नेहमी मला लपून-छपून बघत असतोस
पण मी दिसली नाही की मग मात्र गोंधळून जातोस
इमारतीखाली येउन रोज मी जाण्याची वाट पाहत असतोस
पण मी आले की मात्र आडोश्याला जाउन लपून बसतोस
का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.
लांबून नजरेस नजर देतोस
पण जवळ आलास की मात्र लाजून डोळे झुकवतोस
"आज काहीही झाल तरी तिच्याशी बोलायच" अस ठरवून येतोस
पण बोलण्यासाठी अगदी जवळ येउन देखील, न बोलता निघून जातोस
का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.
रोज स्वप्नात येउन छळत असतोस
तिथे मात्र खूप वेळ बोलत असतोस
आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत असतोस
पण समोर येउन एक लाल गुलाबही न देऊ शकतोस
का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.
कधी कधी वाटत तुझ्याशी स्वतहून जाउन बोलाव
"मैत्री करणार का?" अस तूला विचाराव.
मैत्रीतच मग तुझ्या मनातल जाणून घ्याव.
पण तू माझ्याबद्दल काय विचार करशील
ह्या विचाराने मन माझ घाबराव.
का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.
मलाही आहे तुझ्याशी खूप सार बोलायच
मनात असलेल सर्व काही सांगायच
आपल्या सुख-दू:खांना वाटून घ्यायच
पण तू पुढाकार घेत नाहीस ह्याला मी तरी काय कराव?
का रे वेड्या अस करतोस??
सांग ना येउन तू माझ्यावर मनापासून प्रेम करतोस.
आता तुम्हीच सांगा मला
आमच्या ह्या अबोल प्रेमाला
मी बोलक तरी कस कराव?
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment