Sunday, June 14, 2009

आयुष्य

आयुष्य म्हणजे कटकट.. जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतंसुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतंआयुष्य म्हणजे वणवा....इथे वेदनांना घेउन जळावं लागतपोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतंआयुष्य म्हणजे अंधार...इथे काळोखात बुडाव लागतंपरस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतंआयुष्य म्हणजे पाऊस....आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतंकष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतंपण ...आयुष्य हे असेच का ?मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्यजिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

No comments: