Sunday, March 7, 2010

त्या रात्री मी एकटीच जळत राहिले...

त्या रात्री मी एकटीच जळत राहिले...

अगदी सुरुवातीपासून तू माझ्या
सोबत होतास.
माझ्या असण्यात हि होतास,
माझ्या नसण्यात हि होतास.
तुझ्या विरहात रात्र रात्र जगताना
देखील तू माझ्या सोबत होतास.
तुझ्या साठी प्राण जेव्हा तडफडला,
तेव्हा देखील तू माझ्या श्वासात होतास.
मी मेल्यावर माझ्यासाठी रडणाऱ्या त्या
फसव्या चेहऱ्यात देखील
तू माझ्या सोबत होतास.
सारणाची वाट चालताना,
माझ्या चार खांद्यांमध्ये देखील
तू माझ्या सोबत होतास.
माझ्या चितेची आग शांत होण्याची वाट हि न बघता
तू निघून जाताना मात्र,
सरते शेवटी सरणावर मी एकटीच राहिले..
आणि खरच सांगू त्या रात्री मी एकटीच जळत राहिले

No comments: