Thursday, March 4, 2010

डोळ्यात वाच माझ्या...

डोळ्यात वाच माझ्या...

त्या दिवशी रस्त्यात भेटला
सहा महिन्यांपासून याच शहरात आहे म्हणाला
पण कधीही मला शोधायचा प्रयत्न नव्हता केला

माहिती होत त्याला
हरवून बसेल तो स्वतःला
म्हणुनच कटाक्षाने टाळल होत भेटण मला

पण नियतीच्या पुढे कोणाच काय चालणार
त्याचा हा हट्ट ती तरी किती दिवस पुरवणार
समोर आणून उभ केल होत माझ्या

काहीही न बोलता उभा होता
तरीही बरच काही सांगत होता
रस्ता चुकलेल्या कोकरागत घरी यायला तडफडत होता

शब्द मूक होते
पण डोळ्यातले भाव लपवने
त्याच्या हातात नव्हते

त्याने न सांगताच मी हे ताडले
दुराव्याचे रूपांतर घट्ट मिठीत झाले
भरलेले डोळे बरसू लागले

आणि
मी नव्याने त्याची झाले.....!

No comments: