माझी ती अशी असावी...
माझी ती अशी असावी,
जगात दूसरी तशी नसावी,
मलाच सर्वस्व माननारी,
माझी ती अशी असावी\\१\\
प्रानजळ असावी, अवखळ असावी,
परी ती अगदी सोज्वळ असावी,
सर्वांना अगदी आपलं माननारी,
माझी ती अशी असावी\\२\\
फारच सुंदर, फारच गोरी,
फारच देखणी पण नसावी,
मजवर भरपूर प्रेम करणारी,
माझी ती अशी असावी\\३\\
आपली माणसं, आपलं घर,
आपलेपणा जपणारी असावी,
ससूलाही आई म्हणनारी,
माझी ती अशी असावी\\४\\
चाणाक्ष, हुशार, व्यवहारी,
आयुष्यातील सल्लागार व्हावी,
माझ्या चुका लक्षात घेणारी,
माझी ती अशी असावी\\५\\
माया, प्रेम आपुलकी,
हे सर्व देणारी असावी,
माझी ती कशी असावी?
माझी ती अशी असावी\\६\\
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment