आज मी माझ्या मनात एक मंदिर उभारलय
त्यात देव म्हणून फ़क्त तुलाच वसवलय
करणार नाही मी ह्या मंदिराच्या गाभार्यात इतर कुणाची स्थापना
माझ्या प्रेमाची फूले वाहुनी करीन तुझीच पूजाअर्चना
आरतीतूनी माझ्या गाईन तुझे गुणगान
संरक्षणास तुझ्या लावीन प्रणाला माझे प्राण
तुझ्यावरची माझी श्रद्धा कधी होणार नाही कमी
भक्ती माझी अखंड राहिल ह्याची देतो मी हमी
तुझ्याच आराधनेमध्ये देवा मी माझे सर्वस्व वाहीन
माझ्या प्रेमाने तुजभोवतालच्या दशदिशा उजळविन
होणार नाही ह्या मंदिरात प्रवेश इतर कुठल्या देवाचा
गरज भासल्यास प्राण त्यागून देईन पुरावा माझ्या प्रेमाचा
वाटतय देवा आता तुझ्याकडे काहीतरी मागाव
तू नेहमी मला एकट्यालाच तुझा परमभक्त मानाव.
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment