Wednesday, June 3, 2009

पाऊस


पाऊस

तुझ्या अंगणी रिमझीम झरलेला पाऊस
माझ्या दारी... फक्त कोसळलेला पाऊस

अलगद विरूनी गेली..... ती चांदरात...
कोणा च्या तरी डोळी साकळ्लेला पाऊस

तो असतो आजकाल एक्-एकटा असा...
श्रावणसरीतुन जसा निखळलेला पाऊस

आपल्याच भावना...आपल्याच वेदना...

No comments: