटी उरले..........
No comments:
Post a Comment