फकत एकदा म्हण मी तुझाच आहे ग
तु विसर मला कायमच.......
पण-
"मी तुला विसरलो"
अस कधीही म्हणु नकोस...
तु कधीच वाचु नकोस
माझी कुठलीही कविता
पण म्हण-
मी वाचेन तुझी कविता कधीतरी...
तु कधीच स्वीकारु नकोस
माझ्या या खऱ्याखुऱ्या प्रेमाला
पण.. "तुझं प्रेम खर आहे ग"
तु कधीच देऊ नकोस
मला फ़ुलांचा गुछ
पण- एखादं गुलाबाचं फुल तरी
ठेवुन जा रे या माझ्या हातावर.....
तु कधी लक्षही देवु नकोस
मला होणाऱ्या यातनांकडे...
तु कधी रडुही नकोस
माझ्यासाठी.......
पण जाता जाता
अंत्यदर्शनाला ठेवलेल्या त्या माझ्या प्रेताला
एकदा , फक्त्त एकदा घट्ट कवटाळ
आणि म्हण-
या जन्मात नाही
पण पुढच्या जन्मात का होईना
मी तुझाच आहे ग!!!!
मी तुझाच आहे ग!!!!
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment