Sunday, June 14, 2009

ध्येय

मला पुन्हा लहान व्हायचंयलोकांवर निस्सीम प्रेम करायलानिर्मळ, श्वेत मेघ बनायचंयसुसाट वार्‍याशी झुंजायलारंगीत छानसा पक्षी व्हायचंयआकाशात उंच भरारी घ्यायलामला जलाचा साठा व्हायचंयतहानलेल्यांची तहान भागवायलामला एक छान "मन" व्हायचंयदुसर्‍या चांगल्या मनांशी बोलायलामला एक छान "सुर" व्हायचंयसर्वांच्या मनात उमटायलामला मोठा वेडा व्हायचंयवेड्या "शहाण्यांन्ना" लाजवायलाशक्य नसले काही जरीनिदान एक चांगला माणूस व्हायचंय....... निदान एक चांगला माणूस व्हायचंय......

No comments: