अस्ताला जाणार्या सूर्याला बघून
एकदा रात्र म्हणाली,
बराच काही काळ तळपतोस
मग शेवटी असा का मावळतोस?"
सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या सुखासाठी
तू आसुसलेली असतेस तुझ्या चंद्राच्या मुखासाठी !
आपलं तारुण्य उधळतेस , पहाटे पहाटे दु:खी होतेस
पुन्हा यावं लागतं मला , तुला फुलवायला , तुझ्या सुखासाठी !
रात्र : " खरंच राजा , चंद्रापेक्षाही तूच खरा सखा आहेस
भेटतोस काही क्षणांसाठी , पण धग देतोस जगणार्या प्रत्येक कणासाठी !
मला तुम्ही दोघेही हवेत , दोघांना एकत्र मला बघायचंय
'एक हात तुला अन् एक हात त्याला' असं बेधुंद जीवन जगायचंय !
सूर्य म्हणाला , "मलाही सखे एकदा तुझ्या कुशीत निजायचंय
ही धग खूप असह्य आहे , शांत होईतो चांदण्यात भिजायचंय !पण .....आपल्याला असं वागता येणार नाही
तुझ्या रात्रीच्या प्रियकरासाठी तुला जायलांच हवं
आणि.....तुझ्या त्या सुखी क्षणांसाठी.....
"तो" येताच , मला असं विझायलाच हवं !!!!!!!!!!!!!!
No comments:
Post a Comment