आज पुन्हा एकदा
हृदयावर आभाळ दाटलं
आठवणींच्या पावसात भिजून गेलं
नकळतच त्या क्षणांमध्ये हरवून गेलं
सोसाट्याचा वारा सुटला
आणि आठवणींच्या पानांना उडवू लागला
कुठेतरी खोल लपलेल्या त्या हृदयाच्या खोर्यात
पुन्हा एकदा माझ्या मनाला घेऊन गेला
समुद्राच्या लाटांन प्रमाणे
एक एक आठवण हृदयावर थडकू लागली
काळाच्या ओघात विसरून गेलेल्या दिवसांमध्ये
नकळतच मला घेऊन गेली
मग विजेचा कडकडात झाला
आणि सार्या नभाला चिरून गेला
काही कळायच्या आताच
हृदयाला माझ्या दुभागून गेला
मग रिमझिम पावसाच्या सरी आल्या
डोळ्यांच्या पापण्यांना हळुवार भिजवून गेल्या
निसर्गाच्या ऋतूंनी जसा रंग बदलावा
माझ्या हृदयाचा आसमंत बदलून गेला
मिळणारच न्ह्व्तीस कधीच मला
तर भेटलीस्च का ग तू ?
सोडून मला जाणारच होतीस
तर आठवणींचं ओझं का देऊन गेलीस तू ?
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment