थांब जरा तू
बरसू नकोस
ती येणार आहे
तु ही तरासू नकोस
तू बरासलस तर
ती अडकून बसेल
तू थांबावा म्हणून माझे
पत्र ती हातात घट्ट पकडून बसेल
काही क्षण तुझ्या थांबण्याची ..
मग ती…ती वाट पाहील
निघेल मग पावसात ती
सावरत सावरत ती माझ्या कडे येईल
ती आल्यावर मग शांतच राहील कदाचित
ओढणिने चेहरा पुसत, थंडीने कूडकुडत
म्हणेल “माफ कर.मला उशीर झाला
मी निघालेच होते पण पाऊस आला”
मी माझा जॅकेट तिला देईल,
ती म्हणेल नको रे मी ठीक आहे.
हळूच मी तिचा हात हातात घेईल,
मी म्हणेल या बरसनाया पावसाप्रमाणे
तू माझ जिवनात सुख होऊन बरसशील ?
तिला खूप आनंद होईल.ती लाजेल ही थोडीशी
पण हळूच डोळ्यात तिच्या आसवे येतील कदाचित,
घरचे काय म्हणतील हा विचार तिला पडेल.
माझे जॅकेट मला परत करून.
निशब्द होऊन निघून जाईल ती
निशब्द मला करून तोडून जाईल ती
“”तू थांबू नको रे
पावसा तू बरसतच रहा
ती नाही आली तरी चालेल मला
तिच्या नकारा पेक्षा …
ती तुझ्या मूळे नाही आली
असे खोट खोट..
मनाला समजावन आवडेल मला….”"
तू थांबू नको रे
तू बरसतच रहा ..........
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment