सतत तुझा विचार येत राहतो
सतत तुझा चेहरा दिसत राहतो
सतत तुझी आठवण येत राहते
कधी दिवस भराच्या घायीत
तुझा चेहरा मनाला शांत करतो
कधी एकांतात तुझा चेहरा
मनाचा एकांत हरवून टाकतो
कधी अडचणीत तुझा चेहरा
जगण्याची नवीन आशा देतो
तुझाच चेहरा तुझीच आठवण
कधी हे मला लिहायला लावते
तू आणि तुझ्या साऱ्या गोष्टी
हल्ली माझ्या जगण्याच्या हालचाली ठरवतात
तुझे ते हास्य तुझे ते शब्द
नेहमी कानावर पडत राहतात
हेच शब्द कधी कधी वेळेचा हि विसर पाडतात
माझ्या जगण्यावरील तुझे हे नियंत्रण
कदाचित तुला हि माहित नसेल
जे ह्या जगात सगळ्यांनी केलं
ते प्रेम हि असंच असेल ??
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment