कधी कधी वाटते माझ्या मना
तू नसतीस तर काय अर्थ
राहिला असता जीवना
जेव्हा लाडात म्हणतेस मज तू साजणा
जगण्याचा मिळतो जणू एक नवा बहाणा
पाहूनी तुझ्या डोळ्यातील स्वप्नांची आर्तता
मनी विचार येतो कधी करू शकीन
मी त्या स्वप्नांची पुर्तता
देऊ शकत नसलो जरी आत्ता काही तुला
तरी वचन देतो सदैव तत्पर असिन मी तुझ्या साथीला
तुझ्या गालावर पडणारी खळी ती पाहून
हृदयात येतात आनंदाच्या लहरी दाटून
ओठांवर तुझ्या उमलनारे ते मंद हास्य
उलगडून देते जगण्याचे एक नवे रहस्य
नेहमीच आठवत असत मला
कठीणसमयी तुझ ते मला साथ देण
द्विधा मनस्थितीत सापडलेल्या मला
हळूवारपणे तुझ ते समजावण
कसे समजावू ग तुला
तुझे माझ्या आयुष्यात असलेले स्थान
तुझे माझ्या जीवनात येणे म्हणजे
परमेश्वराने मला दिलेले सर्वात मोठे वरदान
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment