Sunday, March 7, 2010

बाकी मी मजेत ......!!!

बाकी मी मजेत ......!!!
तू गेल्यापासून ना....
थोड़ी हरावाल्यासार्खिच असते...
उगाचच सकाळ पासून ,तुजी वाट बघत असते....
बाकी मी मजेत.........!
सगल्यान्मधे राहूनही एकटी एकटी असते.....
मनामधे सारखी तुझ्याशी ऑनलाइन असते .....
बाकी मी मजेत........
हल्ली पुस्तकान मधे माझ मन रमत नाही...
मित्र मैत्रिणी सुधा ,ओलखिचे वाटत नाही....
बाकी मी मजेत ........
समोरचा निसर्ग माला नीरस वाटतो....
फुलांचा सहवास त्रास दायक वाटतो....
बाकि मी मजेत .........
हल्ली सकाळ तुझ्या येण्याचा सन्देश घेउन येत नाही....
अणि रात्र हलवे क्षण अठ्वु सुध्धा देत नाही
बाकी मी मजेत.........
हल्ली डोळ्यात नवी स्वप्न नसतात.....
पापण्यांच्या कडा कायम भिजलेल्या असतात ...
बाकि मी मजेत..............
अता तुझ्यावर मी रागावले नाही ...
रागाव न्या इतकी सुधा मी ,माझी राहिले नाही
बाकि...........? ......................मजेत.......

No comments: