काल दुपारी आठवणींचा अल्बम उगाच चाळत बसलो,
आठवून एक-एक गोष्टी स्वत:शीच मग हसलो...!
लहानपणीचा एक गोंडस फोटो होता पहिल्या पानावर,
बाबा होते शेजारी आणि मी आईच्या कडेवर...!
पुढच्या पानावर मी थोडा मोठा झालो,
मित्रांच्या घोळक्यात स्वत:लाच शोधु लागलो...!
पुढे आला शाळेच्या gathering चा फोटो,
एका नाटकामद्धे मी तिचा प्रियकर झालो होतो...!
दहावीच्या सेंड-ऑफचे फोटो नंतर आले,
ते फोटो बघताना नकळत डोळे ओले झाले.. .!!!
नंतर कॉलेज जीवनातले फोटो होते,
नवे मित्र, नवे ध्येय, सारेच नवे होते...!
कॉलेजमद्धे तिच्याशी गट्टी माझी जमली,
पुढच्या फोटोमद्धे ती हमखास दिसू लागली...!!!
ट्रीप असो वा असो बर्थडे असायचो नेहमी बरोबर,
उमलली होती प्रीती आमची नव्हती कुणा खबर...!
पुढच्या एका फोटोमद्धे ती अचानक दिसेनासी झाली,
त्यामुळे कि काय, कदाचित पुढची पाने होती सारी कोरी...!!!
मन हे माझे आता तिचीच वाट पाहे,
कोरा अल्बम मला अजून पूर्ण करायचा आहे...!!!
कोरा अल्बम मला अजून पूर्ण करायचा आहे...!!!
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment