Sunday, March 7, 2010

बाकी मी मजेत ......!!!

बाकी मी मजेत ......!!!
तू गेल्यापासून ना....
थोड़ी हरावाल्यासार्खिच असते...
उगाचच सकाळ पासून ,तुजी वाट बघत असते....
बाकी मी मजेत.........!
सगल्यान्मधे राहूनही एकटी एकटी असते.....
मनामधे सारखी तुझ्याशी ऑनलाइन असते .....
बाकी मी मजेत........
हल्ली पुस्तकान मधे माझ मन रमत नाही...
मित्र मैत्रिणी सुधा ,ओलखिचे वाटत नाही....
बाकी मी मजेत ........
समोरचा निसर्ग माला नीरस वाटतो....
फुलांचा सहवास त्रास दायक वाटतो....
बाकि मी मजेत .........
हल्ली सकाळ तुझ्या येण्याचा सन्देश घेउन येत नाही....
अणि रात्र हलवे क्षण अठ्वु सुध्धा देत नाही
बाकी मी मजेत.........
हल्ली डोळ्यात नवी स्वप्न नसतात.....
पापण्यांच्या कडा कायम भिजलेल्या असतात ...
बाकि मी मजेत..............
अता तुझ्यावर मी रागावले नाही ...
रागाव न्या इतकी सुधा मी ,माझी राहिले नाही
बाकि...........? ......................मजेत.......

त्या रात्री मी एकटीच जळत राहिले...

त्या रात्री मी एकटीच जळत राहिले...

अगदी सुरुवातीपासून तू माझ्या
सोबत होतास.
माझ्या असण्यात हि होतास,
माझ्या नसण्यात हि होतास.
तुझ्या विरहात रात्र रात्र जगताना
देखील तू माझ्या सोबत होतास.
तुझ्या साठी प्राण जेव्हा तडफडला,
तेव्हा देखील तू माझ्या श्वासात होतास.
मी मेल्यावर माझ्यासाठी रडणाऱ्या त्या
फसव्या चेहऱ्यात देखील
तू माझ्या सोबत होतास.
सारणाची वाट चालताना,
माझ्या चार खांद्यांमध्ये देखील
तू माझ्या सोबत होतास.
माझ्या चितेची आग शांत होण्याची वाट हि न बघता
तू निघून जाताना मात्र,
सरते शेवटी सरणावर मी एकटीच राहिले..
आणि खरच सांगू त्या रात्री मी एकटीच जळत राहिले

त्या चिंब पावसात...तु सोडून जाताना..!!

त्या चिंब पावसात...तु सोडून जाताना..!!

फुले उमलतात नि कोमेजुन जातात.,
आपले अस्तित्व मात्र सोडून जातात.,
प्रेम-भंगाने का स्पंदने थांबतात.,
आपलेच गरजेला हात सोडुन जातात..!!

कोमेजलेल्या फुलासराखिच दिसत होतीस.,
रदत-रडताच हसत होतीस.,
आयुष्य भरासाठी प्रेम भरून गेलीस.,
जिवंतपणिच कफ़न देऊन गेलीस.,

इशार्याने तुझ्या स्वप्ने रंगवू लागलो.,
एक-एक पल तुझा होऊ लागलो.,
तुझ्यासोबत कुठेकुठे फिरायला जायच.,
तुझ्या खोल डोळ्यात फ़क्त आनंदच भरायच.,
देवा अगोदर सकाळी तुला पहायच.,
ऑफिसला जाताना तुझ चुंबन घ्यायाच.,
पण सारी स्वप्ने तू तुडवत गेलीस.,
हृदयाचे माझ्या तुकडे-तुकडे करून गेलीस..!!

वाटले होते तुही माझ्यावर प्रेम करतेस.,
माझ्या इतकच तुही झुरतेस.,
फुलपाखरा सारखे मन तुझ निघाल.,
इवलासा आनंद देऊन लगेच निघुन गेल.,
केसंवरही तुझ्या होतो ग मी फ़िदा.,
कसने गला कापन्याची तुझी चांगलीच अदा..!!

एकट जगण आता नकोस झालय.,
तुच माझे ह्रिदय कुरताडून टाकलय.,
मरणाला मिठी मारण्या अगोदर तुला पहावस वाटते.,
एकदाच तुला कवटालावेसे वाटते.,
शेवटी आठवनीच अत सोबती.,
चटका सारखी वाट पाहीन.,
माझ समंद आयुष्य तुझ्या चरणी वाहीन.,
नाही जरी निरोप जगाचा घेताना.,
पण प्राणच निघून जातो वेडया मनाला समजावताना..!!
त्या चिंब पावसात...
तु सोडून जाताना..!!

Thursday, March 4, 2010

फकत एकदा म्हण मी तुझाच आहे ग

फकत एकदा म्हण मी तुझाच आहे ग
तु विसर मला कायमच.......
पण-
"मी तुला विसरलो"
अस कधीही म्हणु नकोस...
तु कधीच वाचु नकोस
माझी कुठलीही कविता
पण म्हण-
मी वाचेन तुझी कविता कधीतरी...
तु कधीच स्वीकारु नकोस
माझ्या या खऱ्याखुऱ्या प्रेमाला
पण.. "तुझं प्रेम खर आहे ग"
तु कधीच देऊ नकोस
मला फ़ुलांचा गुछ
पण- एखादं गुलाबाचं फुल तरी
ठेवुन जा रे या माझ्या हातावर.....
तु कधी लक्षही देवु नकोस
मला होणाऱ्या यातनांकडे...
तु कधी रडुही नकोस
माझ्यासाठी.......
पण जाता जाता
अंत्यदर्शनाला ठेवलेल्या त्या माझ्या प्रेताला
एकदा , फक्त्त एकदा घट्ट कवटाळ
आणि म्हण-
या जन्मात नाही
पण पुढच्या जन्मात का होईना

मी तुझाच आहे ग!!!!
मी तुझाच आहे ग!!!!

!!!!!!!!आठवण!!!!!!!!!

!!!!!!!!आठवण!!!!!!!!!


येइल का गं तुला माझी आठवण ?
मी दूर गेल्यानंतर
होइल का गं पापणी ओली?
जुनं सारं आठवल्यानंतर
भासेल का एखादी संध्याकाळ
उदास एकाकी नकोशी.
अन् पाहून त्या वेड्या चन्द्रास
आठवेल का रात्र जागवलेली?
विचारलं मी काहीसं हळवं होत
अन् धरला
तुझा हात अफ़्गदी घटट्
तू टाकलास एक शांत कटाक्ष
आणि वार्यावरती गंध पसरावा
इतक्या हळूवारपणे बोललीस/
.
.
.
..
.
.
.
.
.
वेड्या आठवण येण्यासाठी विसरावं लागतं !!!!!!!!!

निघुन गेलीस.......

तु निघुन गेलीस.......

तु निघुन गेलीस
कळलेच नाही जाताना
जगच बदलेल माझे
कळले नाही तुझ्याकडे बघून हसताना........
रडू नकोस
उगीच चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना................
आभाळं भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण
आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना....................
अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना...................
झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना................
माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या
रस्त्यावर चलताना अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना..............
विषय शोधावे लागतील आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील
का गं पुन्हा एकत्र असताना.....................
शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना...............
सोन्यासारखा
संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना..........

पाणावलेच नाहीत कधी ते तुझे डोळे होते,,,,

पाणावलेच नाहीत कधी ते तुझे डोळे होते,,,,
अन् नुसतेच रडले ते वेडे माझे हृदय होते...........

जुळलच नाही कधी ते आपलं नातं होतं,,,,
अन् तुटलं ते सगळंच माझं होतं...........

वळलीच नाही कधी ती तुझी नजर होती,,,,
अन् कळलीच नाही ती माझी भावना होती.........

समजलच नाही कधी ते तुझं वागणं होतं,,,,
अन् समजूनच घेतलं नाहीस हे आता माझं जगणं होतं........

विसरलास ती तर तुझी सवयच होती,,,,
अन् आठवणे हि तर माझी गरजच होती..........

मला जाळणं हे तर तुला माहीतच होतं,,,,
अन् शांत जळत राहणं मला अवगतच होतं...........

संपणारच होतं ते तुझं आकर्षण होतं,,,,
अजूनही झुरत आहे ते माझं वेडं प्रेम होतं............

सतत तुझा विचार येत राहतो

सतत तुझा विचार येत राहतो
सतत तुझा चेहरा दिसत राहतो
सतत तुझी आठवण येत राहते

कधी दिवस भराच्या घायीत
तुझा चेहरा मनाला शांत करतो
कधी एकांतात तुझा चेहरा
मनाचा एकांत हरवून टाकतो
कधी अडचणीत तुझा चेहरा
जगण्याची नवीन आशा देतो

तुझाच चेहरा तुझीच आठवण
कधी हे मला लिहायला लावते
तू आणि तुझ्या साऱ्या गोष्टी
हल्ली माझ्या जगण्याच्या हालचाली ठरवतात
तुझे ते हास्य तुझे ते शब्द
नेहमी कानावर पडत राहतात
हेच शब्द कधी कधी वेळेचा हि विसर पाडतात

माझ्या जगण्यावरील तुझे हे नियंत्रण
कदाचित तुला हि माहित नसेल
जे ह्या जगात सगळ्यांनी केलं
ते प्रेम हि असंच असेल ??

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर मित्रान्नी बसायचय

आजचं तिच दुःख

आजचं तिच दुःख
कोणीच पुसू शकणार नाही
तिच्यात वाहणारा सागर
आज तरी थकणार नाही

तिचा तो अवतारच
सांगत होता
घडलेल्या घटनेला
पाहत होता
हुंदके तिचे आवरण्याचा
प्रयन्त तो करत होता

आधार द्यायला सोबत
होती तिची हि माउली
सावरणार तरी कशी ती
होती तिची ती सावली

थोडेच दिवस घालवले
तिने त्या सावलीसोबत
अजून हातही न लावलेला
आणलेल्या तिच्या बाहुलीसोबत

ओठातून शब्द ऐकण्यासाठी
किती आतुर असावी ती
आणि क्षणात अडीच महिन्यात
हातात नसावी ती

खेळ सुरु होण्याआधीच
संपला होता तिचा
नियतीने असा - कसा डाव
मांडला होता तिचा

तिच दुःख हे आज तरी
सावरणार नाही
अथांग वाहणाऱ्या सागराला
आज तरी अडवणार नाही.

अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून

अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून
एकदा रात्र म्हणाली,
बराच काही काळ तळपतोस
मग शेवटी असा का मावळतोस?"
सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या सुखासाठी
तू आसुसलेली असतेस तुझ्या चंद्राच्या मुखासाठी !
आपलं तारुण्य उधळतेस , पहाटे पहाटे दु:खी होतेस
पुन्हा यावं लागतं मला , तुला फुलवायला , तुझ्या सुखासाठी !
रात्र : " खरंच राजा , चंद्रापेक्षाही तूच खरा सखा आहेस
भेटतोस काही क्षणांसाठी , पण धग देतोस जगणार्‍या प्रत्येक कणासाठी !
मला तुम्ही दोघेही हवेत , दोघांना एकत्र मला बघायचंय
'एक हात तुला अन् एक हात त्याला' असं बेधुंद जीवन जगायचंय !
सूर्य म्हणाला , "मलाही सखे एकदा तुझ्या कुशीत निजायचंय
ही धग खूप असह्य आहे , शांत होईतो चांदण्यात भिजायचंय !पण .....आपल्याला असं वागता येणार नाही
तुझ्या रात्रीच्या प्रियकरासाठी तुला जायलांच हवं
आणि.....तुझ्या त्या सुखी क्षणांसाठी.....
"तो" येताच , मला असं विझायलाच हवं !!!!!!!!!!!!!!

कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही"

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही


रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही



मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही


जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही"

प्रेम करणं सोपं नसतं

प्रेम करणं सोपं नसतं
सर्व करतात, म्हणून करायच नसतं
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं

शाळा कॉलेजांत असच घडतं
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं


हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं

प्रेम कधी मागून मिळत नाही

प्रेम कधी मागून मिळत नाही
ते आतून जाणवावं लागतं,
नजरेतून कळलं तरी
शब्दांतून सांगावं लागतं...

रोज तुझी आठवण येते आणि
रोज डोळ्यांत पाणी उभं राह्तं,
तू जवळ हवीस असं वाटताना
खूप दूर आहेस,हे सांगून जातं...

कित्येकदा तुला सांगावसं वाटतं
पण शब्द ओठातच गुदमरतात,
पापण्यांची अबोल किलबिल होते
आणि शब्द डोळ्यांतच उमटतात...

माझ्या नजरेचा अथॅ तुला समजावा
म्हणून मी शब्दांची वाट धरली,
ते शब्द वाचूनही तू अबोध राहिलीस
या वाटेवर येऊन मी चूक तर नाही केली?

का,कोणासाठी इतके वाटावे?
का,कोणासाठी इतके झुरावे?
अनोळखी,तरीही परिचित असावे,
यालाच का "प्रेम" म्हणावे?

असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघिनाही सांगता येत नाही,
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्द् माञ ओठांत येत नाहीत...

प्रेम की मैत्री??

प्रेम की मैत्री??

मित्रांनो जर कोणाला याच उत्तर माहिती असेल तर मला जरा सांगाल का??

हे प्रेम म्हणजे नक्की काय असत ???
कुणी तरी सांगाल का हे प्रेम म्हणजे नक्की काय असत ???
कशाला म्हणतात प्रेम ??

कोणाचीतरी सतत आठवण येण हे प्रेम असत ??
दिवसरात्र तिचा विचार करण हे प्रेम असत ??
येणार नाही माहित असुनही तिच्या फ़ोनची वाट पाहन हे प्रेम असत ??
की ती नाही म्हणुन गर्दीतही एकाकी वाटन हे प्रेम असत ??

ऑरकुट वर सारख तिच्या प्रोफाइल ला visit करण...
तिचा no डायल करून रिंग वाजन्याआधी फोन कट करण याला प्रेम म्हणतात ??
मी बोलणारच नाही तिच्याशी ठरवूनही ...
फ़ोन नाही तर नाही...पण atleast एक मिस कॉल ची अपेक्षा करण याला प्रेम म्हणतात
की तिला गरज नाही तर मी तरी का भाव देऊ अस म्हणुनही
तिच्या एका सॉरी ने क्षणात विरघलुन जाण याला प्रेम म्हणतात ??

तिच्या एका नजरेसाठी व्याकुळ होण याला प्रेम म्हणतात ??
तिच्या मिठीसाठी आतुरण याला प्रेम म्हणतात ??
तिच्यासाठी वाटनारया काळजिला प्रेम म्हणतात ?? की
की त्या ख़ास मैत्रीला प्रेम म्हणतात ??

तिच्या जगात आपल स्थान नाही माहित असुनही
तिच्या बरोबर स्वप्न रंगवन याला प्रेम म्हणतात ??
स्वताच्याही नकळत तिच्यात गुंतत जाण याला प्रेम म्हणतात ??

७ जन्माची सोबत देण्याचे promise करून ७ महिन्यात सोडून जान ह्याला प्रेम म्हणतात??
की तिच्या सर्व चूका विसरून तिला माफ़ करण ह्याला प्रेम म्हणतात??

कुणीतरी सांगाल का मला ??
हे प्रेम म्हणजे नक्की काय असत ???

"अनपेक्षित भेट"

"अनपेक्षित भेट"

आज पुन्हा तुझी-माझी भेट झाली...
माझ्या डायरीची पानं नवी-कोरी झाली....
समोर आलास सारं पुन्हा आठवले...
मिटलेले मनाचे दरवाजे अलगद उघडले...
पहिल्यांदाही अशीच नकळत भेट झाली
निम्मित पावसाचे अन भेटची वेळ वाढली....
अनेकदा भेटलो त्यानंतरही आपण...

मैत्रीने तुझ्या केले मनात घर..
वेडा वेडा व्हायचास बोलतांना माझ्याशी
खुप सारी मस्ती,थट्टाही जराशी..
तुझं सोबत असणं गॄहीतच धरलं मी...

मैत्रीशिवाय तुझ्या,आयुष्याचा विचारच नाही कधी...
पण कधीच नाही जाणल्या मी भावना तुझ्या...
मी तर रमले होते विश्वात माझ्या...
अचानक गेलास निघुन ,बोलला नाहीस काही,
पण सोबत नसणे तुझे सांगुन गेले बरच काही,

काळ चालत रहिला,अशीच वर्ष उलटली...
स्मॄतीनीं तुझ्या नेहमीच माझी साथ दिली...
हरले नाही मी,वाट पाहत राहीले तुझी,
येशील तु परतुन खात्री होती माझी,

आज पुन्हा भेटलो अगदी तसेच अनपेक्षित...
नजरेला नजरा भिडल्या,अन मनं झाली आनंदित...
आज तुझ्या नजरेतले भाव मात्र मी अचुकपणे हेरले..
नकळत माझ्याही त्यात होकाराचे सुर मिसळले.....!!!!!!

तू परत येऊ नकोस ............

तू परत येऊ नकोस ,
जुन्या आठवणी जागवायाला ,
आधीच खुप दीवस लागलेत ,
मनावरी जखमा भरायला .........................

दुःख अंतरी दाबुन ,
एकांतमाधे रडत असतो ,
म्हणुन का कोणास ठाउक,
सर्वांसोबत हसत असतो .............

तू आयुशत परत येऊ नकोस,
तूजे सथान मीळवयाला,
आधीच फार वेळ लागलाय ,
तुझ्या आठवणी वीसरयाला .........

पण ,
काहीही असले तरी ........
तुला शोधयाला तरी ,
नजर माझी फीरत असते ,
आकाशात चद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटून येते .................

तुला विसर्नायाचा ,
अत्ता कुठे मी प्रयत्न करतोय ,
पण ही कवीता लीहता लीहता,
पुन्हा तुलाच ग़ मी आठवतोय .............................

तुझ्याशी खूप बोलावे वाटते

तुझ्याशी खूप बोलावे वाटते
पण शब्द चुकण्याची भीती वाटते
तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते
पण विरहाची भीती वाटते...

तुझ्या खूप जवळ यावे वाटते
पण तोल सुटण्याची भीती वाटते
तुझा तो मन भुलविणारा चेहरा
मला अस्वस्थ करतो
पण त्याचे उत्तर देण्याची भीती वाटते...

तुझ्या सहवासात मी नाही याची उणीव भासते
पण तू माझ्या आयुष्यात आहे याची
मला सतत जाणीव असते
तुझी स्तुती शब्दात करावी वाटते
पण तुझ्या पुढे शब्द अपुरे पडतात....

तुझ्या पुढे जग सोडावे वाटते
पण समाजाची भीती वाटते

तुझ्या याच गुणांवर मी प्रेम करते
पण तुला सांगण्याची भीती वाटते....

तुझी माझी मैत्री अशीच सुगंधी राहो
अशी मी जन्मो जन्मी प्रार्थना करते

तूच संग मला हे प्रेम आहे कि मैत्री
तुला काय वाटते....???

थांब जरा तू.. ..तू बरसतच रहा ..........

थांब जरा तू
बरसू नकोस
ती येणार आहे
तु ही तरासू नकोस

तू बरासलस तर
ती अडकून बसेल
तू थांबावा म्हणून माझे
पत्र ती हातात घट्ट पकडून बसेल

काही क्षण तुझ्या थांबण्याची ..
मग ती…ती वाट पाहील
निघेल मग पावसात ती
सावरत सावरत ती माझ्या कडे येईल

ती आल्यावर मग शांतच राहील कदाचित
ओढणिने चेहरा पुसत, थंडीने कूडकुडत
म्हणेल “माफ कर.मला उशीर झाला
मी निघालेच होते पण पाऊस आला”
मी माझा जॅकेट तिला देईल,
ती म्हणेल नको रे मी ठीक आहे.
हळूच मी तिचा हात हातात घेईल,
मी म्हणेल या बरसनाया पावसाप्रमाणे
तू माझ जिवनात सुख होऊन बरसशील ?
तिला खूप आनंद होईल.ती लाजेल ही थोडीशी
पण हळूच डोळ्यात तिच्या आसवे येतील कदाचित,
घरचे काय म्हणतील हा विचार तिला पडेल.
माझे जॅकेट मला परत करून.
निशब्द होऊन निघून जाईल ती
निशब्द मला करून तोडून जाईल ती

“”तू थांबू नको रे
पावसा तू बरसतच रहा
ती नाही आली तरी चालेल मला
तिच्या नकारा पेक्षा …
ती तुझ्या मूळे नाही आली
असे खोट खोट..
मनाला समजावन आवडेल मला….”"

तू थांबू नको रे
तू बरसतच रहा ..........

बापाचं प्रेम

बापाचं प्रेम
आई बद्दल सगळेच बोलत राहतात
पण बापाबद्दल कोणी बोलत नाही
जणू त्या बापाला सगळेच गृहीत धरतात
त्याची जाणीव हि कोणाला होत नाही

आईचं प्रेम चांदण्या प्रमाणं असतं
आयुष्याच्या नभाला मोहक बनवतं
बापाचं प्रेम त्या ढगा प्रमाणं असतं
रणरणत्या उन्हात नकळत सावली देतं

मुलीच्या लग्नात आई रडत असते
बाप रडत नाही म्हणून तो कठोर नसतो
त्याला हि तो क्षण वेदना देतो
पण त्याचं ते प्रेम अबोल असतं
आतल्या आतंच तो सोसत असतो
भावना न व्यक्त करणं जणू त्याचं कर्तव्यच असतं

बापाचं प्रेम मेणबत्त्या प्रमाणे असतं
दुसर्याला प्रकाश देतं पण स्वतः मात्र जळत असतं
त्याच्या त्या प्रकाशात सगळेच न्हाहून जातात
पण त्याच्या अस्तित्वाबद्दल कोणीच बोलत नाही
आईच्या प्रेमाला कसलीच तोड नाही
पण बापाची जाणीव कोणालाच का होत नाही ??

डोळ्यातील अश्रू पडतात

डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि
याचा अर्थ असा नाहि की
तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि

शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात

कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो

डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब
उगाचच का अडकून बसतात
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून
किती निष्ठूरपणे सोडून जातात

नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कस कळणार

जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं

तिची आठवण आली कि...

तिची आठवण आली कि
मि समुद्राकडे बघतो अन्
पायाला भिजवणार्या प्रत्येक लाटेत..
तिचे अस्तित्व शोधतो!

तिचि आठवण आली कि
मि आकाशाकडे बघतो
अन् ति दिसेल म्हणुन् उगाचच्..
तारे तुटन्यचि वाट् बघत् राहतो!

वाफ़ळत्या चहात् सुध्दा तिचाच् गन्ध् असतो..
त्या गन्धात् हरवुन्..
चहा मात्र थन्ड् होवुन् जातो!

प्रत्येक् वेळि आरशात् मात्र
फ़क्त् तिच् मला दिसते..
अन् तिल निरखुन् पहान्यात माझे आवरणे नेहमि रहाते!

ति समोर यायचि अन्
श्वास् श्वासत् अडकायचा
तिच्या गोड हसन्यात्...
जिव माझा कासाविस व्हायचा
मग्..
ति घाबरुन् माझा हात हाति घ्यायचि
तिच्या तप्त स्पर्शात्
मि सगळे विसरुन् जायचो!


आता मात्र तिचि आठवण आलि कि..
मि फ़क्त् माझ्याच् हाथाकडे बघतो
अन्
हातावरल्या रेघामध्ये
तिच्या हातातल्या रेषा शोधतो!

तिची आठवण आली कि.............

प्रेम कुणावरही करू नये!

प्रेम कुणावरही करू नये!
आपण आपलं
मस्तीत जगावं
हॉटेलात जावं..
खावं - प्यावं...
पोरींचं बिल उगाच भरू नये;
प्रेम कुणावरही करू नये!


प्रेम म्हणजे
एक अजब गेम असते
जिच्यासाठी आपण
धडपडतो...
तडफडतो
ती चक्क
दुसऱ्याची डेम असते
सत्य ध्यानी आल्यावर
फुक्कटचं झुरू नये;
प्रेम कुणावर करू नये!


म्हणे-
प्रेम म्हणजे
एक पवित्र नातं असतं!
अहो, कसचं काय!
प्रेम म्हणजे
एक विचित्र जातं असतं...
दळणारं आंधळं
दळदळ दळत असतं
आणि पीठ मात्र
भलतचं कुत्र खात असतं!
आपण दळलेल्या पिठावर
ऐऱ्यागैऱ्याने चरू नये;
म्हणून आपणच
प्रेम कुणावर करू नये!


चेहऱ्यावरचं चांदणं तिच्या
कितीही दुधाळ असलं,
गुलुगुलू बोलणं तिचं
कितीही मधाळ असलं,
तरी...
शहाण्यानं मधमाशी
हातात धरू नये;
प्रेम कुणावरही करू नये.......

आज पुन्हा एकदा

आज पुन्हा एकदा
हृदयावर आभाळ दाटलं
आठवणींच्या पावसात भिजून गेलं
नकळतच त्या क्षणांमध्ये हरवून गेलं

सोसाट्याचा वारा सुटला
आणि आठवणींच्या पानांना उडवू लागला
कुठेतरी खोल लपलेल्या त्या हृदयाच्या खोर्यात
पुन्हा एकदा माझ्या मनाला घेऊन गेला

समुद्राच्या लाटांन प्रमाणे
एक एक आठवण हृदयावर थडकू लागली
काळाच्या ओघात विसरून गेलेल्या दिवसांमध्ये
नकळतच मला घेऊन गेली

मग विजेचा कडकडात झाला
आणि सार्या नभाला चिरून गेला
काही कळायच्या आताच
हृदयाला माझ्या दुभागून गेला

मग रिमझिम पावसाच्या सरी आल्या
डोळ्यांच्या पापण्यांना हळुवार भिजवून गेल्या
निसर्गाच्या ऋतूंनी जसा रंग बदलावा
माझ्या हृदयाचा आसमंत बदलून गेला

मिळणारच न्ह्व्तीस कधीच मला
तर भेटलीस्च का ग तू ?
सोडून मला जाणारच होतीस
तर आठवणींचं ओझं का देऊन गेलीस तू ?

भेटली होती एकदा असीच ...

भेटली होती एकदा असीच ...

भेटला होती  एकदा असिच 
मनात कल्पना नसताना ..
'बस'ली  होती  समोर माझ्या
कॉलेज मधून येताना..

नव्हती पडली नजर तिच्यावर..
ध्यान होते 'संगीता'वर..
पण जेव्हा नजर तिच्यावर खिळली...
दडपण आले माझ्या मनावर..

दिसले फक्त तिचे  नयन
मला बसल्या जागेवरून..
पहायचा होता चेहरा तिचा
मला मात्र काही करून...

ऊन आडवे पडले होते
तिच्या सुंदर डोळ्यांवरती..
अन् नजर तुझी माझ्या हृदयाचा
ठोका जशी चुकवत होती..

पहात होती  पुन्हा पुन्हा
माझ्याकडे वर बघून..
अन् केले मला  नजरकैद
मीही तेव्हा हसून..

क्षणभर काही सुचत नव्हते..
काय करू कळत नव्हते..
चेहरा तिचा  पाहायचाय
एवढे मात्र निश्चित होते..

अखेर आलं लक्षात माझ्या
वेळ आलीय उतरायची...
काही केल्या थांबत नव्हती
तळमळ माझ्या जीवाची..

मग मनात ठरवले...
काही झाले जरी...
उतरल्यावर चेहरा तिचा
पाहीन एकदा तरी...

वाटलं मला तुही
पाहत असशील माझ्याकडे...
म्हणूनच हिम्मत झाली नाही..
बघण्याची तिच्या कड़े ..

बस निघून गेल्यावर
कळले चुकून मला.
सबंध अंग थरथरत होते..
न पाहताच तिला ..

मनाची बेचैनी माझ्या
तेव्हा मला जाणवली..
तिला  पाहण्याची इच्छा मात्र
कायमची अधुरी राहिली....

break up नंतर ३ वर्षांनी....

break up नंतर ३ वर्षांनी....

३ वर्षांनी अचानक भेटलास

काहीस अनोळखी हसलास

hello hi झाल्यानंतर इथे कुठे विचारलस

formality म्हणून coffee प्यायला नेलस

शेजारी बसायच सोडून समोर जाउन बसलास

coffee च्या घोटागणिक कसलस दुःख पीत राहिलास

पूर्वी माझ्या डोळ्यात हरवणारा तू

स्वतःतच कुठे तरी हरवला होतास

पण काय झाले हे विचारायचा हक्क सुद्धा

माझ्या कडून हिरावला होतास..

हतबल होउन तुझ्याकड़े बघत राहिले

ते जुने दिवस शोधत राहिले

पण तुझ्यातला 'माझा तो' कुठे तरी हरवला होता

समोर असलेला त्याच चेहर्याचा कोणी अनोळखी होता

डोळ्यात वाच माझ्या...

डोळ्यात वाच माझ्या...

त्या दिवशी रस्त्यात भेटला
सहा महिन्यांपासून याच शहरात आहे म्हणाला
पण कधीही मला शोधायचा प्रयत्न नव्हता केला

माहिती होत त्याला
हरवून बसेल तो स्वतःला
म्हणुनच कटाक्षाने टाळल होत भेटण मला

पण नियतीच्या पुढे कोणाच काय चालणार
त्याचा हा हट्ट ती तरी किती दिवस पुरवणार
समोर आणून उभ केल होत माझ्या

काहीही न बोलता उभा होता
तरीही बरच काही सांगत होता
रस्ता चुकलेल्या कोकरागत घरी यायला तडफडत होता

शब्द मूक होते
पण डोळ्यातले भाव लपवने
त्याच्या हातात नव्हते

त्याने न सांगताच मी हे ताडले
दुराव्याचे रूपांतर घट्ट मिठीत झाले
भरलेले डोळे बरसू लागले

आणि
मी नव्याने त्याची झाले.....!

मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब आहे

मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब आहे
मी अत्तर तर ती त्यातला सुगंध आहे
माझ्या आयुष्याची ती एक चित्रकार आहे
अंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहे
कोणत्याही वादळात तग धरून राहीलेली माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहे
जिच्यामुळे मी, माझी कविता आहे
ती माझी......माझीच फक्त आई आहे.

तिच्या प्रेमात पडतांना...

तिच्या प्रेमात पडतांना
तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
तोंड दुखेपर्यंत बडबडलो
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं.

तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
तिच्या नजरेला नजर भिडवतांना
तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.

तिच्या हाताचा, ओठणीचा,
स्पर्श हवाहवासा वाटतो
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
हा विषय काढायचं राहूनच गेलं.

हसत राहीलो, हसवत राहिलो
तिला दरवेळी, दर भेटीला.
तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं.

ती आली की वेळही
उडून जायचा मला न समजता.
पण,
त्या दिवशी ती आली आणि निघाली
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं...

"काय मला विसरू शकशील???

मी नसेन तर...........
तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?
कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील?
कोणाच्या आसवांना टिपशील?
कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील?
कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील?
कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?

बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील,
समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील,
ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल,
ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील,
सांग तेव्हा काय करशील?

कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला,
माझी आठवण येताच...
मोबाइलवर लक्श नकळत जाईल,
पण तो वाजणार नाही...
तुला काहीतरी चुकचुकल्यासारखे नक्की वाटॆल...
सांग तेव्हा काय करशील?

मी नसेन तर ...
तुला चित्रपट रटाळ वाटेल...
सुन्दर धुनही बेकार वाटेल...
पुस्तकही नाराज वाटेल....
मनातून नक्की तळमळशील..

दिवसभर दुस-यांच्या चाणाक्श नजरेपासून लपशील...
उगाच किना-यावर माझी वाट बघशील...
संधीकाळी हुरहुरशील...
माझ्या आठवाने बेचैन होशील..
पण अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील...
मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन...


गर्दीतही एकटा राहशील,
पुन्हा पुन्हा मागे पाहशील,
मी नजरेस पडणार नाही...
हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील..
तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील.....कुठेतरी...
सांग तेव्हा काय करशील?

तू लाख स्वत:ला रमवशील,
दुस-यांमध्ये स्वत:ला हरवशील,
नवीन ना्त्यांना जोडशील....पण
खरच सांग .........
"काय मला विसरू शकशील???"

खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ...

खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ...

काट्या वरुन चालताना एकदा हसुन बघ,
आपल्या विरहातिल गेलेले क्षण एकदा मोजुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

गळुन पडलेल्या झाडाच्या एका-एका पाना कडे बघ,
जीव लावून जगवलेल्या झाडाला एकदा मरताना बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

जीवनात मिळालेल्या सुख-दुःखाची बेरीज करुन बघ,
बाकी काहीच उरले नाहि याचा अंदाज घेवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

मुसळधार पावसात विस्कटलेल्या घराकडे बघ,
माझ्या जीवनरुपी आकशात दुःखाच्या विजेचा तांडव एकदा बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

स्वतःच्या जिवंतपणी मॄत्युला डोळ्या समोर बघ,
तो हि लवकर येत नाहि म्हणुन खंत करणाऱ्या माझ्या मनाकडे बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

खरंच तुझ्या प्रेम भंगाने मी किती तुटुन पडले आहे हे समजण्या साठि...
एकदा माझ्यावर मनापासुन खरे प्रेम करुन बघ,
प्रेम भंगाने मला लागलेल्या झळा एकदा तु पण अनुभवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

कोरा अल्बम मला अजून पूर्ण करायचा आहे...!!!

काल दुपारी आठवणींचा अल्बम उगाच चाळत बसलो,
आठवून एक-एक गोष्टी स्वत:शीच मग हसलो...!

लहानपणीचा एक गोंडस फोटो होता पहिल्या पानावर,
बाबा होते शेजारी आणि मी आईच्या कडेवर...!

पुढच्या पानावर मी थोडा मोठा झालो,
मित्रांच्या घोळक्यात स्वत:लाच शोधु लागलो...!

पुढे आला शाळेच्या gathering चा फोटो,
एका नाटकामद्धे मी तिचा प्रियकर झालो होतो...!

दहावीच्या सेंड-ऑफचे फोटो नंतर आले,
ते फोटो बघताना नकळत डोळे ओले झाले.. .!!!

नंतर कॉलेज जीवनातले फोटो होते,
नवे मित्र, नवे ध्येय, सारेच नवे होते...!

कॉलेजमद्धे तिच्याशी गट्टी माझी जमली,
पुढच्या फोटोमद्धे ती हमखास दिसू लागली...!!!

ट्रीप असो वा असो बर्थडे असायचो नेहमी बरोबर,
उमलली होती प्रीती आमची नव्हती कुणा खबर...!

पुढच्या एका फोटोमद्धे ती अचानक दिसेनासी झाली,
त्यामुळे कि काय, कदाचित पुढची पाने होती सारी कोरी...!!!

मन हे माझे आता तिचीच वाट पाहे,
कोरा अल्बम मला अजून पूर्ण करायचा आहे...!!!
कोरा अल्बम मला अजून पूर्ण करायचा आहे...!!!

मैत्री विरुद्ध प्रेम




 


मैत्री विरुद्ध प्रेम

एका मुली - मुलात कधी
निखळ मैत्री का हो नसते ?
नेहमी त्यांच नात काहो
प्रेमा वरती येवून फसते ?

मैत्रिणी -मैत्रिनित गप्पा
आणि मित्रा -मित्रात मजा
मुली -मुलाच्याच मैत्रीला
प्रेमाची व्हावी सजा ?

विरुद्ध लिंगी आकर्षण
आणि खो घालतो सहवास
हलू हलू वाढते जवलिक
अन सुरु प्रेमाचा वनवास

उनाड पोरांच्या घोलक्या मधून
तो थोडा वेगला होतो
प्रेमाच्या त्या जदुपोटी
कावल्यान्मधे बगला होतो

तीही नंतर दूर होते
चिव चिवनार्या सखिंपासून
त्या बिचार्या पाहत रहातात
तीच वागन आ वासून

त्या दोघांच बोलन मग
विषय विषायानी वाढत जात
मैत्री सारख पवित्र प्रेम
आकर्षणवर थांबत जात

दोघे नंतर वेगले होतात
निरोप देतात मैत्रीला
विराम पडतो त्यान्च्याशिवाय
हास्यविनोद अन मस्तिला

मित्र फक्त मित्र बनतात
औपचारिकतेने बोलायला
सख्या फक्त सख्या रहातात
खोट्या गप्पा तोलायला

त्या घोलक्यातिल मुला मुलित
दरी पडत जाते खोल
प्रत्येकाला मिलते साथ
धासलत जातो मैत्री तोल

मैत्री मधली शुद्धता
प्रेमामुले झिरपत जाते
प्रेम आणि मैत्रिमद्ध्ये
मैत्री तेवढी विखारत जाते

हेवा वाटावा अशी दोस्ती
हलू हलू फ़स्त होते
फुटकल अशा प्रेमासाठी
खरी मैत्री पण स्वस्त होते

"का रे वेड्या अस करतोस?"

 नेहमी म्हणत असतेस "का रे वेड्या अस करतोस?"
पण तुझही माझ्यावर प्रेम आहे
तर तू का नाही सांगू शकत?

तू देखील मला पाहण्यासाठी असतेस ना आतुर
मी दिसलो नाही की उठत ना तुझ्याही मनात विचारांच काहूर
पाहताच मला येतो ना तुझ्याही हृदयात आनंदाचा पूर
मग वाटत नाही का तुला
आपणच बोलायचा प्रयत्न करावा एकदा तरी जरूर

का ग वेडे अस करतेस
तुझही माझ्यावर प्रेम आहे
तर तू का नाही येऊन सांगत?

डोळ्यांची भाषा तर तू पण असतेस ना बोलत
माझ्याप्रती प्रेम जातय न तुझ्याही हृदयात वाढत
दिसून येतय ना प्रेम तुलाही माझ्या डोळ्यात
मग का अवघड जातय तुलाही मांडायला प्रेम शब्दात

का ग वेडे अस करतेस
तुझही माझ्यावर प्रेम आहे
तर तू का नाही येऊन सांगत?

मलाही खुपदा वाटत असत तुझ्याशी स्वत: जाउन बोलाव
आपल्यात मैत्रीच एक नात जुड़वाव
मैत्रीतून मग त्या प्रेमाच फूल फुलवाव
पण भीती वाटते की
जर मैत्रीच नाकारलीस तर मी तुझ्याकडे काय म्हणून पाहाव

का ग वेडे अस करतेस
तुझही माझ्यावर प्रेम आहे
तर तू का नाही येऊन सांगत?

रोज तुला कुणी ना कुणी 'प्रपोज' करताना पाहतो
बघूनच ते मग मनातून जळून निघतो
पण तू दिलेला नकार पाहून मात्र सुखावतो
पण हा सर्व पाहूनच तुझ्याशी बोलायला येण्यास घाबरतो

का ग वेडे अस करतेस
तुझही माझ्यावर प्रेम आहे
तर तू का नाही येऊन सांगत?

तूच सांग मला
दरवेळी मुलानेच पुढाकार घेणे आहे का गरजेचे
मुलींना स्वातंत्र्य नाही का प्रेम व्यक्त करण्याचे
मान्य करतो मुलींवर असत बंधन जगाच
पण प्रेम करण तरी आहे का चूकीच

चल एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा
आज पुन्हा समोर येउया
आणी दोघांनी एकत्र बोलून
आपल्या प्रेमाचा मनोरा उभारुया....!!