Thursday, March 4, 2010

break up नंतर ३ वर्षांनी....

break up नंतर ३ वर्षांनी....

३ वर्षांनी अचानक भेटलास

काहीस अनोळखी हसलास

hello hi झाल्यानंतर इथे कुठे विचारलस

formality म्हणून coffee प्यायला नेलस

शेजारी बसायच सोडून समोर जाउन बसलास

coffee च्या घोटागणिक कसलस दुःख पीत राहिलास

पूर्वी माझ्या डोळ्यात हरवणारा तू

स्वतःतच कुठे तरी हरवला होतास

पण काय झाले हे विचारायचा हक्क सुद्धा

माझ्या कडून हिरावला होतास..

हतबल होउन तुझ्याकड़े बघत राहिले

ते जुने दिवस शोधत राहिले

पण तुझ्यातला 'माझा तो' कुठे तरी हरवला होता

समोर असलेला त्याच चेहर्याचा कोणी अनोळखी होता

No comments: