Thursday, March 4, 2010

!!!!!!!!आठवण!!!!!!!!!

!!!!!!!!आठवण!!!!!!!!!


येइल का गं तुला माझी आठवण ?
मी दूर गेल्यानंतर
होइल का गं पापणी ओली?
जुनं सारं आठवल्यानंतर
भासेल का एखादी संध्याकाळ
उदास एकाकी नकोशी.
अन् पाहून त्या वेड्या चन्द्रास
आठवेल का रात्र जागवलेली?
विचारलं मी काहीसं हळवं होत
अन् धरला
तुझा हात अफ़्गदी घटट्
तू टाकलास एक शांत कटाक्ष
आणि वार्यावरती गंध पसरावा
इतक्या हळूवारपणे बोललीस/
.
.
.
..
.
.
.
.
.
वेड्या आठवण येण्यासाठी विसरावं लागतं !!!!!!!!!

No comments: