नाही बांधू शकत ताज महल मी
म्हणुन काय मी शोक करत बसायचे
प्रेमाला मनातील शब्दात बांधायचे
ठरविले मी काही तरी लिहायचे
घेतला आधार मी शायरीचा
आणि ठरविले मनसोक्त वहायचे
नाही जमल ताज महल तर
यमुनेचे पवित्र पाणी आपण व्हायचे
नाही होऊ शकत नायक मी
म्हणुन काय नालायक व्हायचे
खुप मनापासून केलेल प्रेम
पायाखाली तूडवायचे .
ठरविले मी नाही आता नाही
तटस्थ आपण रहायचे
थोडून सारी बंधने
प्रेमसागारत डुबायचे
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment