तु असताना तुझाशी
तु असताना तुझाशी,
खुप खुप बोलायचं ठरवतो,
मुक्या भावनांना,
शब्दात बसवायचं ठरवतो,
चार ओळी जोडुन
कवीता करायची ठरवतो,
पण तु आलीस की,
शब्द अबोल होतात,
मन मात्र बोलयला लागत
तु नसताना मात्र
मुक्या भावनांनचे शब्द होतात,
आपसुक चार ओळींची कविता होते,
एक गोष्ट मात्र नक्की
तुझ्या असण्यापेक्शा तुझ्या,
नसण्यातच मी जास्त जगतो
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment