प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे
प्रेम असते,
पण नेहमीच
तुमचं आणि आमचं
तसं सेम नसतं...
तुम्ही म्हणता,
लग्नआधी प्रेम करणं
म्हणजे शेम असतं,
आम्ही म्हणतो,
प्रेम लग्न आधी करण्यातच
तर खरं फेम असतं...
आमच्या मते,
प्रेमाच्याच मुलीशी
लग्न करणं
हेच आमचं एम असतं,
तुमच्या मते,
प्रेमाचं आमच्या
"flirting" हे एकच
त्याचं नेम असतं...
परीस्थितिनुरूप
पावले उचलिता
होवू शकले नाही
लग्न तिच्याशी
तरी ख-या प्रेमात
सारं काही क्षेम असतं,
मैत्री- प्रेम
लग्न अन् वियोग
असं चाललेलं
काळाचं ते एक गेम असतं...
म्हणुन,
प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे
प्रेम असते,
पण नेहमीच
तुमचं आणि आमचं
तसं सेम नसतं...
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment