पाणावलेच नाहीत कधी ते तुझे डोळे होते,,,,
अन् नुसतेच रडले ते वेडे माझे हृदय होते...........
जुळलच नाही कधी ते आपलं नातं होतं,,,,
अन् तुटलं ते सगळंच माझं होतं...........
वळलीच नाही कधी ती तुझी नजर होती,,,,
अन् कळलीच नाही ती माझी भावना होती.........
समजलच नाही कधी ते तुझं वागणं होतं,,,,
अन् समजूनच घेतलं नाहीस हे आता माझं जगणं होतं........
विसरलास ती तर तुझी सवयच होती,,,,
अन् आठवणे हि तर माझी गरजच होती..........
मला जाळणं हे तर तुला माहीतच होतं,,,,
अन् शांत जळत राहणं मला अवगतच होतं...........
संपणारच होतं ते तुझं आकर्षण होतं,,,,
अजूनही झुरत आहे ते माझं वेडं प्रेम होतं............
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment