नेहमी म्हणत असतेस "का रे वेड्या अस करतोस?"
पण तुझही माझ्यावर प्रेम आहे
तर तू का नाही सांगू शकत?
तू देखील मला पाहण्यासाठी असतेस ना आतुर
मी दिसलो नाही की उठत ना तुझ्याही मनात विचारांच काहूर
पाहताच मला येतो ना तुझ्याही हृदयात आनंदाचा पूर
मग वाटत नाही का तुला
आपणच बोलायचा प्रयत्न करावा एकदा तरी जरूर
का ग वेडे अस करतेस
तुझही माझ्यावर प्रेम आहे
तर तू का नाही येऊन सांगत?
डोळ्यांची भाषा तर तू पण असतेस ना बोलत
माझ्याप्रती प्रेम जातय न तुझ्याही हृदयात वाढत
दिसून येतय ना प्रेम तुलाही माझ्या डोळ्यात
मग का अवघड जातय तुलाही मांडायला प्रेम शब्दात
का ग वेडे अस करतेस
तुझही माझ्यावर प्रेम आहे
तर तू का नाही येऊन सांगत?
मलाही खुपदा वाटत असत तुझ्याशी स्वत: जाउन बोलाव
आपल्यात मैत्रीच एक नात जुड़वाव
मैत्रीतून मग त्या प्रेमाच फूल फुलवाव
पण भीती वाटते की
जर मैत्रीच नाकारलीस तर मी तुझ्याकडे काय म्हणून पाहाव
का ग वेडे अस करतेस
तुझही माझ्यावर प्रेम आहे
तर तू का नाही येऊन सांगत?
रोज तुला कुणी ना कुणी 'प्रपोज' करताना पाहतो
बघूनच ते मग मनातून जळून निघतो
पण तू दिलेला नकार पाहून मात्र सुखावतो
पण हा सर्व पाहूनच तुझ्याशी बोलायला येण्यास घाबरतो
का ग वेडे अस करतेस
तुझही माझ्यावर प्रेम आहे
तर तू का नाही येऊन सांगत?
तूच सांग मला
दरवेळी मुलानेच पुढाकार घेणे आहे का गरजेचे
मुलींना स्वातंत्र्य नाही का प्रेम व्यक्त करण्याचे
मान्य करतो मुलींवर असत बंधन जगाच
पण प्रेम करण तरी आहे का चूकीच
चल एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा
आज पुन्हा समोर येउया
आणी दोघांनी एकत्र बोलून
आपल्या प्रेमाचा मनोरा उभारुया....!!
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment